Maharashtra News LIVE : महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलाय – संजय राऊत

Maharashtra News LIVE : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आज भारतीय हवामान विभागाने राज्यभर पावसाच मोठा इशारा दिला. पुढील काही तास अत्यंत धोक्याची असणार आहेत.

Maharashtra News LIVE : महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलाय - संजय राऊत
Breaking news
| Edited By: | Updated on: Jul 29, 2026 | 9:45 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Jul 2026 09:43 AM (IST)

    महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलाय – संजय राऊत

    महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलाय. मुख्यमंत्री आंदोलक, विद्यार्थ्यांना शिव्या घालत आहेत. राज्यात शिक्षणात अराजकता माजलीय हे गंभीर आहे. सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत गांभीर्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

  • 29 Jul 2026 09:41 AM (IST)

    महिला बचत गटाचे चोरीला गेलेले 8 लाख 80 हजार रुपये मध्यप्रदेशातून जप्त

    जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील कोठा जहागीर या गावातील जय योगेश्वर महिला बचत गटाच्या महिलां भोकरदन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 9 लाख रुपयांची रक्कम काढून गावाकडे निघाल्या होत्या. मात्र या सर्व महिला चहा पिण्यासाठी थांबल्या असता वेळेचा फायदा काही घेत चोरट्यांनी ही रक्कम पिकअप वाहनातून लंपास केल्याची घटना घटना घडली होती. भोकरदन पोलिसांनी मध्य प्रदेश राज्यातून चोरी गेलेल्या 9 लाख पैकी जवळपास 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.


  • 29 Jul 2026 09:39 AM (IST)

    मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी

    जायकवाडी धरणातील पाणीसाठा 66.20 टक्क्यांवर. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ. जायकवाडी सरासरी 31 हजार 31 क्युसेक पाण्याची आवक सुरू. मात्र मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही.

  • 29 Jul 2026 08:50 AM (IST)

    60 हजार रुपयांची लाच घेताना राज्यकर विभागाची महिला अधिकारी ACB च्या जाळ्यात

    एका व्यक्तीचे इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 60 हजार रुपयांची लाच घेताना जालना शहरातल्या वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले,सुवर्णा रामेश्वर लोहिया असं या महिला अधिकाऱ्यांचे नाव असून तिच्यासोबत तिचा खाजगी कर सल्लागारही या जाळ्यात अडकलाय.तक्रारदार व्यक्तीचं जालना शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूचं दुकान असून जीएसटी कार्यालय जालना येथील लाचखोर महिला अधिकारी यांच्याकडून इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक झाल्या प्रकरणी शो कॉज नोटीस प्राप्त झालेली होती.त्यामुळे अनलॉक करण्यासाठी खाजगी कर सल्लागारामार्फत ही लाच मागितलेली होती त्यावेळी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.दरम्यान जीएसटी विभागातीलच महिला अधिकाऱ्यांनी लाच घेतल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे..

  • 29 Jul 2026 08:40 AM (IST)

    शिर्डीत गुरूपोर्णिमेचा उत्साह…

    साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी…साईबाबांना गुरू स्वरूप माणून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक…
    आज उत्सावाचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी…साई समाधीसह गुरूस्थान मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजले…उत्सवानिमित्त साई मंदिर , गुरूस्थान मंदिर , द्वारकामाई आणि चावडी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट…दाक्षिणात्य पद्धतीने केलेली सजावट भाविकांच लक्ष वेधून घेतेय..आज मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले असणार…साईबाबांची प्रतिमा आणि पादूकांची सुवर्णरथातून निघणार मिरवणूक…


  • 29 Jul 2026 08:30 AM (IST)

    आषाढीनंतर पंढरीत रंगली अनोखी स्वच्छतेची वारी..

    आषाढी एकादशीनंतर पंढरपूरात आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवा चेतनाच्या ५५० ते ६०० स्वयंसेवकांनी दोन दिवस विशेष स्वच्छता अभियान राबवले. चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दिंडी तळ, बसस्थानक आणि शहरातील विविध भागांतील सुमारे २ टन प्लास्टिक व कपड्यांचा कचरा गोळा करण्यात आला. अहिल्यानगरचे अमर कळमकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे १४वे वर्ष असून, प्रशासन आणि नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले..

  • 29 Jul 2026 08:25 AM (IST)

    भर पावसाळ्यातही नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

    येवला ,नांदगाव ,बागलाण ,मालेगाव , चांदवड देवळा सह सिन्नर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा. सर्वाधिक 29 टँकरद्वारे येवला तालुक्यात पाणीपुरवठा तर नांदगाव मध्ये 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा. टँकरद्वारे पाणीपुरवठा साठी येवला तालुक्यात चार तर नांदगाव मध्ये नऊ आणि मालेगाव मध्ये 16 विहिरींचे अधिग्रहण. येवला तालुक्यातील टँकरद्वारे ५५ फेऱ्या तर नांदगाव मध्ये 63 आणि मालेगाव मध्ये 33 टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा

  • 29 Jul 2026 08:20 AM (IST)

    नाशिक शहर कार्यक्षेत्रात 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

    कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शस्त्र व जमावबंदी आदेश केला जारी. नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास आणि रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नसणार. शस्त्र व जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

CJP कडून सरकारला मोठा इशारा देण्यात आला. विद्यार्थ्यांवरील छळ कमी झाला नाही तर आम्ही मोठे आंदोलन सरकारविरोधात करू, असे थेट कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेने म्हटले. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामध्येच पुन्हा एकदा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला. गडचिरोली आणि नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. आज रेड, ऑरेंज अलर्टही राज्यभरात हवामान विभागाने जारी केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार याचा आज साखरपुडा आहे. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा पार पडेल. राज्यासह देशातील राजकारणातील घडामोडींना वेग आला. काल सुनील तटकरे यांनी रात्री उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us