AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, अनेक ठिकाणी मुसळधार बरसणार, कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट?

महाराष्ट्रातील रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झाले आहेत आणि काही अपघातही घडले आहेत.

महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, अनेक ठिकाणी मुसळधार बरसणार, कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट?
rain
| Updated on: Jun 17, 2025 | 1:40 PM
Share

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज अनेक ठिकाणी पावसााने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात पाऊस होताना दिसत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून पुढील २४ तासांकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

कुठे-किती पावसाची नोंद?

राज्यात कालपासून आज १७ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७, पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जगबुडी नदी इशारा पातळीवर

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.

पाटण- चिपळूण राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

सातारा जिल्ह्यातील पाटण- चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी, स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.