Maharashtra Election News LIVE : राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांसोबत जाण्याची मानसिकता नाही – योगेश कदम

Live Updates In Marathi : पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी मिळकत करात दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मांडला आहे. एका बाजूला मोठ्या थकीत मिळकतकरांसाठी अभय योजना राबवायच्या आणि दुसरीकडे नियमित कर भरणाऱ्यांनांवर दहा टक्के करवाढ लादायची हा प्रकार अन्यायकारक आहे अशा शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Election News LIVE : राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांसोबत जाण्याची मानसिकता नाही - योगेश कदम
लाइव्ह अपडेट्स
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Feb 03, 2026 | 8:54 PM

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानी विरुद्ध एक हजार 886 पानांचं आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर करण्यात आले या प्रकरणात अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असे आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत तीन नावं निश्चित करण्यात आली आहेत. आज महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच भाजपाकडून अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाने 119 जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे पालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी महापौरपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपामधील सर्वसाधारण गटातील इच्छुक महिला नगरसेवकांकरून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली होती. आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये तीन महिला नगरसेवकांमध्ये खडकवासला मतदारसंघातून वर्षात तापकीर, मंजुषा नागपुरे तर पर्वती मतदारसंघातून मानसी देशपांडे यांचं नाव आघाडीवर आहे. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Feb 2026 06:55 PM (IST)

    वर्धा : हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

    वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकावर अनेक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. फवारणी खर्चात वाढ होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

  • 03 Feb 2026 06:40 PM (IST)

    अकोला : महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी पदभार स्वीकारला

    अकोल्यात नवनियक्त महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. नवनियुक्त महापौर, उपमहापौरांनी महापालिकेत पहिले पाऊल ठेवण्यासाठी प्रवेश करताच त्यांचे तूतारी वाजवून स्वागत करण्यात आले. तर यावेळी आमदार वसंत खडलवाल यांच्यासह सर्व नगरसेवक हजर होते.

  • 03 Feb 2026 06:27 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांसोबत जाण्याची मानसिकता नाही – योगेश कदम

    राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले की, अजितदादा आपल्याला सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्या लोकांनी सूत्र हाती घेतली आहेत, त्यांची मानसिकता माननीय शरद पवार साहेब यांच्यासोबत जाण्याची त्यांची मानसिकता नाही, असं मला वाटतं. विलीनीकरणाच्या चर्चा मागच्या एका वर्षापासून होत आहेत. परंतु माझ्या माहिती प्रमाणे काहीजण राष्ट्रवादीत असे आहेत की त्यांना विलीनीकरण सोईचं नसल्याने ते विरोध करत आहेत.

  • 03 Feb 2026 06:11 PM (IST)

    बुलढाणा : मेहकरमध्ये मोठा अनर्थ टळला, हॉस्पिटलबाहेरील विद्युत डीपीला आग

    बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पाखरे हॉस्पिटलजवळ असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत डीपीला अचानक आग लागली. डीपीजवळ वाहने उभी होती आणि शेजारीच हॉस्पिटल असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • 03 Feb 2026 05:52 PM (IST)

    बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात विद्युत डीपीला अचानक आग

    बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पाखरे हॉस्पिटलजवळ असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत डीपीला अचानक आग लागली. डीपीजवळ वाहने उभी होती. शेजारीच हॉस्पिटलही होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे..
  • 03 Feb 2026 05:49 PM (IST)

    अजित पवार यांच्या अस्थींचे कोरणी घाट येथे विसर्जन

    गोंदिया : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे कोरणी घाट येथे विसर्जन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले यांनी अस्थींचे विसर्जन केले.

  • 03 Feb 2026 05:25 PM (IST)

    नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांना दिले जाणार ओळखपत्र

    नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांना ओळखपत्र दिले जाणार आहे. बनावट आणि ढोंगी साधू महंतांची ओळख पटावी यासाठी आखाडा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.  ओळखपत्रांसाठी सर्व प्रमुख आखाडे पुढाकार घेणार आहेत. मुख्य पूजा विधी तसेच शाही स्नानासाठी ओळखपत्र असलेल्या साधूंनाच पाठवले जाणार आहे.  आखाडा परिषदेच्या निर्णयाचे गिरीश महाजन यांनीदेखील स्वागत केले आहे. ..

  • 03 Feb 2026 05:10 PM (IST)

    बार्शी तालुक्यातील वैराग येथे महाआघाडीच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची सभा

    सोलापूर : बार्शीतील दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीने मिळून केलेल्या महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. बार्शी तालुक्यातील वैराग येथे महाआघाडीच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.

  • 03 Feb 2026 04:48 PM (IST)

    शनी-शिंगणापूर देवस्थान बनावट अँप प्रकरणी आरोपपत्र दाखल

    शनी-शिंगणापूर देवस्थान बनावट अँप प्रकरणी सायबर पोलिसांनी न्यायालयात 2500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. एकूण 77 लाखांचा अपहार झाल्याचे उघड झाले असून 9 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सुरेश धस आणि विठ्ठलराव लंघे यांनी 500 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता.

  • 03 Feb 2026 04:27 PM (IST)

    खासदार निलंबनाची कारवाई योग्यच आहे – श्रीकांत शिंदे

    लोकसभेचे कामकाज चालून न देण्याचे काम लोकसभेचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार करत होते. काल देखील हाऊस चालू केले नाही आणि आज देखील बंद पाडत होते.स्पीकरने वीस वेळा सांगितलं तरी विरोधकांना कळत नसेल तर त्यावर कायदेशी कारवाई केली आहे असे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 03 Feb 2026 04:14 PM (IST)

    राहुल यांना बोलू दिले जात नाही, याचा विरोध केला – काँग्रेस खासदार मणिक्कम टागोर

    लोकसभेत आज गोंधळ घालत पीठासीन अधिकाऱ्यावर पेपर फेकल्याच्या प्रकरणात ८ खासदारांना निलंबित केल आहे.त्यात ७ काँग्रेसचे खासदार असून एक खासदार सीपीएमचा आहे.आमची चुकी एवढीच आहे की आम्ही विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना बोलू काल दिले जात नाही , याचा विरोध करत होते असे काँग्रेसचे निलंबित खासदार मणिक्कम टागोर यांनी म्हटले आहे.

     

  • 03 Feb 2026 03:51 PM (IST)

    उल्हासनगर महापालिकेत महायुतीचा भगवा झेंडा फडकला

    उल्हासनगर महापालिकेत महायुतीचा भगवा झेंडा फडकला. शिंदे गटाचे टीम ओमी कलानीचे महापौर अश्विनी निकम तर भाजपकडून उपमहापौर अमर लुंड यांची निवड. महायुतीचा फॉर्म्युला हा सव्वा सव्वा वर्ष ठरला. विकासाच्या कामाला गती देणार रखडलेली काम पूर्ण करणार असं नवनिर्वाचित महापौर अश्विनी निकम यांनी म्हटलं.

  • 03 Feb 2026 03:30 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पहिल्याच दिवशी नगरसेवकाचा संताप

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सभागृहात पहिल्याच दिवशी नगरसेवकाचा संताप. शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्तांना सुनावले खडे बोल. तुम्हाला बोलायचा अधिकार नाही ,तुम्ही या ठिकाणी ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर बसायचं नाही तर सरळ निघून जायचं. काही अधिकार सचिवांना तुम्हाला अधिकार नाही. सभागृह महापौर चालवतात तुम्ही चालवत नाही अधिकाऱ्यांना सर्वांना माज आलेला आहे. सचिव हे सभागृहाचे आहेत आयुक्त आणि उपायुक्त यांचे सचिव नाही असे सांगत सोनवले खडे बोल.

  • 03 Feb 2026 02:40 PM (IST)

    जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अजितदादांचे अस्थी कलश दाखल

    अजितदादा पवार यांचा अस्थींचा कलश जळगाव जिल्ह्यात दाखल झाला असून आज राष्ट्रवादी कार्यालयात सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्याचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत हा अस्थी कलश जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.

  • 03 Feb 2026 02:30 PM (IST)

    अश्विनी निकम उल्हासनगरमधील नव्या महापौर

    उल्हासनगर महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली आहे. शिंदे गटाचे ओमी कलानी यांचा महापौर पदासाठी अश्विनी निकम यांची बिनविरोध तर भाजप चे उपमहापौर अमर लुंड यांची देखील बिनविरोध निवडून आले आहेत.

  • 03 Feb 2026 02:15 PM (IST)

    आज आमचा पक्ष आहे की नाही- प्रफुल पटेल संतापले

    आज आमचा पक्ष आहे की नाही. काल्पनिक किंवा पुढे काय करायचं तो विषय नाही. आज आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची. मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे मी समोर येतो. महाराष्ट्रात तटकरेंवर आहे. त्यामुळे ते समोर येतात. त्यामुळे काम करताना आमची पदे भरण्याची जबाबदारी आमची आहे असे प्रफुल पटेल म्हणाले.

  • 03 Feb 2026 01:58 PM (IST)

    पक्षाशी संबंधित नसणारे उलटसुलट बोलतायेत-प्रफुल्ल पटेल

    अजितदादांच्या निधनानंतर आमच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. एनसीपीचा विधीमंडळ नेता कोण असावा हा आमच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. दादांच्या निधनानंतर पक्षाशी संबंधित नसणारे लोक उलटसुलट बोलतायेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

  • 03 Feb 2026 01:50 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात बिबट्या आणि तरस या दोन वन्य प्राण्यांची दहशतीत नागरिक

    रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास भीती व्यक्त करीत असल्यामुळे या वन्य प्राण्यांना जेरबंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत. दोन दिवसा अगोदर गडचिरोली शहराला लागून असलेल्या सीमाना कॉलनीत तरस हायना दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे व जिल्ह्यातील चामोर्शी आरमोरी या दोन तालुक्यात बिबट्या नेहमीच पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत असल्यामुळे शेतकरी भीतीच्या वातावरणात असून वनविभागाने या वन्य प्राण्यांना जेरबंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत

  • 03 Feb 2026 01:40 PM (IST)

    रस्ता दुरुस्तीसाठी नागरिक रस्त्यावर

    गोंदिया जिल्ह्यात रस्ता दुरुस्तीसाठी नागरिक रस्त्यावर आले. सितेपार–आमगाव मार्गावर चक्काजाम केला. काही काळ गौण खनिज नेणारे टिप्पर नागरिकांनी रस्त्यावर रोखून धरले. यामुळे काही तणाव निर्माण झाला. नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.

  • 03 Feb 2026 01:30 PM (IST)

    उल्हासनगर महापालिकामध्ये महापौर अश्विनी निकम आणि उपमहापौर अमर लुंड

    उल्हासनगर महापालिकामध्ये आज महापौर पदाची निवड पार पडणार आहे. यावेळी महायुतीचा महापौर आणि उपमहापौर बसणार आहे. शिंदे शिवसेनाचा महापौर अश्विनी निकम आणि उपमहापौर अमर लुंड हे होणार आहेत. महायुतीचे सर्व नगरसेवक हे फेटे घालून महापालिकेमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

  • 03 Feb 2026 01:20 PM (IST)

    शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन इच्छुकांचे उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन इच्छुकांचे उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला.शिंदेंच्या शिवसेनेकडून नगरसेवक विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांचे उपमहापूर पदासाठीचे अर्ज दाखल झाले. गटनेते अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाशिक महापालिकेत एकत्र येत अर्ज दाखल केला. संपूर्ण राज्यात महायुतीचं वातावरण असल्याने एकनाथ शिंदेंकडे भाजप सेना युती संदर्भात चर्चा केली होती. मात्र लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना भाजप युतीची चर्चा झाली. शिवसेनेच्याच कार्यालयात भाजपचे शहराध्यक्ष प्रस्ताव घेऊन आले होते.

  • 03 Feb 2026 01:10 PM (IST)

    केडीएमसीमध्ये उबाठा गटाचे नगरसेवक गैरहजर

    कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेत महापौर उपमहापौर निवडणूकीकरता उबाठा गटाचे नगरसेवक गैरहजर होते. आश्चर्य म्हणजे बेपत्ता उबाठाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि किती ढोणे हे देखील गैरहजर राहिले.⁠उबाठाचे सर्व ११ नगरसेवक गैरहजर राहिले. ज्यात ७ उबाठाचे, दोन उबाठाचे पण शिवसेनेला पाठिंबा दिलेले तर २ मनसेचे पण उबाठाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक होते. शिवसेना भाजपा युती झाल्याने त्यांच्याकडे मोठे संख्याबळ आहे

  • 03 Feb 2026 01:00 PM (IST)

    KDMC महापौर म्हणून हर्षाली थविल यांची अधिकृत घोषणा

    KDMC महापौर म्हणून हर्षाली थविल यांची अधिकृत घोषणा झाली आहे.  मुंबई जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी थविल यांच्या नावाची घोषणा केली.

  • 03 Feb 2026 01:00 PM (IST)

    हर्षाली थविल या KDMC महानगर पालिकेच्या महापौर

    KDMC महापौर म्हणून हर्षाली थविल यांची अधिकृत घोषणा मुबई जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केली. भाजप, मनसे ,शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी नगर उपस्थित मात्र ठाकरे गटाचे 3 नगर सेवक सभागृहात उपस्थित नसल्याने चर्चा सुरू आहे. थोड्याच वेळात महापौर पदी हर्षाली थविल आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची अधिकृत घोषणा होणार आहे.

  • 03 Feb 2026 12:50 PM (IST)

    शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक नाशिक महानगरपालिकेत दाखल

    शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक नाशिक महानगरपालिकेत दाखल झाले आहेत.  शिंदेंच्या शिवसेनेकडून विलास शिंदे उपमहापौर पदासाठी इच्छुक असल्याची माहिती. विलास शिंदे आज गटनेते अजय बोरस्ते आणि शिवसेनेतील नगरसेवकांसमवेत उपमहापौर पदाचा अर्ज भरणार आहेत.  शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेमध्ये  सहभागी होण्यासाठी भाजपाकडून आधीच प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र महापालिकेत सत्तेसाठी कुठल्याही कुबड्यांची गरज नसल्याचे प्रतिक्रिया देत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना भाजप सत्तेच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

  • 03 Feb 2026 12:36 PM (IST)

    कल्याण डोंबिवली मधील ठाकरे गटाच्या गायब असलेल्या नगरसेवक कीर्ती ढोणे पुन्हा परतल्या

    कल्याण डोंबिवली मधील ठाकरे गटाच्या गायब असलेल्या नगरसेवक कीर्ती ढोणे पुन्हा ठाकरे गटात परतल्या आहेत.  कल्याण पश्चिम येथील शिवसेना शाखेत ढोणे या उपस्थित राहून महापौर उपमहापौर पदाच्या निवडणूकीसाठी एकत्र जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 03 Feb 2026 12:20 PM (IST)

    मालेगाव महानगर पालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीत आता नवा ट्विस्ट

    मालेगाव महानगर पालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीत नवीन ट्विस्ट आला आहे.  शिवसेना शिंदे गटाने तब्बल 9 नामनिर्देशन फॉर्म नेले .  3 महापौर पदाचे तर 6 उपमहापौर पदाचे नामनिर्देशन फॉर्म आहेत.  आज नामनिर्देशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.  कालच इस्लाम पार्टीने सत्ता स्थापन दावा करण्याचा केला होता.  आता मंत्री दादा भुसे नेमकी काय खेळी खेळतात याकडे लक्ष लागलं आहे.

  • 03 Feb 2026 12:13 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका – सर्व नगरसेवकांची डोक्याला फेटा बांधून सभागृहात घोषणाबाजी

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महायुतीचे सर्वच नगरसेवक एकत्र डोक्याला फेटा बांधून घोषणाबाजी करत सभागृहा प्रवेश केला.  विशेष म्हणजे भाजप शिवसेना मनसेचे नगरसेवक एकत्र येत असून पुढे केडीएमसीच्या होणाऱ्या महापौर उपमहापौर व शिवसेनेचे आमदार ,  सर्वांनी प्रवेश केला

  • 03 Feb 2026 11:57 AM (IST)

    मिरा भाईंदर महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता यांची निवड

    मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या डिंपल मेहता यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. या चुरशीच्या निवडणुकीत मेहता यांना एकूण ७९ मते मिळाली, ज्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या या महापालिकेत मेहता यांच्या निवडीमुळे सत्तेवर पक्षाची पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळातील विकासकामांना गती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

  • 03 Feb 2026 11:47 AM (IST)

    पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली

    भाजप नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

  • 03 Feb 2026 11:37 AM (IST)

    नाशिकचा नवा महापौर कोण? भाजपची खलबतं सुरु; थोड्याच वेळात होणार घोषणा

    नाशिक महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, आज भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात होत आहे. संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमधील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत असून, यासाठी भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पाचारण करण्यात आले आहे. आज महापौर पदाचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजप कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. गिरीश महाजन या बैठकीत नगरसेवकांना मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने तांत्रिकदृष्ट्या भाजपचाच महापौर बसणार हे स्पष्ट असले, तरी अंतर्गत स्पर्धेमुळे कोणाची वर्णी लागते, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

  • 03 Feb 2026 11:27 AM (IST)

    अजित पवार यांचा दशक्रिया विधी ६ तारखेला नाही; अस्थी विसर्जनावेळीच विधी संपन्न

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या दशक्रिया विधीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ६ तारखेला त्यांच्या निधनाला १० दिवस पूर्ण होत असले, तरी या दिवशी कोणताही सार्वजनिक दशक्रिया विधी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ३० तारखेला झालेल्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमावेळीच सर्व धार्मिक दशक्रिया विधी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे ६ तारखेला नियोजित कार्यक्रम नसल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे.

  • 03 Feb 2026 11:18 AM (IST)

    लोणावळ्यातील तरुणीचा मृत्यू हा अपघात नसून आत्महत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

    लोणावळ्यातील ड्युक्स नोज परिसरात १९ वर्षीय श्रेया पटी या तरुणीचा मृत्यू हा अपघात नसून ती आत्महत्या असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. कौटुंबिक कलहामुळे सतत तणावात असलेल्या श्रेयाने मुंबईहून लोणावळा गाठून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीम, ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने तिचा मृतदेह ३९० फूट खोल दरीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, श्रेयाचा मोबाईल आणि लॅपटॉप अद्याप लॉक असल्याने पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळवण्यात अडथळे येत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

  • 03 Feb 2026 11:07 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर महापौर पदाचा तिढा सुटणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरू

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदासाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. यंदाचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढली असून, पक्षात मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. हा तिढा सोडवण्यासाठी चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची चर्चा सुरू असून, यात मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण, नारायण कुचे आणि जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांसारखे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीनंतर महापौर पदाच्या उमेदवाराबाबतचा अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

  • 03 Feb 2026 10:43 AM (IST)

    KDMC वर महायुतीचा जल्लोष! महापौर–उपमहापौर निवडीआधी फेटा बांधण्याची तयारी

    KDMC वर महायुतीचा जल्लोष! महापौर–उपमहापौर निवडीआधी फेटा बांधण्याची तयारी सुरु झाली आहे.  KDMC महापौर-उपमहापौरांची आज अधिकृत घोषणा होणार आहे. हर्षाली थविल महापौर तर राहुल दामले उपमहापौर यांची बिनविरोध निवड झाली आहे. दुपारी १२ वाजता विशेष महासभेत नावांची घोषणा होणार आहे.  सभागृहात जाण्याआधी मनसे शिवसेना व भाजप तिन्ही पक्षाचे नगरसेवक एकत्र फेटे बांधण्यासाठी एकत्र आले आहेत.

  • 03 Feb 2026 10:25 AM (IST)

    वसई-विरार महापालिकेत आज महापौर, उपमहापौर पदाची निवड होणार

    वसई-विरार महापालिकेत आज महापौर, उपमहापौर पदाची निवड होणार आहे. महापौर, उपमहापौर निवडीसाठी सभागृह सजवण्यात येत आहे.
    वसई विरार महापालिकेत 115 नगरसेवकांपैकी ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडी आणि सहयोगी मित्रपक्षांचे 71 तर भाजप सेनेचे 44 नगरसेवक निवडून आले आहेत.  बविआला बहुमत असतानाही महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपाने ही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेl. आज दुपारी ही निवडणूक होणार आहे.. महापौर, उपमहापौर दालन सजले आहेत.

  • 03 Feb 2026 10:15 AM (IST)

    आयुक्य सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखं वागत आहेत – विजय वडेट्टीवार

    आयुक्य सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखं वागत आहेत. कोर्टाचे निर्णय दाखवले तरी आयुक्त ऐकत नाहीत. आमच्या गटाकडे नगरसेवक अधिक म्हणून मान्यता देण्याची मागणी होत आहे. विभागीय आयुक्तांची दुटप्पी भूमिका… असे विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले आहेत.

  • 03 Feb 2026 10:05 AM (IST)

    जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील पाथरवाला गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान

    जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील पाथरवाला शिवारातल्या एका विहिरीत पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या पडल्याची घटना घडली. ग्रामस्थांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पिंजरा विहिरीत सोडत या बिबट्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढत जीवदान दिलं, दरम्यान या भागात बिबट्या आढळून आल्याने आसपासच्या परिसरातील नागरिक देखील भयभीत झाले होते मात्र आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

  • 03 Feb 2026 09:50 AM (IST)

    शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीबाबत मोठी अपडेट

    मुर्तीची फारशी झीज झाल्याच्या चर्चांवर तज्ज्ञांचा अहवाल स्पष्ट. साईबाबांच्या मूर्तीला सध्या कोणताही धोका नसल्याचा अहवालातून निष्कर्ष. तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष पाहणी करून दिला साई संस्थानला अहवाल. मूर्ती सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असल्याचे अहवालातून स्पष्ट…

  • 03 Feb 2026 09:40 AM (IST)

    मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

    अहिल्यानगर रोडवर सोमवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवाशांनी भरलेली रिक्षा उलटून झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची भीषणता इतकी होती की, रिक्षा चालक रिक्षामध्येच अडकून पडला होता.

  • 03 Feb 2026 09:30 AM (IST)

    रस्त्याच्या खाली गाडी घेण्याच्या कारणावरून गावकरी आणि ऊसतोड कामगारांमध्ये वाद

    रुग्णाला घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनाला ऊसतोड कामगाराच्या बैलगाड्याने वाट मोकळी करून न दिल्याने झाला वाद.नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हरडप येथे ऊसतोड कामगार व गावकऱ्यांमध्ये राडा. ऊसतोड कामगार हातात कोयता घेऊन पाठलाग करतानाचा व्हिडिओ व्हायरल.

  • 03 Feb 2026 09:20 AM (IST)

    निर्दयी पित्याने पोटच्या सात वर्षीय मुलीला तेलंगणा राज्यातील कॅनलमध्ये नेऊनदिले फेकून

    दोन जुळ्या मुलींपैकी एका मुलीचा घेतला जीव, मुलीला नांदेडला घेऊन जातोय म्हणून केला घात. निवडणुकीत तिसऱ्या अपत्याची अडचण होईल म्हणून पित्यानेच पोटच्या मुलीला संपवल्याची माहिती. केरूर गावचे सरपंच पद ओबीसी साठी झाले होते राखीव, आरोपीला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली असल्यामुळे कृत्य केल्याची माहिती.

  • 03 Feb 2026 09:05 AM (IST)

    जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यात भाजप आणि शिवसेना थेट समोरासमोर

    भाजपच्या उमेदवारासाठी मंत्री बावनकुळे यांनी सभा घेतल्याने शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला. भूम तालुक्यातील ईट जिल्हा परिषद गटात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिवसेना विरोधी सभेनंतर वातावरण तापले.भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारंचे एकमेकांवर सावकारी, दोन नंबरचे धंदे आणि गुत्तेदारीचे गंभीर आरोप

     

  • 03 Feb 2026 08:54 AM (IST)

    सयाजी शिंदे, प्रशांत दामले,अनिरुद्ध पंडित यांच्यासह 6 मान्यवरांना यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार

    नाशिक- सयाजी शिंदे, प्रशांत दामले,अनिरुद्ध पंडित यांच्यासह 6 मान्यवरांना यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 मार्च रोजी वितरण सोहळा पार पडणार आहे. दर दोन वर्षांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी गोदावरी गौरव पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ कवी वसंत डहाके यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. स्मृतिचिन्ह आणि 21 हजार रुपये असं पुरस्काराचं स्वरूप असेल.

  • 03 Feb 2026 08:44 AM (IST)

    नाशिक- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेतेपदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती

    नाशिक- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेतेपदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीत गटनोंदणी झाली. हेमलता पाटील नाराजीमुळे गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी आधी मला गटनेते पदाचा शब्द दिल्याचा दावा हेमलता पाटील यांनी केला. सुनील तटकरे यांच्याकडून मात्र सीमा ठाकरे यांच्या नावाचं पत्र आल्याने गोंधळ निर्माण झाला.

  • 03 Feb 2026 08:34 AM (IST)

    विजय वडेट्टीवार- प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादाबाबत दिल्लीत चर्चा

    चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सुरू असलेला वाद आणि सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावर आज दिल्लीत चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12 नंतर दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत.

  • 03 Feb 2026 08:24 AM (IST)

    अमरावतीच्या कपिलवास्तु नगरात दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न

    अमरावतीच्या कपिलवास्तु नगरात दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तलवारी घेऊन दहशत पसरविताना सागर वानखडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळताच दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला दोन तलवारींसह पोलिसांनी अटक केली.

  • 03 Feb 2026 08:23 AM (IST)

    पुण्यातील पोर्शे प्रकरणात तिघांना जामीन

    पुण्यातील 2024 मधील पोर्शे कार अपघात प्रकरणात तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. या अपघातात दोन सॉफ्टवेअर अभियंतांचा मृत्यू झाला होता. अल्पवयीनकडून होणाऱ्या अशा अपघातांमध्ये पालकांना जबाबदार धरावं असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. आदित्य अविनाश सुद, आशिष सतीश मित्तल, आणि अमर संतोष गायकवाड या तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे.

  • 03 Feb 2026 08:21 AM (IST)

    मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी शितल तेजवानीविरोधात आरोपपत्र दाखल

    मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानी विरुद्ध एक हजार 886 पानांचं आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर करण्यात आलं. या प्रकरणात अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असं आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं.

  • 03 Feb 2026 08:20 AM (IST)

    नाशिक- शिवसेना आज भरणार महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज

    नाशिक- शिवसेना आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. शिंदे सेना भाजप विरोधात महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका लढणार आहे. भाजपा समन्वय असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी कालच केला होता. भाजपाने आधी आम्हाला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला, नंतर नाही म्हणाले, असं ते म्हणाले. त्यामुळे शिंदेंची शिवसेना महापौर उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहे.

  • 03 Feb 2026 08:15 AM (IST)

    रोहित शेट्टीच्या घराबाहेर करण्यात आल्या गोळीबाराचा कट 4 महिन्यांपूर्वीच शिजला

    रोहित शेट्टीच्या घराबाहेर करण्यात आल्या गोळीबाराचा कट 4 महिन्यांपूर्वीच शिजला आहे. गोळीबारासाठी वापरलेली स्कुटी चार महिन्याधीच आरोपींनी खरेदी केली होती. आरोपी अमान मरोटे याने ही बाईक उर्वरीत दोन आरोपींना दिली. त्यांनी ही बाईक मुंबईत येऊन मुख्य शूटरला पोहोचवली होती. हीच बाईक घेऊन आरोपी रोहित शेट्टीच्या घरापर्यंत गेला आणि तिथे जाऊन शेट्टीच्या घरावर गोळीबार केला. पोलिसानी आतापर्यंत चार आरोपींना अटक केलेली आहे. ज्यामध्ये दोन आरोपी फरार आरोपी शुभम लोणकरच्या सातत्याने संपर्कात असल्याचंही समोर आलं आहे.

Follow Us