Maharashtra News LIVE : विशाखापट्टणम कारखान्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या असह्य उकाड्यापासून तुळजापूर येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे देशातील विदा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. यासह देश, क्रीडा, मनोरंजन तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

तीर्थक्षेत्र तुळजापुर आणि परिसरात रात्री उशिरा मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस झाल्याने तुळजाभवानी मंदिर परिसर देखील न्हाऊन निघाला. तर दुसरीकडे देशातील विदा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. देशभरातील एकूण विदा केंद्र क्षमतेपैकी जवळपास निम्मी म्हणजेच 766 मेगावॉट एकट्या मुंबईत आहे. याच वेळी पुण्यातील विदा केंद्र क्षमता 145 मेगावॉटवर पोहोचली आहेत. पोलिसांकडून देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरट्यांना दोन तासांत पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून काढणाऱ्या तीन सराईत आरोपींना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे. यासह देश, क्रीडा, मनोरंजन तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
मालाड बालिका खरेदी-विक्री प्रकरण, मनसे आक्रमक
अमरावतीमध्ये तीन वर्षांच्या मुलीच्या खरेदी-विक्रीचा संबंध मालाडशी जोडला गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अमरावती मध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीच्या खरेदी-विक्रीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मालाड पोलीस ठाणे गाठत पोलिसांना जाब विचारला. तीन वर्षांच्या मुलीची खरेदी-विक्री झाल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
-
उज्ज्वला कनेक्शनधारकांना मोठा धक्का, अनुदानित सिलिंडरची संख्या केली कमी
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरवर्षी फक्त चार अनुदानित सिलिंडर मिळतील. सरकारने दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या सिलिंडरची संख्या नऊवरून चारवर आणली आहे. गरीब कुटुंबांतील प्रौढ महिलांना डिपॉझिटशिवाय एलपीजी कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती.
-
-
वाढत्या उष्णतेमुळे नालासोपऱ्यात इंजिन पेटल्याने आगीच्या भडक्यात 5 कार जळून खाक
वाढत्या उष्णतेमुळे नालासोपऱ्यात चक्क कारच्या इंजिनमध्ये पेट घेवून आगीच्या भडक्यात ५ कार जळून खाक झाल्या आहेत. नालासोपारा पूर्व सर्वोदय नगर, बावशेत पाड़ा परिसरात रविवारी दुपार च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
ग्रेट निकोबार बेटांसाठी 13000 कोटी रुपयांची गुंतवणूक
संरक्षण मंत्रालयाच्या एका सूत्राने सांगितले की, ग्रेट निकोबार बेट विकास प्रकल्पांतर्गत नौदल आणि नागरी वापरासाठी विमानतळ आणि धावपट्टी बांधण्यासाठी भारत सरकार 13000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, यासाठीचा निधी संरक्षण मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्यात विभागला जाईल.
-
विशाखापट्टणम कारखान्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी मृतांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50000 रुपयांची मदत जाहीर केली.
-
पुणे : खाकी वर्दी घालून PSI असल्याचा बनाव करणाऱ्या तरुणीला अटक
खाकी वर्दी घालून PSI असल्याचा बनाव करणाऱ्या तरुणीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाचा गणवेश परिधान केल्याचे समोलस आले आहे. समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण असे या तरूणीचे नाव आहे.
-
जळगाव : आमदार-खासदारांचे वेतन कपात करून मदत देण्याची मागणी
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या रावेर तालुक्यातील निरूळ शिवारात नुकसानग्रस्त केळीबागांची पाहणी करीत असताना एका आपद्ग्रस्त शेतकर्यांना केंद्र व राज्य सरकारकडून विशेष पॅकेज द्या अशी मागमी केली. तसेच पॅकेज शक्य नसेल तर आमदार-खासदारांचे एकेक वेतन कपात करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी केली.
-
जालना : रेल्वे स्थानक परिसरामध्ये एमडी मेफेडोन नावाचे ड्रग्स जप्त
जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्स जप्त केलं आहे. जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये एमडी मेफेडोन नावाचे 50 हजार रुपये किमतीचे 2.61 ग्रम ड्रग्स कदीम जालना पोलिसांनी जप्त केलं. या प्रकरणी पोलिसांनी ड्रग्स डीलर अफरोज जाफर शेख चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
-
नांदेड – बनावट आणि भेसळयुक्त खताचा साठा जप्त
नांदेडच्या भोकर तालुक्यातील बल्लाळ तांडा येथे कृषी विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने रात्री 8 वाजता छापा टाकून बनावट आणि भेसळयुक्त खताची 60 पोती जप्त केली आहेत. शेतकऱ्यांकडून फोन पेद्वारे आगाऊ रक्कम घेऊन विना पावती खत विक्री करून शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
-
धाराशिवच्या प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमधील बिर्याणीत आढळले मेलेले झुरळ
धाराशिव- धाराशिवच्या प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हॉटेलमधील बिर्याणीत मेलेले झुरळ आढळून आले आहे. झुरळ निघाल्याची तक्रार केल्यानंतर ग्राहकाला हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
नागपुरात कृषी केंद्राच्या दुकानात शेतकऱ्यांची मोठी गर्दी
नागपूर – पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांची बियाणे घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कृषी केंद्राच्या दुकानात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांकडून कापूस आणि सोयाबीनच्या पिकाच्या बियाणांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
बियाणांच्या भावात फार फरक पडला नसला तरी खताचे भाव आखाती युद्धामुळे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. -
25 दिवसापासून पुण्यातील वडगाव शेरी, येरवडा परिसरात दूषित पाणीपुरवठा, राष्ट्रवादीचे आंदोलन
गेली 25 दिवसापासून पुण्यातील वडगाव शेरी, येरवडा परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्याच्या बॉटल घेऊन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये आंदोलन केले आहे.
-
मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयामुले प्रसाद लाड यांनी मानले फडणवीस यांचे आभार
मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक हितासाठी राज्य शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
-
भाईंदरमध्ये फक्त ३ तासांत नवघर पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा थरार
भाईंदरमध्ये फक्त ३ तासांत नवघर पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा थरार
कांदळवनात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली
जुना रागातून मित्रानेच मित्राला दारू पाजली अन् दगडाने ठेचून मारलं
मुख्य आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात
-
नागपूरच्या काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात
नागपूरच्या काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात
सकाळ पासून ढगाळ वातावरण
मात्र उन्हाचे चटके आणि उकाडा कायम
हवामान विभागाने वर्तविला होता पावसाचा अंदाज
उन आणि पावसाचा खेळ सुरू
-
जळगावच्या एमआयडीसीमधील कुलर कंपनीला भीषण आग
जळगावच्या एमआयडीसीमधील कुलर कंपनीला भीषण आग
एमआयडीसीमधील एल सेक्टरमध्ये असलेल्या जय इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग
भीषण आगीमुळे मोठे धुराचे तसेच आगीचे लोट
घटनास्थळी जळगाव महापालिकेचे अग्निशमन बंब दाखल
पाच ते सहा अग्निशमन बंबांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
-
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक अर्जाच्या आक्षेपावर सुनावणी सुरू
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक अर्जाच्या आक्षेपावर सुनावणी सुरू झाली असून, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, आमदार रंजना (संजना ) जाधव, आमदार रमेश बोरनारे, समीर सत्तार, मंत्री संजय शिरसाट, हर्षदा शिरसाठ यांच्यासह अन्य उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. यावर आता आक्षेपकर्त्यांचे व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत उमेदवारी अर्जावर अंतिम निर्णय जाहीर होणार आहे.
-
अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी; शोधमोहीम सुरू
नवी मुंबई, अटल सेतू पुलावरून समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
-
आमदार प्रकाश सुर्वेंच्या वतीने शासकीय कामांसाठी विशेष शिबिर
मगाठाणे विधानसभेतील नागरिकांची शासकीय कामे एकाच छताखाली मार्गी लागावीत, यासाठी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना त्रास
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि वेगवेगळ्या शासकीय विभागाचे कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याच्या मुद्द्यावरून आज भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिक्षक मुख्यालय राहत नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ढासाळलेली आहे. त्यासोबतच आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक गावात मुख्यालय राहत नसल्यामुळे सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.
-
राजेंद्र जैन यांच्या राज्यसभा उमेदवारीवर लाखांदूरमध्ये जल्लोष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
-
गोंदियातील महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर
गोंदियातील महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर. शिवसेना जिल्हाप्रमुखांनी भाजपविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. भाजपकडून त्रास दिला जात असल्याचा सोनू कुथेंचा आरोप
-
दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात
दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात… 23 पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित… उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित
-
पुणे पार्टीत सहभागी झालेल्या मुलांच्या आई – वडीलांना पुणे पोलीस बोलवून घेणार
पुणे पार्टी प्रकरणात मोठी अपडेट. या पार्टीत सहभागी झालेल्या मुलांच्या आई – वडीलांना पुणे पोलीस बोलवून घेणार. सर्वांच्या आई – वडीलांना आपली मुलं मध्यरात्री उशिरा पार्टीमध्ये सहभागी होत आहेत याची माहिती दिली जाणार. या पार्टीत 3 अल्पवयीन मुलं देखील सहभागी झाली असल्याची पोलिसांची माहिती
-
ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटलांचा बाळ मानेंवर निशाणा
ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटलांचा बाळ मानेंवर निशाणा. बाळ मानेंवर बोलताना बबन पाटलांची जीभ घसरली. हरला तरी लढतो तोच शिवसैनिक, बबन पाटलांचं वक्तव्य
-
महायुतीचे सर्व नेते आमदार व नगरसेवक माझ्या पाठीशी – नंदकिशोर महाजन
जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी कायम असली तरी महायुतीचे सर्व नेते आमदार व नगरसेवक माझ्या पाठीशी आहेत. असा विश्वास जळगाव विधान परिषदेचे महायुतीतील भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी बोलताना व्यक्त केला.
बंडखोर रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम असली आणि नसली तरी सर्व नेते माझ्या पाठीशी असल्याने मीच विजय होईल असं नंदकिशोर महाजन म्हणाले.
-
धाराशिव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाची जोरदार एंट्री
धाराशिव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाची जोरदार एंट्री. पहिलाच पावसात नदी नाल्यांना पाणी तर तेरणा नदी वाहू लागली
तीव्रतेचे ऊन आणि उखाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा कळंब वाशी आणि उमरगा परिसरात जोरदार पावसाची हजेरी, शेतातही पाणी साठलं.
-
मुंबईत पाणी संकट अधिक गडद; टँकर सेवा बंद होण्याची शक्यता
मुंबईत पाणी संकट अधिक गडद; टँकर सेवा बंद होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील पाणीसाठा केवळ 40 दिवस पुरेल इतकाच शिल्लक असताना मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनने रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून टँकर सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.
टँकर सेवा बंद झाल्याने मुंबईतील पाणी संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नव्या नियमांविरोधात टँकर चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
-
दिल्लीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू
दिल्लीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू. एकनाथ शिंदे यांच्या ऊपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे. देशभरात शिवसेना कशी काम करतेय याचा एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत. पंजाब निवडणुक शिवसेना स्वबळावर लढू शकते का ? यावरही चर्चा होईल असं समजतं.
-
सोलापूर-बार्शी राज्य मार्गांवर दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात,1 ठार
सोलापूर-बार्शी राज्य मार्गांवर दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला. – सोलापूर-बार्शी राज्य मार्गांवरील कारंबा गावाजवळ हा भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. दुचाकीवरील दोघेही कारंबा गावचे रहिवासी आहेत. आज सकाळी शेतात जात असताना ट्रकने दिलेल्या जोरदार धडकीमुळे अपघात झाल्याचे समजते.
-
शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रश्मी ठाकरे ‘शिवतीर्थ’वर दाखल
शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रश्मी ठाकरे तसेच ‘शिवतीर्थ’वर पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
शेतीच्या वादातून दोन गट भिडले
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कोथळा गावातील घटना. हाणामारीच्या घटनेत काही जण जखमी. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल. अनेक दिवसापासून दोन कुटुंबात शेतीचा वाद सुरु होता. अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही. व्हिडिओ समाज माध्यमावर होतोय व्हायरल.
-
विनंती करणे हा 302 चा गुन्हा नाही – उदय सामंत
नाशिक, जळगावचा प्रश्न लवकर निकाली निघेल. विनंती करणे हा 302 चा गुन्हा नाही. नाशिकमध्ये उदय सामंत गिरीश महाजनांच्या भेटीला. दबाव टाकायचा असतो तर मीटिंगला आलो नसतो असं उदय सामंत म्हणाले.
-
गोकुळ गीतेंवर कोणीही दबाव टाकलेला नाही – उदय सामंत
दबाव कसा टाकतो त्याचं चांगलं ज्ञान मला आहे. संयमाने मी बोलतोय. गोकुळ गीतेंवर कोणीही दबाव टाकलेला नाही. विधान परिषद निवडणुकीच्या रणनितीला वेग. नरेंद्र दराडे महायुतीचे उमेदवार आहेत.
-
पीक नुकसानीची पाहणी करताना रक्षा खडसे संतापल्या
रावेर लोकसभा क्षेत्रात केळी पिकाच्या नुकसानीची केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केली पाहणी. पाहणी दरम्यान पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवर बोलताना संतापल्या. वारंवार सांगून 100% नुकसानीचे पीक विमा कंपनीकडून पंचनामे केले जात नसल्याने कमिशनरकडे तक्रार करण्याचा इशारा. या संदर्भात कृषिमंत्र्यांना ही रक्षा खडसेंनी फोन केला.
-
कुट्टीच्या गोदामाला भीषण आग
जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोंडखेल गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका मोकळ्या ठिकाणी ठेवलेल्या कुट्टीच्या गोदामाला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी हा या कुट्टी पासून टाकाऊ वस्तु तयार करायचा.
-
नेप्ती कांदा बाजारात कांद्याच्या दरात आज काहीशी वाढ
नेप्ती कांदा बाजारात कांद्याच्या दरात आज काहीशी वाढ. एका लिलावासाठी 70 हजार कांदा गोण्यांची आवक. चांगल्या कांद्याला 1700 रुपये, तर दोन नंबर कांद्याला 800 ते 1000 रुपये दर. अद्याप नाफेडचे खरेदी केंद्र सुरू नाही. नाफेडपेक्षा चांगला दर देण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न. मात्र कांद्याला किमान 2500 रुपये दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कमी दरामुळे शेतकरी अद्याप नाराज. वाढीव भावाची अपेक्षा कायम.
-
अधिवेशनात जर कर्जमाफीचा मुद्दा निकाली निघाला नाही तर पुन्हा रस्त्यावर लढू- बच्चू कडू
“नाही म्हणणाऱ्या सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली. हे शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे शक्य झालं. दोन लाखपर्यंत कर्जमाफी जाहीर झालं. ज्याच्याकडे अडीच लाख, तीन लाख आहे त्यांना माफ होणार नाही. मुख्यमंत्री यांना विनंती करतो की, महात्मा फुले कर्जमाफीसारखी कर्जमाफी करावी. सतत दोन वर्षे नियमित कर्ज भरलं तरच प्रोत्साहन निधी देणार. पण हे सगळ्यांना द्यावं आणि ते 50 हजार नाहीतर एक लाख रुपयांपर्यंत द्यावं. हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे प्रोत्साहन निधी देत राहावं अशी मागणी आहे. जुनी कर्जमाफी झाली त्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांना ती मिळाली नाही आणि प्रोत्साहन निधी पण मिळाला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहू. मागण्या मान्य नाही झाल्या तर लवकरच पुढच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू,” असं बच्चू कडू म्हणाले.
-
केंद्र सरकारने कर्जमाफी करणं आवश्यक- बच्चू कडू
शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देताना कोणतीही अट ठेवू नये. शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रोत्साहन निधी द्या. केंद्र सरकारने कर्जमाफी करणं आवश्यक आहे. सरकारने तीन टप्प्यांत कर्जमाफीची तरतूद करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
-
भाजपने नकार दिला, यात तथ्य नाही- छगन भुजबळ
मला राज्यसभेवर किंवा लोकसभेवर जायचं आहे, पण चार-पाच वेळा आलेल्या या संधी दुर्दैवाने हाती लागल्या नाहीत. यावेळी माझ्या मुलाला मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो, असं म्हटलं. परंतु या गोष्टी वरपर्यंत पोहोचवायला वेळ लागला असेल याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटचा एकच दिवस राहिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी विचार करू, असं ते म्हणाले. त्यामुळे भाजपने नकार दिला, यात तथ्य नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
-
छगन भुजबळांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय?- सुप्रिया सुळे
छगन भुजबळ यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांनी शून्यातून मोठं विश्व निर्माण केलं आहे. पवार साहेबांच्या सुखदु:खात ते सोबत होते, याची जाणीव मला आहे. ते दुखावले असतील तर याची मला माहीत नाही. पण आयुष्याच्या ज्या टप्प्यावर ते आहेत, त्यांनी जे त्याग केले आहेत, त्यानंतर जर त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय? भारताला उत्तम नेता मिळाला असता. ते दिल्लीत आले असते तर देशात एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं आहे.
-
इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार- शरद पवार
इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. कर्जमाफीतील कमतरता कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करायला हवेत. कमतरता आहे म्हणून लगेच फेकून द्या किंवा मंजूर नाही, ही टोकाची भूमिका घेऊ नये, असं ते म्हणाले.
-
मुंबईतील प्लाझा परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडाला आदळली
मुंबईतील बेस्ट बसला दादर येथे एक मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दादर येथील प्रसिद्ध प्लाझा सिनेमाजवळून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि ही भरधाव बस थेट रस्त्याकडेला असलेल्या एका झाडावर जाऊन जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये प्रवासी होते का आणि यामध्ये कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मदतकार्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्त बस बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे दादर परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला आहे.
-
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: तब्बल १ कोटी रुपयांचा महागडा डीजे पोलिसांकडून जप्त!
पुण्यात गाजलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत पार्टीतील डीजे सिस्टीम जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या या अत्याधुनिक डीजे साहित्याची किंमत तब्बल १ कोटी रुपयांच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचानामा केला असून, डीजेची सर्व महागडी उपकरणे आणि साहित्य एका टेम्पोमध्ये भरून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुणे शहर आणि संगीत वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
-
एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, राजकीय हालचालींना वेग
एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता असून १० जून रोजी होणाऱ्या एनडीएच्या संयुक्त बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान शिंदे शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजर राहून सर्व खासदारांशी संवाद साधणार आहेत, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही खासदारही दिल्लीत शिंदेंची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या महत्त्वपूर्ण दिल्ली वारीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
ठाणे खाडीत अवैध रेती उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; ४०.६५ लाखांचा मुद्देमाल नष्ट
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या भरारी पथकाने ठाणे खाडी परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे. ५ जून रोजी मुंब्रा, दिवा, बाळकुम, डावले आणि कल्याण खाडी परिसरात घालण्यात आलेल्या गस्तीदरम्यान नागला बंदर खाडीपात्रात पथकाला सुमारे १३ ब्रास रेती साठ्यासह एक ब्राज आणि एक सक्षम पंप आढळून आला; या कारवाईत पथकाने एकूण ४० लाख ६५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला आहे.
-
ठाणे महानगरपालिकेत भीषण आग; नगररचना विभागातील महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक
ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील शहर विकास (नगररचना) विभागाच्या कार्यालयाला आज सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यालयातून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे निदर्शनास येताच तातडीने अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णतः नियंत्रणात आणली आहे. मात्र, या आगीत शहर विकास विभागातील अनेक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आणि फाईल्स जळून खाक झाल्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे पथक कुलिंग ऑपरेशन आणि इतर आवश्यक कामांसाठी कार्यरत आहे.
-
इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, संजय राऊतांची माहिती
इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला इंडिया आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनिती ठरेल. इंडिया आघाडी विखुरलेली नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली
-
ठाणे खाडीत रेतीमाफी यांना महसूल विभागाचा दणका
40.65 लाखांचा मुद्देमाला जप्त करून नष्ट. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या भरारी पथकाने ठाणे खाडी परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफीयान विरोधात मोठी कारवाई करत सुमारे 40 लाख 65 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. 5 जून रोजी मुंब्रा, दिवा, बाळकुम , डावले आणि कल्याण खाडी परिसरात महसूल विभागाच्या पथकाने गस्त घातली होती ..यावेळी नागला बंदर खाडीपात्र तपासणी दरम्यान सुमारे 13 ब्रास रेती साठ्यासह एक ब्राज आणि एक सक्षम पंप आढळून आला..
-
ठाणे खाडी किनारा प्रकल्पामुळे पुराचा धोका वाढण्याची शक्यता
नैसर्गिक नाले अरुंद ,अनेक भाग जलमय होण्याची भीती. ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारल्या जात असलेल्या महत्त्वकांक्षी ठाणे खाडी किनारा कोस्टल रोड प्रकल्पामुळे परिसरातील नैसर्गिक जल निचरा व्यवस्था धोक्यात आल्याची बाब समोर आली आहे. ठाण्यातील बाळकुम ते गायमुख दरम्यान उभारल्या जात असलेल्या खाडी किनारा प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे..
-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही, ठाण्यात 60 टक्के स्कूल बसची तपासणी पूर्ण
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही. अधिकृत स्कूल बसच सुरक्षित पर्याय. ठाण्यात 60 टक्के स्कूल बसची तपासणी पूर्ण. राज्य शासनाने लागू. केलेल्या नियमावलीनुसार ठाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्कूल बस तपासणी मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थी वाहतुकीची परवानगी केवळ अधिकृत स्कूल बसनाच असून रिक्षा व इतर खाजगी वाहनांमधील विद्यार्थी वाहतूक अनधिकृत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे..
-
नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव जवळ कारला अपघात
कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकाला जाऊन धडकली. अपघातात तीन जन जखमी. जखमींना घोटी येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी केले दाखल.
-
आमदार विजयसिंह पंडितांनी अवैध वाळूचे तक्रार करताच कारवाई
बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारी 7 हायवा वाहने जप्त करण्यात आली आहेत. आमदार विजयसिंह पंडित यांच्या तक्रारीनंतर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. या धडक कारवाई दरम्यान वाळू उपसा आणि वाहतूक करणारा सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण गोदापट्ट्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
-
परभणी जिह्यातील मानवत परिसरातील एका शेतात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ
परभणी जिह्यातील मानवत परिसरातील एका शेतात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मानवी सांगाडा आढळला. अज्ञात मानवी सांगाड्याच्या अंगावर पांढरे शर्ट आणि काळी हाप पॅन्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मानवत पोलिसांकडून अज्ञात मानवी सांगाड्याचा शोध सुरू आहे.
-
धाराशिव जिल्ह्यातील 13 प्रकल्पातील पाणीसाठा राखीव, संभाव्य “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क
धाराशिव, भूम, वाशी आणि परंडा या तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या 13 प्रकल्पातील पाणीसाठा राखीव आहे. या प्रकल्पातून अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून निगराणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये 16 टक्केच पाणी साठा उपलब्ध आहे.
-
जालना जिल्ह्यात 8 ते 10 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज
मुंबई येथील प्रादेशिक हवामान क्षेत्राकडून जालना जिल्ह्याला आज पासून तर 10 जून पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. दरम्यान पावसामुळे शेतीमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित झाकून ठेवावा विजांपासून संरक्षण करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात
-
पोहता येत नसतानाही तलावात उतरवले… 12 वर्षीय आदित्यचा दुर्दैवी मृत्यू
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील आदित्य विकास ओलेकर वय 12 याचा आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. आदित्यला पोहता येत नसल्याची माहिती पालकांनी शाळेला पूर्वीच दिली होती. असे असतानाही त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत तलावात उतरविण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आदित्यचा जीव गेल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मृत विद्यार्थ्याचे वडील विकास ओलेकर यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलिसांनी शाळा प्रशासनाचे दीपक सदलगे आणि विजय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-
टीसीएसमधील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात अजून एक नवा खुलासा
मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. “होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर प्रशिक्षण दिले,” अशी कबुली तिने दिली. या कबुलीमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याची चर्चा सुरु आहे. तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून, सर्व गुन्हा संदर्भात नाशिक पोलिसांनी दोषारोप पत्र देखील दाखल केले आहेत.
-
मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलीच्या आईचं प्रियकरासोबत पलायन
मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलीच्या आईने प्रियकरासोबत पलायन करून स्वतःचेच लग्न उरकले आहे. जळगावच्या जामनेर शहरातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईंच्या प्रियकराने लग्नाचे फोटो ‘स्टेटस’ वर ठेवल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. फोटो पाहून संबंधित महिलेच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला. यानंतर हतबल महिलेचा पती थेट जामनेर पोलिस ठाण्यात पोहोचला. पाच दिवसांवर मुलीचा साखरपुडा आहे, समाजात आमची नाचक्की होत आहे. कृपया त्यांना ते मोबाइलवरील स्टेटस काढायला सांगा,’ अशी केविलवाणी विनंती पतीने पोलिसांकडे केली. पतीची ही व्यथा ऐकून पोलिसांनी तातडीने प्रियकराला पोलिस ठाण्यात बोलवून घेत योग्य ती समज दिल्यावर प्रकरणावर पडदा पडल्याची माहिती समोर येत आहे.
-
सोलापुरात काकानेच केला पाच वर्षीय पुतण्याचा खून
गळा आवळून खून केल्यानंतर पुतण्या घराच्या पत्र्यावरून पडल्याचा बनाव करत काकाने कांगावा केला. समर्थ कास्तार असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर अंकुश कास्तार असे आरोपी काकाचे नाव असून त्याला मंद्रूप पोलिसांनी ताब्यात घेतला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलिस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चिमुकल्या समर्थला काका अंकुशने घरी बोलावले आणि थोड्यावेळाने तो पत्र्यावरून पडल्याचा बनाव करत त्याला घरी घेऊन आला. त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान चिमुकल्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यात त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
-
धाराशिव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
कळंब, तुळजापूर, उमरगा,वाशी, भुम तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. कळंब तालुक्यातील कळंब लातुर रोडवरील खडकी येथील पर्यायी रस्ता गेला वाहून तर उमरग्यात देखील दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
सोलापुरात दीडशे कलाकारांनी पुन्हा जिवंत केला शिवराज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने अस्तित्व मेकर यांच्यातर्फे शिवबा ते छत्रपती या संगीत नृत्य नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतनाट्यातील राज्याभिषेक सोहळ्यामध्ये एकूण 150 कलाकारांनी एकत्रित येत आपला कलाविष्कार सादर केला. सोहळ्यात शिवकालीन इतिहास संस्कृती आणि मराठी अस्मितेचा अपूर्व काळ पाहून उपस्थित रसिक मंडळी भारावली. यामध्ये पाच वर्ष ते पन्नास वर्षे वयोगटातील कलाकारांचा यामध्ये सहभाग होता. ‘अस्तित्व मेकर’च्या वतीने कलाकारांचा 60 दिवस सराव सुरू होता. हा संगीत नृत्य नाट्य कलाविष्कार पाहण्यासाठी सोलापूरकरांनी तुडुंब गर्दी केली होती.