Maharashtra News LIVE: रोहित पवारांनी विधवा महिलेच्या घरी जाऊन साजरी केली दिवाळी, साडी चोळी दिली भेट

Maharashtra News LIVE: राज्यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Maharashtra News LIVE: रोहित पवारांनी विधवा महिलेच्या घरी जाऊन साजरी केली दिवाळी, साडी चोळी दिली भेट
breaking news live today on 8 nov 2026
| Updated on: Nov 08, 2026 | 9:35 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Nov 2026 09:25 AM (IST)

    रोहित पवारांनी विधवा महिलेच्या घरी जाऊन साजरी केली दिवाळी, साडी चोळी दिली भेट

    आमदार रोहित पवार अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावात विधवा महिलेच्या घरी जात दिवाळी साजरी करत आहेत.  विधवा महिलांना साडी चोळी देत दिवाळी करत आहेत. एका छोट्या कुटुंबात जाऊन रोहित पवार दिवाळी साजरी करत आहेत. महिलेच्या घरी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आहे. शोभा मुसके नामक महिलेला घरकुल आणि मदत द्यावी अशी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती.

  • 08 Nov 2026 09:23 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून नाशिकमध्ये जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल

    ठाकरे सेनेत शहर आणि जिल्ह्यात संघटनात्मक बदल. शहरातील विधानसभा मतदारसंघांसह विविध विभागांत जबाबदाऱ्यांचे वाटप. उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संघटक, समन्वयक तसेच उपमहानगरप्रमुख आणि संघटकपदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. पदाधिकाऱ्यांना विविध पदांची जबाबदारी देत अंतर्गत फेरबदल.


  • 08 Nov 2026 09:22 AM (IST)

    नागपूरच्या फुल मार्केट मध्ये लक्ष्मीपूजन साठी फुल घ्यायला मोठी गर्दी

    होलसेल फुल मार्केट मध्ये वाढली गर्दी. झेंडू फुलांचा दर 100 रुपये किलो तर शेवंती आणि इतर 400 रुपये किलो. नागपुरातील सीताबर्डी परिसरात असलेल्या फुल मार्केट मध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागातून असते फुलांची आवक. यावेळी मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने फुलांचे दर कोसळले. दिवाळीची मोठ्या प्रमाणात नागपुरात धामधूम सुरू आहे. नागपूरकर मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करत आहे.वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलांची वाढली मागणी , झेंडूच्या फुलांना मात्र मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

  • 08 Nov 2026 09:21 AM (IST)

    दिवाळीच्या उत्साहात डोंबिवलीचा फडके रोड गजबजला!

    दिवाळीच्या उत्साहात डोंबिवलीतील प्रसिद्ध फडके रोडवर डोंबिवलीकरांची मोठी गर्दी. आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान करून तरुण-तरुणी फडके रोडवर दाखल. सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी तरुणाईमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. फडके रोडवरील डोंबिवलीच्या आराध्य दैवत गणरायाचे दर्शन घेत नागरिकांनी दिवाळी साजरी केली. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत डोंबिवलीकरांनी सणाचा आनंद द्विगुणित केला.

आज दिवाळीचा पहिला दिवस असून आज लक्ष्मी पूजनही केलं जाणार आहे. या निमित्ताने आज अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आले आहे. राज्यासह अगदी जगभरातील काही भागात आज दिवाळी मोठ्या प्रमाणत साजरी केली जात आहे.

सोबतच अनेक राजकीय घडामोडी घटना दिसत आहेत. कोल्हापूर दूध उत्पादक संघ, गोकुळवरून राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळवर कब्जा करण्याचा सरकारचा उद्देश नसल्याचा दावा केला. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पुन्हा एकदा गजर सुरू झाला. राज्याचे राजकारण कूस बदलण्याची जोरदार चर्चा सुरू झाली. दोन्ही बाजूने विलीनीकरणाचे कार्ड पुन्हा फेकण्यात आले. त्यावर खमंग, खुशखुशीत चर्चा रंगली. ऐन दिवाळीत आरोप-प्रत्यारोपांची लड लागली. तर दाव्या-प्रतिदाव्यांचे बॉम्ब फुटले. यासोबतच राज्यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us