Maharashtra News LIVE : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात तिसरी अटक
Maharashtra News LIVE : गिरगावच्या इस्कॉन मंदिरात गोकुळाष्टमीचा मोठा उत्साह दिसून आला. भजनाच्या गजरात भाविक दंग झाले होते. गोकुळाष्टमीचा सण अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात अखंड हरिनामाचा गजर आणि भजनांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

LIVE NEWS & UPDATES
-
कल्याण-डोंबिवलीतील गोविंदांकडून भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी पोस्टर्स; चर्चांना उधाण
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांकडून ‘भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’ अशी पोस्टर झळकली. गोविंदांनी मानवी मनोरे रचताना आणि दहीहंडी फोडताना हातात पोस्टर घेत जल्लोष केल्याने उत्सवात या पोस्टरची विशेष चर्चा रंगली.
एकनाथ शिंदे यांनी तळागाळातील आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेल्या कामांमुळेच या भावना गोविंदांमधून व्यक्त होत आहेत, असं कल्याण पूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी म्हटलं.
-
गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचणारे 80 टक्के तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे – अंकुश काकडे यांच्या वक्तव्यावरून पेटणार नवा वाद ?
गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचणारे 80 टक्के तरुण हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असतात, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्या या वक्तव्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात गेल्या १५ दिवसांपासून डीजेबंदी आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मात्र, या चर्चेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न बाजूला पडत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.
-
-
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया यांच्यानंतर आता त्यांच्या वर्गमित्राला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रितेश हिंगे अस अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती.
-
जळगाव – जामनेरमध्ये हिशोबातून झालेल्या वादात चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू
जळगावच्या जामनेरमध्ये सार्वजनिक देवी मंडळामध्ये हिशोबातून झालेल्या वादात चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू झाला. किशोर सुरेश बावस्कर असं मृत तरुणाचं नाव असून जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी अटकेतील आरोपी दोन्ही सख्ख्या भावंडांची आज पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं.
-
पुणे – श्रीराम चौकात शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाचं आयोजन
पुण्यातील हांडेवाडी येथील श्रीराम चौकात शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. दहीहंडी उत्सवाला ढोल वादनाने प्रारंभ झाला. अथांग वाद्यपथकाकडून ढोल वादन करण्यात येतंय.
-
-
जालन – मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाचे पथक दाखल
जालना – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाचे पथक दाखल झालं आहे. मात्र उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा नकार दिला आहे.
आज सायंकाळी 6 वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी उपोषणस्थळी येऊन जरांगे पाटलांना उपचार घेण्याची विनंती केली. कालपासून जरांगे पाटलांनी उपचार घेणं पूर्णपणं बंद केलं आहे.
-
ठाणे – आर्यन्स ग्रुप गोविंदा पथक मनसेच्या दही हंडीसाठी दाखल
ठाणे – आर्यन्स ग्रुप गोविंदा पथक मनसेच्या दही हंडीसाठी दाखल झाला आहे. 10 थर लावण्याचा प्रयत्न करणार. या आधी त्यांनी ठाण्यात 10 थर बसवले आणि 10 वा थर उठण्याच्या आधीच कोसळला. आता पुन्हा एकदा मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हंडीसाठी हा ग्रुप प्रयत्न करणार आहे.
-
महाराष्ट्रातील भरती परीक्षांसाठी समिती स्थापन करण्यात आली
महाराष्ट्र सरकारने भरती परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वसनीय आणि उमेदवार-केंद्रित बनवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती केवळ प्रश्नपत्रिकांचाच नव्हे, तर संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेईल.
-
श्री गणेश गोविदा मुलीचं पथक नवी मुबंईत दाखल
श्री गणेश गोविदा मुलीचं पथक नवी मुबंईत दाखल झालं आहे. आम्ही पोलीस आहोतो तरीदेखील आम्ही दहीहंडीत सहभागी झालो आहोत. आम्ही यावेळी सात थर लावणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. आम्हाला थर लावताना भीती नाही वाटतं नाही असंही त्या म्हणाल्या.
-
सणसवाडीत मद्यधुंद इसमाने स्वतःचे मनगट दगडाने ठेचून कापले
सणसवाडी येथील सराटेवस्ती परिसरात एका मद्यधुंद इसमाने नशेच्या अवस्थेत स्वतःच्या हातावर धारदार चाकूने वार केले. त्यानंतर दगडाने हातावर घाव घालत मनगटापासून हात वेगळा करून तो बाजूला फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
डीजे विरोधात विद्यानंद बापट यांचा आता नेत्यांच्या सभा आणि मिरवणुकीकडे मोर्चा
डीजे विरोधात विद्यानंद बापट यांनी आता नेत्यांच्या सभा आणि मिरवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. नेत्यांच्या सभा, मिरवणूका, लग्नकार्य आणि ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होते त्या ठिकाणी डीजे बंद असावा, असं मत त्यांनी मांडलं. निवडून येणाऱ्याला आनंद आहे, मात्र त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण करणे हे योग्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
-
जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू
जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. हा महोत्सव 7 सप्टेंबरपासून प्रथम काश्मीरमध्ये आणि त्यानंतर जम्मू विभागात आयोजित केला जाईल. काश्मीरमध्ये, हा महोत्सव शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र आणि गुलमर्ग येथे आयोजित केला जाईल, ज्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. हा चित्रपट महोत्सव माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाद्वारे आयोजित केला जातो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 90 देशांमधून 1100 चित्रपट सादर करण्यात आले होते, त्यापैकी 40 देशांमधील 135 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
-
ठाण्याच्या दहीहंडी उत्सवात कांदिवलीच्या ‘साई माऊली’ची 9 थर लावून सलामी
ठाण्याच्या दहीहंडी उत्सवात कांदिवलीच्या ‘साई माऊली’ची 9 थर लावून सलामी
मैदानात जल्लोष साजरा
सेफ्टी बेल्ट घालत हवेत मुलाने लटकत केला डान्स
हंडी फोडण्याचा मिळाला मान
-
मुंबईत पहिली दुर्घटना, दहीहंडी फोडताना मालाडमध्ये गोविंदाचा मृत्यू
मुंबईत पहिली दुर्घटना, दहीहंडी फोडताना मालाडमध्ये गोविंदाचा मृत्यू
दहीहंडी उत्सव साजरा करताना ७ वर्षीय मुलाचा मृत्यू.
दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू.
डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती.
-
रायगडात गोविंदाचा उत्साह शिगेला, खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोविंदाचा उत्साह शिगेला पोचला होता पारंपरिक वाद्य असणाऱ्या खालू बाजा वरती गोविंदा नाचण्याची परंपरा आजही गावागावात प्रचलित आहे. खेडेगावमध्ये ढाक्कमांकुम तलावावर गोविंदाची फळी पकडून प्रत्येक घरासमोर गोविंदा खेळला जातो श्रीवर्धन मध्ये देखील ही परंपरा अखंडित आहे . रायगड चे खासदार/राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दरवर्षी श्रीवर्धन मध्ये गोविंदा खेळतात यंदाही परंपरा जपणाऱ्या गोविंदा मध्ये सुनील तटकरें यांनी फेर धरून गोविंदा खेळला….
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर 1 हजार रूपयांनी तर चांदीचे दर 2 हजारांनी घसरले आहेत. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 75 रुपयेपर्यंत पोहोचले आहेत, तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 43 हजार 80 रुपये पर्यंत पेहोचले आहेत.
-
पेपर फुटी मध्ये आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याच्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल,
MPSC पेपर फुटी प्रकरणी आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी नंतर आता औसा पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद पवार पक्षाच्या महेबुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्लारी मध्ये अँड अशोक बेद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर औसा येथे राष्ट्रवादीच्या महेबुब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांची रुग्णालयातील आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर
दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांची रुग्णालयातील आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतची माहिती समोर आली आहे. विविध सरकारी आणि BMC रुग्णालयांमध्ये एकूण २२ गोविंदा जखमी आहे . यापैकी २१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. सध्या १ गोविंदा रुग्णालयात उपचाराधीन. CT रुग्णालयात २० जखमी; सर्वांना डिस्चार्ज. ES रुग्णालयात १ जखमी; उपचारानंतर डिस्चार्ज. WS रुग्णालयात १ जखमी; तो सध्या उपचाराधीन. दहीहंडी उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी प्रशासनाने माहिती दिली आहे.
-
मी माझ्या कर्मचाऱ्यांसोबत देखील मराठी मध्ये बोलतो – सुनील शेट्टी
मुंबई माझी जन्म कर्म भूमी आहे. त्यामुळे मला मराठी बोलायला लागणार मला मराठी बोलायला आवडतं… मी माझ्या कर्मचाऱ्यांसोबत देखील मराठी मध्ये बोलतो.. काही वेळा मीडिया समोर मराठी बोलायला भीती वाटते मात्र मी मराठी बोलतो.. असं सुनील शेट्टी म्हणाले.
-
९ थरांची नवलाई राहिली नाही, जास्त थर लागतात- प्रताप सरनाईक
जो पर्यंत पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत मराठी जिवंत राहणार आहे. सर्व गोविंदा पथक येतात, ठाण्याच्या अनेक गोविंदा पथकाने ९ थर लावले. ९ थरांची नवलाई राहिली नाही, जास्त थर लागतात, असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला २५ लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे. थर रचताना घाई करू नका, जगाच्या पातळीवर हा खेळ घेऊन जायचा आहे, असे सरनाईक म्हणाले.
-
या देशी खेळ आहे विसरू नका-क्रिकेटर सूर्यकुमार यादव
प्रताप सरनाईक यांनी क्रिकेटर सूर्यकुमार यादव यांना मराठी मध्ये बोलण्याची विनंती केली. त्यावर प्रो गोविंद पहिला ना तुम्ही? या देशी खेळ आहे विसरू नका. ऑलिम्पिक पर्यंत जायचे आहे , इतिहास घडवायचा आहे, असे यादव म्हणाला.
-
घाटकोपर येथील सन्मान दहीहंडीला सुरूवात
घाटकोपर येथील सन्मान दहीहंडीला सुरूवात झाली आहे. किरण लांडगे मित्र परिवार आयोजित सन्मान दहीहंडीला सुरूवात झाली आहे. शिक्षकांच्या उपस्थितित दहीहंडीचे पूजन करण्यात आले आहे. यंदा शिक्षक दिन आणि दही हंडी एकाच दिवशी आल्याने यंदाचा सन्मान शिक्षकांना मिळणार आहे.
-
घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम यांची दहीहांडी
घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम यांच्या दहीहांडीत गोविंदा मोठ्या संख्येत जमायला सुरुवात झाली आहे. मानवी मनोरे रचायला सुरूवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लदेवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनेक सामाजिक कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. गोविंदांनी काळजी घ्यावी असं आमदार राम कदम यांनी आवाहन केले आहे.
-
रितेश देशमुख घाटकोपरमधील गणेश चुक्कल यांच्या दहिहंडीत हजर
सिनेस्टार रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया दोघेही घाटकोपरमधील गणेश चुक्कल यांच्या दहिहंडीत हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गोविंदांनी गर्दी केली. यावेळी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला होता.
-
‘मातृभाषा शिक्षण जागर’ दहीहंडीचे आयोजन
मुंबईतील मराठी शाळा टिकवण्यासाठी मागाठाणे, देवीपाडा मैदानावर ‘मातृभाषा शिक्षण जागर’ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेवक राज सुर्वे यांच्या पुढाकाराने तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मागाठाणे भव्य दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहीहंडी फोडणार आहेत.
-
दहीहंडी महोत्सवात उत्साहाला उधाण
मुंबईमधील वरळी येथील राजयोग प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सवात उत्साहाला उधाण आले. मंत्री आशिष शेलार व्यासपीठावरती उपस्थित आहेत. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल होतील.
-
पुण्याच्या हांडेवाडी येथे दहीहंडीचं आयोजन
दरवर्षी प्रमाणे पुण्याच्या हांडेवाडी येथील श्रीराम चौकात शिवसेना शिंदे पक्षाचे शहरंप्रमुख प्रमोद नाना भानगीरे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचं आयोजन करण्यात आले आहे.हजारो पुणेकर दहीहंडी पाहण्यासाठी हजेरी लावतात. ढोल पथकं, साऊंड सिस्टिम, त्याचप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई हे दहीहंडीचं खास आकर्षण आहे.
-
ठाण्यात रंगणार थरांचा थरार, शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात होणार मोठा जल्लोष
आज दहीहंडी उत्सव बाळ गोपाळांचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस यासाठी ठाण्यातील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित असताना ठाणे मध्यवर्ती असलेल्या शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात बाळगोपाळांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अनेक सिने अभिनेते व अभिनेत्री या दहीहंडी उत्सवाला ला भेट देणार आहेत. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या माध्यमातून या संपूर्ण दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
-
शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उपस्थिती
शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा महिला गोविंदा पथकांनी जास्त उपस्थिती लावली आहे.. यंदा महिलांना भरघोस बक्षिसे देणायत येणार आहे तर यंदा नशा मुक्त भारत अभियान नरेंद्र मोदी यांचं आहे त्यांच्या अनुषंगाने नशा मुक्त धोरण प्रचार करत हंडी उत्सव आयोजित केला आहे.
-
दहिहंडीत लोकनाथ या बॅनरची जोरदार चर्चा
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या शिवराज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात लोकांचा लोकनाथ अशा आशयाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहेय या दहीहंडी उत्सवासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ही सायंकाळी हजेरी लावणार आहेत. दहिसर पूर्व अशोक वन मध्ये शिवराज प्रतिष्ठान च्या माध्यमातून या भव्य दहीहंडी चे आयोजन करण्यात आले आहे
-
मागील महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात पावसाचा खंड
पावसाअभावी पीक करपून जात असल्याने पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी मदन घुमरे यांनी दीड एकर सोयाबीन आणि मूग पिकावर फिरवला नांगर. तर, याच गावातील शेतकरी शिवहार वाघमारे यांनी आठ एकर वरील कापूस पावसाअभावी नष्ट झाल्याने शेतात जनावरे सोडली.
-
कानात हेडफोन टाकून सण साजरे करायचे का?- अविनाश जाधव
सध्या राज्यात डीजे लावण्यावरुन वाद सुरु आहे. यावर मनसेने अविनाश जाधव यांनी कानात हेडफोन टाकून सण साजरे करायचे का? असा सवाल केला आहे.
-
दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू
पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव आहे.
-
नाशिकच्या रामकुंडात चार मुलं बुडाली; तिघांना वाचवण्यात यश
मुंबईहून 40 जणांचा ग्रुप दर्शनासाठी नाशिकमध्ये आला होता. गोदावरी नदीत स्नान करताना चार मुलं पाण्यात बुडू लागली. त्यामधील तिघांना वाचवण्यात यश आले आहे. तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
ठाण्यात संकल्प प्रतिष्ठान येथे रामनगर पथकाने दिली ९ थरांची सलामी
ठाण्यात रविंद्र फाटकांनी दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. यंदाचे त्यांचे 21वे वर्ष आहे. ठाण्यात रविंद्र फाटकांच्या संकल्प प्रतिष्ठान येथे रामनगर पथकाने ९ थरांची सलामी दिली आहे.
-
पुणे शिक्षक मतदारसंघात मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवरून राजकारण तापलं
पुणे शिक्षक मतदार संघात मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवरून राजकारण तापलं आहे. भाजपमधील लोक बुद्धिजीवी मग शिवसेनेतील आम्ही अडाणी का? भाजपतील बुद्धिजीवी लोकांचा मागील निवडणुकीत पराभव केला होता. मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक मतदार संघाची उमेदवारी द्या नाहीतर मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होईल. त्यामुळे महायुतीतील कुरघोडीचे राजकारण थांबवा, असा इशारा शिवसेनेचे नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिला.
-
ठाण्यात रामनगरचा राजा गोविंदा पथकाने लावले 9 थर
ठाण्यात पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यातील आणि मुंबईतील गोविंदा पथकामध्ये उत्सवाचे वातावरण आहे. ठाण्यातील रामनगरचा राजा गोविंदा पथक ९ थर लाऊन संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवाला सुरवात करत आहे. शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात अनेक मंडळांची नोंद होत आहे. सुरवातीलाच ९ थर लाऊन पहिला मान रामनगरचा राजा गोविंदा पथकाने मिळवला.
-
यंदा सस्कृती दहीहंडीची आम्हास भाग्य बोलतो मराठी थीम
ठाण्यातील संस्कृती दहीहंडीची जोरदार चर्चा असते. या दहीहंडीविषयी पूर्वेश सरनाईक म्हणाले, संस्कृतीची दहीहंडी ही विश्वविक्रमी आहे. २००९,२०१२ आणि मागच्या वर्षी याच दहीहंडीला वर्ल्ड रेकॉर्ड झाले. ही फक्त गोविंदांची दहीहंडी, त्यांचा सन्मान आम्ही करतो. दरवर्षी वेगळ्या थिम असतात.यावर्षी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही थीम आहे. मराठी भाषा आणि संस्कृती असलेली दहीहंडी जगात पोहचवण्याचे काम या आमच्या हंडीने केले आहेत. सकाळी ११ ते २ पर्यंत २२ मंडळ थर रचणार आहेत. ज्यांची तयारी आहे त्यांना ११ थर रचण्याची संधी देण्यात येणार आहे’.
-
विद्यानंद बापट यांच्या मुद्द्याला लोकांचा पाठिंबा – संजय राऊत
संजय राऊत यांनी विद्यानंद बापट यांच्या मागणीवर भाष्य केलं. ‘ध्वणीप्रदुषणामुळे सामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे विद्यानंद बापट यांच्या मुदद्याला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा फडणवीस यांनी मार्गी लावला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
-
ठाण्यात दंहीहंडीला सुरुवात; मनसेची टॅग लाईन चर्चेत
ठाण्यामध्ये मनसेच्या वतीने दहीहंडी उत्साहाला सुरुवात झाली आहे. सण आणि स्वप्न जिवंत ठेवणारी दहीहंडी मनसेची टॅग लाईन देण्यात आली आहे. ठाण्याच्या नौपाडा मैदानामध्ये मनसेची दहीहंडी आहे. त्याचवेळी केदारेश्वर बाळ गोविंद पथकाची अंबे मातेची थीम पाहायला मिळत आहे.
-
मागाठाणे देवीपाडा मैदानावर सुर्वेकडून भव्य दहीहंडीचं आयोजन; सेलिब्रिटी हजेरी लावणार
मुंबईसह देशभरात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि शिवसेना नगरसेवक राज सुर्वे, आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीने मागाठाणे येथील देवीपाडा ग्राउंडवर भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं. या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, चित्रपट अभिनेते संजय दत्त, रवी किशन, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटी उपस्थित राहून परफॉर्मन्स करणार आहेत.
-
जय जवान गोविंदा पथकाने मानाची दहीहंडी फोडली
जोगेश्वरी परिसरात जय जवान गोविंदा पथकाने मानाची दहीहंडी फोडली आहे. जय जवान गोविंदा पथक यंदा 11 थरांचा मानवी मनोरा रचण्याचा प्रयत्न करणार आहे. याआधी 10 थर रचून त्यांनी विक्रम केला आहे.
-
पंढरपूरमध्ये कृष्णजन्म मोठ्या उत्साहात साजरा
गोकुळष्टमी निमित्त पंढरपूरमध्ये रात्री बारा वाजता श्री विठ्ठलाला श्रीकृष्णाच्या रूपात सजवून गुलाल, फुलांची उधळण करण्यात आली, तर आर्य वैश्य कोमटि समाजाच्या श्री कृष्ण मंदिरात देखील कृष्णजन्म मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
घाटकोपरमधील मनसेच्या दहीहंडी उत्सवाला पोलिसांनी दिला झटका
घाटकोपरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी उत्सवाला मुंबई पोलिसांनी मोठा झटका दिला. आज दहीहंडी साजरी होणार त्याच्या बरोबर एकदिवस आधी म्हणजे काल परवानगी नाकारण्यात आली.
-
शिक्षकांना सलामी देणारी दहीहंडी
घाटकोपरमध्ये सन्मान दहीहंडीचा उत्साह. शिक्षकांना सलामी देणारी दहीहंडी. शिक्षक दीन असल्याने शिक्षकांना सन्मान. तर मुंबई उपनगरातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध. किरण लांडगे मित्र मंडळ आयोजित सन्मान दहीहंडी. ११,११,३१६ पारितोषिक असलेली सन्मान दहीहंडी.
-
या दहीहंडी उत्सवाला फडणवीस-शिंदे भेट देणार
आज दहीहंडी उत्सव बाळ गोपाळांचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस यासाठी ठाण्यातील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आले आहेत. आयोजक उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले असून. या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अनेक सिने अभिनेते व अभिनेत्री या दहीहंडी उत्सवाला भेट देणार आहेत.
मुंबईसह महाराष्ट्रात आज दहीहंडी उत्सवाची धूम आहे. मुंबईसह ठाण्यात लाखो रुपये इनाम असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. दरम्यान घाटकोपरमध्ये मात्र थोडा तणाव निर्माण झाला आहे. कारण ऐनवेळी पोलिसांनी मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली. दहीहंडीच्या स्टेजमुळे आपतकालीन मार्ग बंद होईल म्हणून पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. पण आयोजक मात्र दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहेत. दरम्यान दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटील आमरण उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मध्यरात्री 2 वाजता देखील जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी मराठा बांधवांची गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी पोहोचले. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवस रात्र मराठा बांधव येत आहेत.