भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात प्रचंड राडा, थेट भाजपाच्या माजी नगरसेवकाने शाखाप्रमुखाच्या लगावली कानशिलात, पोलिस..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीदरम्यान भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद वाढला आहे. पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर तणाव असतानाच आता कार्यकर्त्यांमध्ये मोठे राडा बघायला मिळतोय.

भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात प्रचंड राडा, थेट भाजपाच्या माजी नगरसेवकाने शाखाप्रमुखाच्या लगावली कानशिलात, पोलिस..
BJP Shiv Sena Shinde faction dispute
Updated on: Nov 21, 2025 | 10:20 AM

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील वाद पुढे येताना दिसतोय. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले होते. त्यानंतर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांनी रविंद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचे सांगितले गेले. सध्या पक्षात होणाऱ्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात वाद निर्माण झालाय. हा वाद थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला. त्यामध्येच आता ठाण्यात शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना मोठा वाद झाला. भाजपा आणि शिवसेना गटात थेट राडा त्यावरून झाला. भाजपाच्या माजी नगरसेवकांनी थेट शिंदेंच्या शाखाप्रमुखांच्या कानशिलात लगावली.

नारायण पवारांनी शिंदे सेनेच्या हरेश महाडिकांना मारहाण केली. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याची माहिती मिळतंय. अगोदरच पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात तणाव असतानाच आता भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यात हा राडा झाला.

उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा पोलिसात सदर प्रकरणाबाबत तक्रार देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडीक, शाखाप्रमुख महेश लहाने, उपविभागप्रमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. भाजपाचे जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय.

बीएसयूपी घरांना शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर करण्यात आली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे करण्यात आल्याचे शिवसैनिक बीएसयूपी इमारतीत जाऊन सेलिब्रेशन करत होते. मात्र त्याठिकाणी भाजपाचे माजी नगरसेवक पोहोचले आणि तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी येऊन सेलिब्रेशन कसे करता असे थेट विचारले? हेच नाही तर यादरम्यान त्यांनी थेट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप हा हा वाद ठाण्यात रंगताना दिसतोय. आता यावर राज्यातील मोठे नेते काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.