AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या, आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ठाण्यातही कोसळणार सरी; या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रातही आज काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो असा इशारा देण्यात आला

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या, आज  वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ठाण्यातही कोसळणार सरी; या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट
| Edited By: | Updated on: May 09, 2024 | 3:33 PM
Share

मुंबई, ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रातही आज काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. आज रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या 24 तासात देशात कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पाऊस, असं चित्र पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासांत पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) आणि हिमवृष्टी (Snowfall) तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या भागात पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, हिंगोली या भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने, पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच देशभरात मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह काही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Follow Us
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा