मोदींनी अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग तुटला, पुणे महापौरांचं स्पष्टीकरण

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र या पुतळ्यावरील मेघडंबरीचा भाग तुटल्याचं सोमवारी संध्याकाळी उघडकीस आलं होतं

मोदींनी अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग तुटला, पुणे महापौरांचं स्पष्टीकरण
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ
Image Credit source: फेसबुक
| Edited By: | Updated on: Mar 08, 2022 | 1:19 PM

पुणे : पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मेघडंबरीसोबत घडलेल्या दुर्घटनेबाबत अखेर महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विद्युत रोषणाईच्या वेळी मेघडंबरीला धक्का लागला, त्यामुळे हा अपघात झाल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांमध्ये मेघडंबरीचा तो भाग लावण्यात येईल, असं पुण्याच्या महापौरांनी स्पष्ट केलं. मात्र यामध्ये राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Pune) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं.

काय आहे प्रकरण?

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र या पुतळ्यावरील मेघडंबरीचा भाग तुटल्याचं सोमवारी संध्याकाळी उघडकीस आलं होतं. सजावटीचा भाग काढताना मेघडंबरीला धक्का लागून ते तुटल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप काँग्रेस, मराठा सेवा संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. यावेळी भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यात फेसबुक लाईव्हवरून जुंपल्याचं पाहायला मिळालं. महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा भाग तुटताच जगताप यांनी फेसबुक लाईव्ह करुन भाजपवर टीका केली होती, तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक लाईव्ह करत खालच्या पातळीवरचं राजकारण करत असल्याचं टिकास्त्र सोडलं आहे.

महापौरांचं फेसबुक लाईव्ह

पंतप्रधानांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

शिवरायांच्या पुतळ्याची वैशिष्ट्यं

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुणे शहरातील पहिला सिंहासनाधीश पुतळा
  2. एकूण 2 टन ब्रॉंझचा पुतळा तयार करण्यास 6 महिन्यांचा कालावधी
  3. साडे दहा फूट उंचीचा पुतळा
  4. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वखर्चातून पुतळा तयार केला

संबंधित बातम्या :

Vivek Khatavkar यांनी साकारला शहरातील पहिला सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा