AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मृत्यूचा हायवे, शिर्डीच्या वाटेवर असलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 6 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात आज शिर्डी, नांदुरा आणि करमाळा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रात मृत्यूचा हायवे, शिर्डीच्या वाटेवर असलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 6 जणांचा मृत्यू
accident
| Updated on: May 13, 2025 | 8:42 AM
Share

राज्यात आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे. शिर्डी, नांदुरा आणि करमाळ्याजवळ झालेल्या या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या कारला अपघात

हैदराबादहून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या एका विना नंबरच्या हायवाने भाविकांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ५ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला होता.

या अपघातातील मृत व्यक्तींना आणि जखमींना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढावे लागले. सध्या जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातानंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, वडीगोद्री परिसरात विना नंबरच्या हायवाच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या हायवा कार बेफाम वेगात चालतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नांदुराजवळ कार आणि ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा शहराजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आर्टिका कारमधील तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील अडकलेल्या जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तास लागले.

करमाळ्याजवळ कार झाडावर आदळल्याने एकाचा मृत्यू, पाच जखमी

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-कुर्डुवाडी रोडवर वरकुटे गावाजवळ आज पहाटे साडेचारच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. कारमधील सर्व प्रवासी कर्नाटकातून गुजरातच्या दिशेने निघाले होते. या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यानंतर करमाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.