AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : आनंद दिघे असते तर निरूपमच्या कानाखाली लावली असती, एकनाथ शिंदेंनी एवढं तरी करावं, मनसेने डिवचलं

महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयावरून वाद पेटला असून, संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवला आहे. मनसेने या वादात उडी घेत निरुपमवर टीकेची झोड उठवली आहे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेच्या नेत्यांनी शिंदे सरकारला बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारांची आठवण करून देत घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

MNS : आनंद दिघे असते तर निरूपमच्या कानाखाली लावली असती, एकनाथ शिंदेंनी एवढं तरी करावं, मनसेने डिवचलं
मनसे नेते संदीप देशपांडे
| Updated on: Apr 25, 2026 | 9:50 AM
Share

महाराष्ट्रात राहणारे, काम करणारे रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यांना ग्राहकाशी मराठीत बोलावं लागणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यावरूनच राज्यातलं वातावरण पेटलं आहे. शिंदे गटातूनच या निर्णयाला विरोध होताना दिसत असून संजय निरुपम यांनी या सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र मराठीच्या सक्तीच्या मुद्यावरून आता मनसेनेही उडी घेतली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा या मुद्यावरून निरूपम यांच्यावर निशाणा साधला आहे, तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही घेरलं आहे. एकनाथ शिंदे सांगतात की बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार मानणारे आमचं सरकार आहे, मग भैयाला पाठिशी घालणारं , मराठी लोकांना अटक करणारं, तुमचं कोणत्या विचाराच सरकार आहे ? असा सवाल विचारत त्यांनी शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

निरूपमला काय प्रॉब्लेम आहे ?

मराठीच्या मुद्यावरून संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी सजयन निरूपम यांच्यावर कडाडून टीका केली. पोलीस बायस्ड आहेत यात शंका नाही. संजय निरूपम सारख्या भैया लोकांना का पाठिंबा देताहेत, हे आम्हाला कळत नाहीये. एकीकडे एकनाथ शिंदे सांगतात की, आमचं सरकार आहे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार मानणारं आहे. पण तरीही भैयाला पाठीशी घालता आणि मराठी लोकांना अटक करता, मग तुमचं सरकार नक्की कोणत्या विचारांचं आहे ? आम्ही किती प्रेमाने सांगायचं. जोपर्यंत आम्ही प्रेमाने सांगत होतो, तोपर्यंत तुम्ही तुम्ही शिकत नाही, मग आता आम्ही सांगतोय तर शिका . आम्हाला काही उत्तर भारतीय भेटतायत, ते म्हणतायत की आम्ही मराठी शिकायला तयार आहोत, मग संजय निरूपमला काय प्रॉब्लेम आहे ? असा थेट सवाल देशपांडे यांनी विचारला.

आनंद दिघे असते तर निरूपमच्या कानाखाली लावली असती

तुमच्यात हिंमत असेल तर एकदा मुंबई बंद करून दाखवाच. आम्हाला बघायचं आहे की मुंबई बंद करण्याची ताकद भैयामध्ये आहे का? असं थेट आव्हानही देशपांडे यांनी दिलं. ते लोक म्हणताहेत की, आम्हाला मराठी भाषा शिकायची आहे. भाषा शिकतील तर इथे रहा. अटक करायची असेल तर आम्हाला करतात, संजय निरूपमला अटक करत नाहीत असंही देशपांडे यांनी सुनावलं. कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. आनंद दिघे असते तर त्यांना निरूपमच्या कानाखाली लावली असती, एकनाथ शिंदे आहेत त्यांनी एवढं तरी करावं, असं म्हणत देशपांडे यांनी शिंदेंनाही घेरण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच