Maharashtra News LIVE : मराठा आरक्षणाबाबत रात्री 2 वाजेपर्यंत ‘वर्षा’वर झाली बैठक

Maharashtra News LIVE : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. आरक्षणाबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत वर्षा या निवासस्थानी बैठक झाली.

Maharashtra News LIVE : मराठा आरक्षणाबाबत रात्री 2 वाजेपर्यंत वर्षावर झाली बैठक
टीव्ही ९ मराठी लाइव्ह अपडेट्स
Image Credit source: Tv9
| Updated on: Sep 08, 2026 | 9:50 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Sep 2026 09:50 AM (IST)

    यवतमाळच्या भांबराजा टोलनाक्यावर सशस्त्र धुडगूस

    यवतमाळच्या भांबराजा टोलनाक्यावर कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. 2 जणांनी सशस्त्र धुडगूस घातला.  ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील भांबराजा टोलनाक्यावरील ही घटना आहे.  आयटी सीस्टम इंडीकेटर कर्मचारी संजित महतो यांच्या तक्रारीवरून दोघाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला.

  • 08 Sep 2026 09:45 AM (IST)

    एकनाथ शिंदे लंडनासाठी मध्यरात्री रवाना होणार

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मध्यरात्री १.३० वाजता लंडनसाठी रवाना होणार आहेत.  त्यापूर्वी शिवसेनेच्या एयरपोर्ट युनियन आॅफिसला  भेट देणार आहे. आज पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे लंडनला रवाना होणार आहेत.  लंडनला पुरस्कार सोहळ्याला एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


  • 08 Sep 2026 09:35 AM (IST)

    जालन्यातील कुणबी प्रमाणपत्राच्या वितरणाची आकडेवारी समोर

    जालना जिल्ह्यात 18 हजारापेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वितरण झाले आहेत. या प्रमाणपत्र वितरणाची आकडेवारी समोर आली आहे.  प्राप्त झालेल्या 18 हजार 262 अर्जापैकी 18 हजार 243 अर्ज मंजूर तर 19 अर्ज प्रशासनाकडून नाकारण्यात आले आहेत. तर 2 सप्टेंबर च्या शासन निर्णयानुसार 421 अर्ज प्राप्त झाले. न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 1597 अर्ज दाखल झाले आहेक.  त्यापैकी 1 हजार 5 अर्ज वैध झाले.

  • 08 Sep 2026 09:18 AM (IST)

    वाढत्या कांदाच्या दरावरून केंद्राचा मोठा निर्णय

    केंद्र सरकारच्या बफर स्टॉकमधील १ लाख २१ हजार मेट्रिक टन कांदयातून ४,३५० मेट्रिक टन कांदा देशातील प्रमुख शहरांकडे रवाना केला.
    लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटीसह प्रमुख शहरांना कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे.  किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ३५ रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा निर्णय घेण्यात आला.  लासलगावहून दिल्ली तर मनमाडहून चेन्नई रेल्वेच्या माध्यमातून पाठवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा रोष निर्माण झालाय.
    आता ट्रकच्या माध्यमातूनही बफर स्टॉकमधील कांद्याची वाहतूक सुरू आहे.

  • 08 Sep 2026 09:10 AM (IST)

    रोहित पवारांचा प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात एल्गार

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन रोहित पवार यांचा प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार आहेत.  मोरगाव अर्जुनी आणि तिरोड्यात आज भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. रोहित पवार सत्ताधारी पक्षांवर काय टीका करतात याकडे लक्ष लागलं आहे. रोहित पवारांनी काल पुण्यातही विद्यार्थी मोर्चाला हजेरी लावली.


  • 08 Sep 2026 09:02 AM (IST)

    नाशिक- मंडप शुल्कातून गणेश मंडळांची सुटका

    नाशिक- मंडप शुल्कातून गणेश मंडळांची सुटका झाली आहे. महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीसाठी आकारण्यात येणारं शुल्क माफ करण्यात आलं. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत उत्सव आयोजनाचा खर्च वाढल्याने निर्णय घेण्यात आला आहे. गणेश मंडळांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महापालिकेचा निर्णय आहे.

  • 08 Sep 2026 08:59 AM (IST)

    नाशिक पोलीस आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक

    नाशिक पोलीस आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात सकाळी १० वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या DJ च्या मुद्द्यावर आज काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे. नाशिकमध्ये डीजे वाजणार का नागपूर आणि सोलापूर प्रमाणे डीजे वर बंदी घालणार याकडे लक्ष आहे.

  • 08 Sep 2026 08:58 AM (IST)

    नाशिकमध्ये आज मराठा संघटनांची राज्यस्तरीय महत्त्वाची बैठक

    नाशिकमध्ये आज मराठा संघटनांची राज्यस्तरीय महत्त्वाची बैठक आहे. SEBC आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटना आक्रमक झाली आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना SEBC मधूनच आरक्षण मिळतो. सरकारने SEBC आरक्षण टिकवून ठेवावं असा आग्रह मराठा संघटनांचा  आहे. मराठा समाजाचे SEBC आरक्षण घालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आहे.

  • 08 Sep 2026 08:57 AM (IST)

    सोमवारी रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाबाबत चर्चा

    काल रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. वर्षावरील बैठक रात्री दोन वाजता संपली. या बैठकीत प्रामुख्याने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी चर्चा झाली. तसंच मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला आहे. बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे,रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड हे नेते उपस्थित होते.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. वर्षावरील बैठक रात्री दोन वाजता संपली. या बैठकीत प्रामुख्याने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी चर्चा झाली. तसंच मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आहे. बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे,रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड हे नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला नांदेडच्या दोन आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us