Maharashtra LIVE : परभणीत मोठं काही तरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा

Maharashtra News LIVE : एकनाथ शिंदे यांचा आज परभणी मेळावा पार पडणार आहे. त्यांचा आज दुपारच्या सुमारास मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यासहित मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

Maharashtra LIVE : परभणीत मोठं काही तरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा
LIVE UPDATE
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 10:05 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Aug 2026 10:00 AM (IST)

    जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री चौकात पोलीस बंदोबस्त

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री चौकात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी राज्य राखीव पोलीस,दंगा नियंत्रण पथक यासह वाहतूक पोलिसांचा समावेश आहे. अप्पर पोलीस अधीक्षक,पोलीस उपाधीक्षक, काही पोलीस निरीक्षक वडीगोद्रीच्या चौकात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

  • 30 Aug 2026 09:52 AM (IST)

    नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती

    नेपाळमध्ये पुराचा कहर सुरू असून भारतातील अनेक जण बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित आहेत. तसेच 338 संपर्कात आहेत.  नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत.  प्रवास सुविधा आणि मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


  • 30 Aug 2026 09:38 AM (IST)

    एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवानिमित्त शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवानिमित्त शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे.  शरद पवार यांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर शरद पवार गटाबरोबरच अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील आल्याचं पाहायला मिळत आहे. पुढच्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर स्वागतास आम्हाला आनंदच आणि चांगलंच होईल, अशा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिल्या. दोन्ही राष्ट्रवादीकडून अजित पवार, शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात आहे.

  • 30 Aug 2026 09:35 AM (IST)

    ठाण्यातील महापौर मॅरेथॉन स्पर्धेत पालकांचा गोंधळ

    ठाण्यात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पार पडला. या स्पर्धेत विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांनी गोंधळ घातला.  ठाण्याच्या महापालिकामधील अधिकाऱ्यांना पालकांनी घेराव घातला. काहींना मेडल देण्यात आले, तर काहींना मिळाले नाही. त्यामुळे पालकांनी गोंधळ घातला.

  • 30 Aug 2026 09:25 AM (IST)

    नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धाक, कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्हीत कैद

    – नाशिकरोड परिसरात कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद  झाला आहे.  नाशिकरोडच्या चाडेगाव परिसरातील ही घटना आहे.  अर्धवट बांधकाम असलेल्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर बिबट्याने कुत्र्याचा माग काढला.  बिबट्यापासून वाचण्यासाठी कुत्र्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली मारली उडी.  बिबट्या आणि कुत्र्याची धावपळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.


  • 30 Aug 2026 09:10 AM (IST)

    एकनाथ खडसेंच्या 75 वा वाढदिवस शताब्दी सोहळ्याला दिग्गज नेते उपस्थित राहणार

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा 75 वा वाढदिवस शताब्दी सोहळ्याला सर्व पक्षाचे दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान खडसेंबाबत आलेल्या नेत्यांपैकी काय वक्तव्य करतात याकडे लक्ष लागून आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन जे खडसेंचे कट्टर विरोधक मानले जातात, त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं होतं.खडसेंच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती असल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

  • 30 Aug 2026 09:01 AM (IST)

    केंद्र सरकाराच्या बफर स्टॉकच्या कांद्याचा बाजारावर परिणाम

    केंद्र सरकाराच्या बफर स्टॉकच्या कांद्याचा बाजारावर परिणाम होणार आहे. लासलगावहून दिल्ली, मनमाडहून चेन्नईला असा एकूण १,२५३ टन कांदा रवाना झाला आहे. लासलगावनंतर आता येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात पाच दिवसांत ६२५ रुपयांची घसरण झाली आहे. – २४ ऑगस्टला कांद्याचा सरासरी दर ४,२२५ रुपये इतका आहे.  २९ ऑगस्टला कांद्याचा दर घसरून ३,६०० रुपयांवर आला.  दररोजच्या दरघसरणीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली.  कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत युवा शेतकऱ्यांचा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. या सभेला मराठवाड्यातील महायुतीचे नेते त्याचबरोबर आमदार खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केलेले खासदार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्याला काय गिफ्ट देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
या सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय राजकीय भूकंप करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. या सहित जग, देशासहित राज्यातील सर्व घडामोडी जाणून घ्या

Follow Us