Maharashtra News LIVE : शिल्पा गवारी यांचे बंधू संतोष कलाटे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडत आहे.

Maharashtra News LIVE : शिल्पा गवारी यांचे बंधू संतोष कलाटे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट
लाइव्ह अपडेट्स
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Aug 31, 2026 | 7:13 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 31 Aug 2026 07:54 PM (IST)

    कर्जत : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवले

    मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चौक-कर्जत रस्त्यालगत शासकीय जमिनीवर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, महावितरण तसेच इतर विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

  • 31 Aug 2026 07:40 PM (IST)

    नागपूर : घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक

    नागपुरात विविध ठिकाणी 10 घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 तोळे सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तीन कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींसह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.


  • 31 Aug 2026 07:27 PM (IST)

    मुंबई पोलिसांनी ओबीसी समाजाच्या आंदोलनाला दुसऱ्यांदा परवानगी नाकारली

    मुंबई पोलिसानी ओबीसी समाजाच्या आंदोलनाला दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे. आज पुन्हा 2 तारखेला आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र आझाद मैदान पोलिसानी ही परवानगी नाकारली आहे. याआधी 1 तारखेला आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी करण्यात आला होता अर्ज तोही मुंबई पोलिसानी नाकारला होता.

  • 31 Aug 2026 07:12 PM (IST)

    नागपूर : महापालिकेकडून अतिक्रमणावर हातोडा

    नागपूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची मोहीम जोरदार सुरू असून मोठ्या प्रमाणात रोज अतिक्रमणावर हातोडा चालविला जात आहे. आज लकडगंज परिसरातील छापरू नगरमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून अनेक ठिकाणची अतिक्रमण पाडण्यात आली आहे.

  • 31 Aug 2026 06:55 PM (IST)

    शिल्पा गवारी यांचे बंधू संतोष कलाटे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट

     

    शिल्पा गवारी यांचे बंधू संतोष कलाटे आणि नणंद भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्याशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोनद्वारे संपर्क साधत त्यांना दिलासा दिला आहे. आपण आधीच पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्ता सोबत बोललो आहोत. अजूनही परत एकदा त्यांच्याशी बोलते,आमची ही इच्छा आहे ही केस फास्ट ट्रक कोर्टात लवकर जाऊ निकाल लागला पाहिजे अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी केली आहे.


  • 31 Aug 2026 06:41 PM (IST)

    कल्याण ग्रामीण-डोंबिवलीतील गोलवलीत भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन तरुण जखमी 

    कल्याण ग्रामीण-डोंबिवलीतील गोलवलीत भरधाव कारने एक्टीवा दुचाकीला धडक दिल्याने  दोन तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. धडकेनंतरही काही अंतरापर्यंत एक्टिवाची फरफट केल्याने संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली आहे.

     

  • 31 Aug 2026 06:15 PM (IST)

    गडचिरोलीतील देसाईगंजमध्ये विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा

    आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात हजारो गडचिरोलीतील देसाईगंजमध्ये नागरिकांनी मोर्चा काढला आहेत. धान बोनस त्वरित द्या, रानटी हत्तींचा बंदोबस्त करा,

    ओबीसी जनगणनेसह विविध मागण्यांसाठी शेतकरी, शेतमजूरांनी हा मोर्चा काढला आहे.

     

  • 31 Aug 2026 05:56 PM (IST)

    एनालॉग पनीरबाबत झोमॅटोची कठोर भूमिका, तर ते रेस्टॉरंट प्लॅटफॉर्मवरून काढणार

    ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांच्या, विशेषतः एनालॉग पनीर विक्रीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर अशा उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांचा वापर किंवा विक्री न करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • 31 Aug 2026 05:41 PM (IST)

    नेपाळ पूर: मृतांचा आकडा 900 च्या पार

    नेपाळमधील विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा वाढतच आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा 903 वर पोहोचला आहे.

  • 31 Aug 2026 05:23 PM (IST)

    डीजे बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत, म्हणाले..

    डीजेच्या वादात न पडता, सांस्कृतीक पद्धतीने गणेश्वोत्सव साजरा करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  यावरून त्यांनी पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचे संकेत दिले आहेत.  तसेच संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श घालून देण्याचं सांगितलं आहे.

  • 31 Aug 2026 05:14 PM (IST)

    सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्राम – देवेंद्र फडणवीस

    मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीजेपीवर हल्लाबोल केला. सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्राम असा उल्लेख त्यांनी केला. विरोधकांचं पुढचं टार्गेट कुंभमेळा असणार आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

  • 31 Aug 2026 05:04 PM (IST)

    जे विनाशाबद्दल बोलत होते ते बुडाले, भारत बहरला… जीडीपी वाढीवर पंतप्रधान मोदींची ‘एक्स’ पोस्ट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील भारताची 7.8 टक्के जीडीपी वाढ ही एक मोठी उंची असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळातही, तेलाच्या चढ-उतार होणाऱ्या किमती आणि पुरवठा साखळीतील आव्हाने असूनही भारताने मजबूत आर्थिक वाढ साधली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही उपलब्धी देशवासियांच्या सामूहिक शक्ती आणि प्रयत्नांचा परिणाम आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही भारताने आपल्या विकासाची गती कायम राखली आहे.

    आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “ज्यांनी वाईट विचार केला होता त्यांचा पराभव झाला आहे आणि भारत पुन्हा बहरला आहे!” त्यांनी 7.8 टक्के आर्थिक वाढीचे श्रेय देशाची मजबूत आर्थिक क्षमता आणि तेथील लोकांच्या सामूहिक प्रयत्नांना दिले.

  • 31 Aug 2026 03:53 PM (IST)

    परभणी जिल्ह्यात मागील 25 दिवसापासून पावसाचा खंड, शेतकरी चिंतेत

    परभणी जिल्ह्यात मागील 25 दिवसापासून पावसाचा खंड पडला आहे. पाण्याअभावी खरीपाची पीकं सुकून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.  पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली . तसेच सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

  • 31 Aug 2026 03:37 PM (IST)

    जेन झीला गरज होती, तेव्हा सरकारने बोलायला हवं होतं – अमित ठाकरे

    जेन झीला गरज होती, तेव्हा सरकारने बोलायला हवं होतं – अशी टीका मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली. जेव्हा तरूणांचं आंदोलन सुरू होतं, 20-21 विद्यार्थ्यांनी पेपरफुटीमुळे आत्महत्या केली  तेव्हा सरकारने बोलायला हवं. तेव्हा सरकार गप्प होतं, जेव्हा जेन झीची तारद दिसली, केंद्रातून राजीनामा आणला , आता त्यांना जेन झी- जेन झी करायचं आहे, असा टोला अमित ठाकरे यांनी लगावला.

  • 31 Aug 2026 03:33 PM (IST)

    मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलकाची सायकलवारी

    मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकाची सायकलवारी पहायला मिळत आहे.  इचलकरंजीवरून निघालेला मराठा आंदोलनक सायकलवरून आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला. या आंदोलकाने तब्बल 481 किमीचा प्रवास सायकलवरून केला.

  • 31 Aug 2026 03:28 PM (IST)

    बीड- समृद्धी महामार्गावरील रोड रॉबरी प्रकरणातील सूत्रधाराला अटक

    मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर 26ऑगस्ट रोजी झालेल्या रोड रॉबरी प्रकरणात बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील किरण अजिनाथ गायकवाड याचा सहभाग समोर आला. पोलिसांनी काल रात्री त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्ग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

  • 31 Aug 2026 03:21 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत डिजीटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालींचा शुभारंभ

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत डिजीटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला.  ‘ महा ई- HRMS’ प्रणाली गतिमान प्रशासनाचा चेहराल ठरेल  असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

  • 31 Aug 2026 03:09 PM (IST)

    जळगाव शहरातील घरफोडीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून दोघांना अटक

    जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील घरफोडीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली.  सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांची रोकड असा 50 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.  या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, विशाल मुरलीधर दाभाडे आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे, अशी आरोपींची नावं आहेत.  पोलिसांनी दोघांकडून सोन्याचे दागिने व  चांदी असा एकूण 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

  • 31 Aug 2026 02:57 PM (IST)

    मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकाची सायकल वारी

    मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकाची सायकल वारी. इचलकरंजीवरून निघालेला मराठा आंदोलक अंतरवालीमध्ये दाखल. 481 किमीचा सायकलवरून प्रवास करत अंतरवालीमध्ये दाखल. मागण्या मान्य न झाल्यास सायकल प्रवास मुंबईच्या दिशेने असेल- मराठा आंदोलकाची प्रतिक्रिया.

  • 31 Aug 2026 02:48 PM (IST)

    सांगलीत बँक मॅनेजरच्या घरात माजी सरपंचाकडून चोरी

    सांगलीत बँक मॅनेजरच्या घरात माजी सरपंचाकडून चोरी. बंद घरातून तब्बल 6 लाखांच्या मुद्देमालाची चोरी. अंकलीमधील माजी सरपंच राहुल पाटीलकडून चोरीचा मुद्देमाल जप्त, वैद्यकीय कारणामुळे आरोपीचा जामीन मंजूर

  • 31 Aug 2026 02:40 PM (IST)

    नवी दिल्लीत स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

    नवी दिल्लीत स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार. ड्रायव्हर आणि कंडक्टरला सामूहिक अत्याचाराच्या आरोपात अटक. काश्मिरी गेट परिसरात स्लीपर बसमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार. पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याची रहिवासी आहे

  • 31 Aug 2026 02:38 PM (IST)

    मालेगावात टिपू सुलतान फोटो प्रकरणी हिंदुवादी संघटना आक्रमक

    मालेगावात टिपू सुलतान फोटो प्रकरणी हिंदुवादी संघटना आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, गोमूत्र घेऊन उप महापौरांच्या कार्यालयाबाहेर येऊन शुद्धीकरण करण्याची मागणी.  फोटो काढल्याची खात्री करून द्या. गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन टिपू सुलतानाचा फोटो काढण्याची मागणी.  काहींना कार्यालयात येण्यास मज्जाव.

  • 31 Aug 2026 02:27 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 1 हजारांची आणि चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 650 रुपये. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपये…

  • 31 Aug 2026 02:17 PM (IST)

    शिवरायांच्या शेजारील मोदींचा फोटो हटवला

    पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आमित ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी कार्यलयात शिवरायांच्या फोटोशेजारी मोदींचा लावण्यात आलेला फोटो हटवला आहे. यावेळी तेथील विद्यार्थी देखील आक्रमक भूमिकेत दिसले.

  • 31 Aug 2026 02:12 PM (IST)

    शिवरायांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो नको- अमित ठाकरे

    शिवरायांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो नको म्हणत अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप. पुण्यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अमित ठाकरे आक्रमक. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून अमित ठाकरेंचा संताप.

     

  • 31 Aug 2026 02:00 PM (IST)

    बँक व्‍यवस्थापकाच्या घरावर अंकलीच्या माजी सरपंचाने मारला डल्ला

    मिरज तालुक्यातील अंकली येथील माजी सरपंच राहुल अनिल पाटील याने विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका बँक व्यावस्थापकाच्या घरात घरफोडी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कारभारीच लुटेरा निघाल्याने खळबळ उडाली आहे. माजी सरपंच राहुल पाटील याला अटक केल्यानंतर त्याचा तात्काळ जामिनही मंजूर झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणाची पोलखोल एलसीबीच्या पथकाने केली असून स्वतःच तपास हाती घेतला आहे. मात्र माध्यमांपासून माहिती देण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहे.

  • 31 Aug 2026 01:40 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवाची सायकल वारी

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवा ली सराटीमध्ये गेल्या तीन दिवसापासून निर्णयाक आमरण उपोषण सुरू आहे. राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा समाज बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी मिळेल त्या वाहनाने येताना पाहायला मिळत आहे, मात्र जरांगे पाटलावर असलेले प्रेम दाखवण्यासाठी खरतर शब्दांची गरज नसते याचाच एक उदाहरण पाहायला मिळालं. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून इचलकरंजी वरून निघालेला मराठा समाज बांधव जवळपास 481 किलोमीटरचा प्रवास करत सायकलने अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा मी असाच सायकलवरून मुंबईला जाणार असल्याचाही इशारा या समाज बांधवांनी दिला

  • 31 Aug 2026 01:30 PM (IST)

    सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा मराठ्यांचं वादळ 100% मुंबईला धडकणार

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा गेल्या तीन दिवसापासून अंतरवाली सराटीमध्ये निर्णयक आमरण उपोषण सुरू आहे मात्र दुसरीकडे राज्यभरातून अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेल्या मराठा समाज बांधवांनी मुंबईला जाण्याचा जणू काही निर्धार केला आहे, सरकार मराठा समाजाला भूलथापा देऊन केवळ आश्वासनाचे गाजर दाखवतय असा आरोपही मराठा समाज बांधवांनी केलाय त्यामुळे मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील आणि शंभर टक्के मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकतील असा इशारा अंतरवाली सराटी मधून मराठा समाज बांधवांनी सरकारला दिला आहे.

  • 31 Aug 2026 01:20 PM (IST)

    पुण्यातील आरएसएस च्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक…..

    मनुस्मृतीचे दहन करण्याचा दिला होता इशारा मात्र मनुस्मृतीचे दहन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल. उत्तराखंड या ठिकाणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलं होतं. एका अर्थाने मलिकार्जुन करके यांचा अपमान त्या ठिकाणी झालं होतं याच निषेधार्थ आज काँग्रेसचे शहरातील युवा पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील आर एस एस च्या मोतीबाग या ठिकाणी आंदोलन झालं.

  • 31 Aug 2026 01:14 PM (IST)

    मंत्री अदिती तटकरेंकडे PRO म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

    मंत्री अदिती तटकरेंकडे PRO म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आशिष मेटे असं मृत तरुणाचं नाव आहे. भांडुपमध्ये इमारतीच्या आवारात चालताना मेटे अचानक खाली कोसळले. खाली कोसळ्यानंतर मेटे यांच्या डोक्याला मार लागला होता. याप्रकरणी भांडुप पोलिसांकडून तपास सुरु…

  • 31 Aug 2026 01:06 PM (IST)

    जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा.

    मोठ्या संख्येने जिल्हाभरातील वेगवेगळ्या आश्रम शाळांमधील आदिवासी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी मोर्च्यात सहभागी झाले आहेत. गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंशाने मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला १ कोटींची मदत देण्याची मागणी. Central Kitchen पद्धत तात्काळ रद्द करा, शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहांची नवीन इमारत बांधा, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यात देखील आता आश्रम शाळांमधील आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे.

  • 31 Aug 2026 12:55 PM (IST)

    मनुस्मृतीचे दहन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात

    पुण्यातील आरएसएस च्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक.. मनुस्मृतीचे दहन करण्याचा दिला होता इशारा मात्र मनुस्मृतीचे दहन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात. उत्तराखंड या ठिकाणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलं होतं.. एका अर्थाने मलिकार्जुन करके यांचा अपमान त्या ठिकाणी झालं होतं याच निषेधार्थ आज काँग्रेसचे शहरातील युवा पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील आर एस एस च्या मोतीबाग या ठिकाणी आंदोलन….

  • 31 Aug 2026 12:50 PM (IST)

    सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा मराठ्यांचं वादळ 100% मुंबईला धडकणार

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा गेल्या तीन दिवसापासून अंतरवाली सराटीमध्ये निर्णयक आमरण उपोषण सुरू आहे मात्र दुसरीकडे राज्यभरातून अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेल्या मराठा समाज बांधवांनी मुंबईला जाण्याचा जणू काही निर्धार केला आहे, सरकार मराठा समाजाला भूलथापा देऊन केवळ आश्वासनाचे गाजर दाखवतय असा आरोपही मराठा समाज बांधवांनी केलाय त्यामुळे मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील आणि शंभर टक्के मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकतील असा इशारा अंतरवाली सराटी मधून मराठा समाज बांधवांनी सरकारला दिला आहे.

  • 31 Aug 2026 12:46 PM (IST)

    मेहतांनी जर राजीनामा दिला तर लोक दिवाळी साजरी करतील- प्रताप सरनाईक

    “मेहतांनी जर राजीनामा दिला तर लोक दिवाळी साजरी करतील, तुमच्याच नेत्यांनी भूमाफिया म्हटलं,”  मेहता यांच्या आरोपावर प्रताप सरनाईक यांचा पलटवार

  • 31 Aug 2026 12:44 PM (IST)

    प्रदेश भाजप कार्यकरिणीनंतर उद्या भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडणार

    प्रदेश भाजप कार्यकरिणीनंतर उद्या भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.  अमित साटमांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, दादरमधील भाजप मुंबई कार्यालयात बैठक पार पाडणार आहे.

  • 31 Aug 2026 12:42 PM (IST)

    अमरावती मेंढपाळ बांधवांचा आंदोलन चिघळलं….

    अमरावती मेंढपाळ बांधवांचा आंदोलन चिघळलं….रस्त्यावर घोडे,मेंढ्या आणून चक्काजाम आंदोलन…अर्जुन महानर यांच्या आमरण उपोषणाला पाच दिवस होऊनही सरकार ने कुठलीही दखल घेतल्याने धनगर बांधव आक्रमक, मेंढपाळांच्या विविध मागणीसाठी अर्जुन महानर यांच्या पाच दिवसापासून सुरू आहे आमरण उपोषण… उपोषणामुळे अर्जुन महानर यांची प्रकृती खालावली..

  • 31 Aug 2026 12:37 PM (IST)

    पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर काँग्रेसचे

    पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांना आता पोलिसांच्या वॅनमध्ये टाकण्यात आले आहे.

  • 31 Aug 2026 12:32 PM (IST)

    मनुस्मृतीवरुन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

    मनुस्मृतीवरुन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुण्याच्या RSS च्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे.

  • 31 Aug 2026 12:28 PM (IST)

    भटके-विमुक्त समाजाच्या हक्क, सन्मान आणि न्यायासाठी आज मुंबईत महत्त्वाची परिषद!

    भटके-विमुक्त समाजाच्या परंपरागत वेशभूषा, पेहराव आणि समृद्ध संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडवत, हजारो बांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत ‘शिवसेना भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषद २०२६’ उत्साहात सुरू झाली आहे. ही गर्दी केवळ उपस्थितीची नाही…ही आपल्या हक्कांची, अस्मितेची आणि एकजुटीची ताकद आहे! परंपरा जपूया… हक्कांसाठी लढूया… विकासाची नवी दिशा घडवूया!

  • 31 Aug 2026 12:24 PM (IST)

    मालेगावात टिपू सुलतान फोटोप्रकरणी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

    मालेगावात टिपू सुलतान फोटोप्रकरणी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहेत, उपमहापौरांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

  • 31 Aug 2026 12:20 PM (IST)

    पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे बॅनर आता पालिकेने काढले

    पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे बॅनर आता पालिकेने काढले आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाचं काय? असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला होता.

  • 31 Aug 2026 12:16 PM (IST)

    शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांवरती भर उन्हात शाळेबाहेर बसण्याची वेळ, पालक ग्रामस्थ आक्रमक

    शिरूर तालुक्यातील चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीने आज टाळं लावल्याने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांवरती भर उन्हात शाळेबाहेर बसण्याची वेळ आल्याने पालक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे जागा मालकाने हि जमिन माझ्या नावावर असल्याने गावातील अंतर्गत राजकारणामुळे मला आता ही जागा शाळेसाठी द्यायची नाही अशी भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे ही जागा जर त्या व्यक्तीची असेल तर शासनाने त्याची मोजणी करून त्यांना त्यांची जागा काढून देऊन शाळेसाठी च्या जागेचा तोडगा काढावा अशी भूमिका ही ग्रामस्थांनी घेतलीय.

  • 31 Aug 2026 12:12 PM (IST)

    संजय राऊत हे गांडूळ- ज्योती वाघमारे

    ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “वीजेएनटी समाज विखुरलेला , त्यांच्यावर अनेक अन्याय , महिला भगिनींना अजूनही न्याय मिळत नाही. संजय राऊत हे गांडूळ , तो तरी जमीन सुपीक करतो पण राऊतांनी शिवसेनेचं वाटोळं केलं…. संजय राऊत यांनी आत्ता स्क्रिप्ट राईटर बनावं , त्यांचं कामात ते ऊत्तम. शिवसेनेचे सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे घेतात शिवसेना जोमाने पुढे जात आहे… महापौर पदाचा निर्णयही तेच घेतील … पक्ष विस्तारतोय…”

  • 31 Aug 2026 12:08 PM (IST)

    अशोक खरातच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात

    अशोक खरात सुनावणी प्रकरण. खरातच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात. सरकारी पक्षा तर्फे उज्ज्वल निकम कोर्टात दाखल. उज्ज्वल निकम पहिल्यांदाच सरकारी पक्षा तर्फे बाजू मांडणार  तर अशोक खताची बाजू राहुल कासलीवाल मांडणार, खरातला जमीन मिळतो का याकडे लक्ष लागलेल असणार आहे.

  • 31 Aug 2026 12:04 PM (IST)

    9 सप्टोबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडन दौरा

    9 सप्टोबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडन दौरा. लंडन सरकार कडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत दिला जाणार पुरस्कार. लंडन सरकार कडून एकनाथ शिंदे यांना निमंत्रण. कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकॉग्नेशन अवॉर्ड देण्यात येणार आहे, त्यासाठी शिंदे जाण्याची शक्यता आहे,

  • 31 Aug 2026 11:56 AM (IST)

    संस्थापकत्व म्हणजे पक्षावर कायमची मालकी नव्हे; उमेश पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला

    संस्थापकत्व म्हणजे पक्षावर कायमची मालकी नव्हे असे म्हणत उमेश पाटल यांनी पोस्ट केली आहे. तसेच त्यांची ही पोस्ट सुप्रिया सुळेंसाठी सूचक पोस्ट असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत शरद पवार पक्षाचे माजी आमदार रमेश कदम बोरीवलीमध्ये माध्यमांशी बोलणार आहेत.

  • 31 Aug 2026 11:40 AM (IST)

    रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी

    बालेवाडी ते भुजबळ चौक, वाकडच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.नवीन गाडीचा रील्स बनवण्यासाठी काही जण मुंबई बंगळूर रस्त्यावरून जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवीन वाहनाची रिल्स काढण्याच्या नादात पुणे बंगळूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहांनाच्या रांगा लागल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत.

  • 31 Aug 2026 11:30 AM (IST)

    आजपासून मुंबईत जायला सुरुवात करा; मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलकांना सल्ला

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. पण आता मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. त्यांनी आंदोलकांना 12 ऑगस्टपर्यंत मुंबईत जाण्याचा सल्ला दिला आहे.

  • 31 Aug 2026 11:20 AM (IST)

    उपोषण सोडणार नाही, मुंबईतच जाणार- मनोज जरांगे पाटील

    आजपासून मुंबईत जायला सुरुवात करा. मराठा मुंबईत आल्याचं कुणाला समजलं नाही पाहिजे. आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसात नेलं तर घाबरु नका. मित्राकडे, पाहुण्याकडे राहा, फक्त आझाद मैदानावर कुणी जाऊ नका. उपोषण सोडणार नाही. मुंबईतच जाणार असे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 31 Aug 2026 11:10 AM (IST)

    कंत्राटदाराच्या आत्महत्ये प्रकरणी आता 11 जणांवर गुन्हा दाखल

    खासगी कंत्राटदाराच्या आत्महत्ये प्रकरणी आता 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद हुले या खासगी कंत्राटदार व्यावसायिकाने आर्थिक तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता आत्महत्ये प्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 31 Aug 2026 10:55 AM (IST)

    औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरण : गुन्हे शाखेचे पथक करणार आरोपींच्या घराची झाडाझडती

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुंबई विशेष गुन्हे शाखेचे पथक आज पुन्हा नंदुरबारात दाखल होणार आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील यांना नंदुरबारात आणण्यात येणार आहे. ऋतुजा पाटील आणि अमृत पाटील यांच्या घराची झाडाझडती या अगोदर झालेली नाही आहे. त्यामुळे या आरोपींच्या समोर त्यांच्या घराची झाडाझडती केली जाणार आहे. यापूर्वी तपासादरम्यान कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना नंदुरबारात आणून चौकशी करण्यात आली होती.
    आज ऋतुजा पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील यांच्या घरांची झाडाझडती आणि चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

  • 31 Aug 2026 10:45 AM (IST)

    धनगर आरक्षणासाठी परभणीत एल्गार मेळावा

    धनगर आरक्षणासाठी सरकारला पुन्हा इशारा देण्यात आला आहे.  धनगर समाजाने 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार मेळावा आणि आंदोलनाची घोषणा केली.  नांदेड येथे पार पडलेल्या धनगर समाजाच्या बैठकीमध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली.

  • 31 Aug 2026 10:35 AM (IST)

    जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांचा बंदोबस्त

    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री चौकात सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला येण्याची शक्यता असल्याने वडीगोद्री चौकाला छावणीचे स्वरूप आलं आहे.  सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री चौकातून अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळत आहे.

  • 31 Aug 2026 10:22 AM (IST)

    भाजपच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात बैठक

    राज्य भाजप कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक होणार आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठकीआधी पाहणी केली. पुण्यात गणेश कला क्रीडा मंदिरात राज्य भाजप कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीत नेमकं निर्णय आणि चर्चा होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • 31 Aug 2026 10:14 AM (IST)

    जे ठाकरेंचे होऊ शकले नाही, मनोज जरांगेंचे कसे होईल; राऊतांची शिंदे गटावर टीका

    खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ‘परभणीचा मेळावा टाळावा अशी मनोज जरांगे यांची भूमिका होती. संजय जाधव यांना निवडून आणण्यात मनोज जरांगे यांची मोठी भूमिका होती. जे ठाकरेंचे होऊ शकले नाही, मनोज जरांगेंचे कसे होईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.  परंतु आता मनोज जरांगे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी पुढे सांगितले.

  • 31 Aug 2026 10:07 AM (IST)

    जळगावात सव्वा कोटींची ५ किलो एमडी पावडर जप्त

    जळगावात सव्वा कोटींची ५ किलो एमडी पावडर जप्त करण्यात आली.  मेहरुण आणि उस्मानिया पार्क परिसरातून दोघांना अटक करण्यात आली आहे.  मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने छापा टाकला.  रहिम ताहेर पिंजारी व सैय्यद मुशादूर अली मुमताज अली अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

     

  • 31 Aug 2026 10:05 AM (IST)

    मुंबईत न्याय व विकास परिषद; विविध गावांमधून समाजबांधव रवाना

    भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषदेसाठी जामनेर तालुक्यातून शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. जळगावच्या जामनेर तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव मुंबईकडे रवाना झाले आहे. मोरगाव, करमाड, नेरी, शेंदुर्णीसह विविध गावांतील शिवसैनिकांचा सहभाग आहे.  शिवसेना तालुकाप्रमुख अँड. भरत पवार यांच्या नेतृत्वाखाली सहभाग शिवसैनिक मुंबई रवाना झाले आहे.  संजय राठोड यांच्या संयोजनाखाली मुंबईत ‘भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषद होत आहे.

  • 31 Aug 2026 09:50 AM (IST)

    सायकल पार्किंग केल्याप्रकरणी सोसायटीचा अजब निर्णय

    दोन सभासदांना ११ वर्षांसाठी तब्बल १५ लाख ४५ हजार ७३० रुपयांचा दंड. सोसायटीचा निर्णय सहकार उपनिबंधकांनीही ठेवला कायम. मुंबई उच्च न्यायालयाने दंडाचा आदेश केला रद्द. सोसायटीच्या मनमानी कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे

  • 31 Aug 2026 09:40 AM (IST)

    तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या फेरीसाठी भाविकांची झुंबड..

    मेळा बस स्थानकावर अक्षरशः खिडकीतून उड्या मारत जागा पकडण्याची धडपड. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वरला मारली जाते प्रदक्षिणा. हजारो भाविक रात्रीतूनच त्र्यंबकच्या दिशेने होतात रवाना

     

  • 31 Aug 2026 09:30 AM (IST)

    जळगावमधील मानराज चौफुलीवर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे सुरू काम सत्ताधारी नगरसेवकांनी बंद पाडलं

    मुंबई नागपूर महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत नगरसेवक अमर जैन आणि नरेंद्र पाटील नगरसेवकांचा ठिय्या. अत्यंत वर्दळीचा चौक असूनही पर्यायी रस्ता सुरू न करता तसेच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत नगरसेवक अमर जैन आणि नरेंद्र पाटील यांनी बंद पाडले काम !

  • 31 Aug 2026 09:20 AM (IST)

    संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव मध्ये प्रशासन अलर्ट

    संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव मध्ये प्रशासन अलर्ट!पाझर तलाव, बंधाऱ्यांवर विशेष पथकांची केली नियुक्ती. प्रत्येक प्रकल्पाची दैनंदिन पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. जलसाठ्याची स्थिती, पाणी उपलब्धतेची तपासणी होणार. पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा रोखला जाणार असून अनधिकृत पंप, मोटार, पाइपलाइन आढळल्यास वीजपुरवठा खंडित करून कारवाई केली जाणार

     

  • 31 Aug 2026 09:05 AM (IST)

    लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं भीषण अपघात

    लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं भीषण अपघात घडला आहे, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या चार जणांना जोराची धडक देत फरफटत नेले आहे. या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले आहे. रेणापूर ग्रामीण रुग्णालया जवळ हा अपघात घडला आहे. मोटारसायकल रस्ता ओलांडताना ट्रकने जोराची धडक देत, फरफटत नेल्याची ही घटना आहे .

  • 31 Aug 2026 09:00 AM (IST)

    अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल उद्या येणार

    अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेत तीन बालकांचा होळपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला आठवडा पूर्ण झाला. आगीच्या घटनेचा तपास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा उद्या अहवाल येण्याची शक्यता आहे. आग कशामुळे लागली, त्या रात्री नेमकं काय झालं, या घटनेला जबाबदार कोण या बाबी अहवालातून समोर येणार आहे. आठ दिवसांपूर्वी पहाटे साडेतीन वाजता रुग्णालयातल्या नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला आग लागली होती.

  • 31 Aug 2026 08:50 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची मोठी गर्दी

    नाशिक- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटे पासूनच राज्यभरातील भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात 2 लाख भाविक येण्याची शक्यता आङे.

  • 31 Aug 2026 08:40 AM (IST)

    मनपातील महापौरपदासाठी शिंदे सेनेचं ऑपरेशन ‘मिशन टायगर’ सक्रिय- सूत्र

    मनपातील महापौरपदासाठी शिंदे सेनेचं ऑपरेशन ‘मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चार नेत्यांवर मिशन टायगरची जबाबदारी असून निलेश राणे, श्रिकांत शिंदे, राहूल शेवाळे आणि योगेश कदम यांच्यात सामना काॅल झाल्याची माहिती आहे. सव्वा वर्षानंतर महापौरपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे सेनेची संख्याबळ वाढवण्याची रणनीती आखणार आहे. ठाकरे गटातील नगरसेवकांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या भाजपकडे 88, शिंदे सेनेकडे 29 नगरसेवक तर ठाकरे सेनेकडे 64 नगरसेवक आहेत.

  • 31 Aug 2026 08:30 AM (IST)

    मराठ्यांच्या मराठा आरक्षणाचं काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरच्या माध्यमातून सवाल

    भारतीय जनता पार्टी पक्षाची प्रदेश कार्यकारणीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडत आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने पुण्यातील टिळक रोडवर ठिकठिकाणी मराठ्यांच्या मराठा आरक्षणाचा काय असा सवाल बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विखे यांनी उत्तर द्या, अशी मागणी बॅनरच्या माध्यमातून केली आहे.

  • 31 Aug 2026 08:19 AM (IST)

    समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलीस विभागाचं महत्त्वपूर्ण पाऊल

    समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलीस विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. महामार्गावरील चोरी, दरोडे तसंच लूटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष गस्त वाढविण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते दोन नवीन पोलीस वाहनांचं उद्घाटन करण्यात आले. या वाहनांद्वारे महामार्गावर नियमित गस्त घालून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे.

  • 31 Aug 2026 08:15 AM (IST)

    वांद्र्यात भरधाव गाडीची चिमुरड्याला धडक

    मुंबई- वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिमुरड्याला धडक दिली असून या भीषण अपघातात चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. महिला ड्राइव्हर मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वांद्रे इथल्या मेहबूब स्टुडिओ परिसरात हा अपघात झाला. भरधाव इनोव्हा कारने 8 ते 9 वर्षांच्या मुलाला चिरडलं. अंश रवींद्र गुप्ता याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारचालक मेघा रावल यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली.

  • 31 Aug 2026 08:13 AM (IST)

    नाशिक- भोंदूबाबा अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

    नाशिक- भोंदूबाबा अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी अशोक खरात सध्या कारागृहात आहे. मार्चमध्ये भोंदू अशोक खरातला अटक करण्यात आली होती. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. सरकारने ॲड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून जून महिन्यात नियुक्ती केली होती.

     

पुढील काही दिवस महामुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 3 ते 10 सप्टेंबरदरम्यान कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज असून 1 जून ते 30 ऑगस्टदरम्यान पालघरमध्ये सरासरीहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली. ठाणे, रायगड आणि मुंबईत सरासरीच्या आसपास पाऊस पडला. तर पुढील तीन ते पाच दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. ⁠जुलैमध्ये सरासरीहून अधिक पाऊस पडला होता, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मंदावला आहे. पावसाची तूट निर्माण झाल्याने काही भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेतील महापौरपदासाठी शिंदे सेनेचं ऑपरेशन ‘मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चार नेत्यांवर मिशन टायगरची जबाबदारी असून निलेश राणे, श्रिकांत शिंदे, राहूल शेवाळे आणि योगेश कदम यांच्यात काॅल झाल्याची माहिती आहे. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us