लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे, थेट कारवाईचे आदेश, तब्बल 21 कोटी..

Ladki Bahin Yojana News : महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचा थेट फायदा त्यांना झाला. मात्र, आता एका मागून एक लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे, थेट कारवाईचे आदेश, तब्बल 21 कोटी..
Ladki Bahin Yojana
| Edited By: | Updated on: Dec 10, 2025 | 9:12 AM

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा फायदा सरकारला इतका जास्त झाला की, महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केले. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहिन्याला 1500 रूपये बँक खात्यात जमा होतात. लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारचे राज्यात पुन्हा सरकार आले. त्यामध्येच राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा राज्यातील महिलांना झाला. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढल्याचे सांगितले जाते. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार याबद्दल बोलताना दिसले. सर्व गोष्टीचे सोंग करता येते पण पैशांचे नाही असे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट म्हटले.

निवडणुकीच्या तोंडावर अर्ज करणाऱ्या महिलेला या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता आला. मात्र, या योजनेसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी अर्जाची संख्या खूप जास्त असल्याने त्याची बारकाईने पाहणी करता आली नाही. आता सरकाकडून अर्जांची पडताळणी केली जात आहे. काहींनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला. जर इतर सरकारी योजनेंचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही ही प्रमुख अट होती.

यासोबतच उत्पन्नाचीही महत्वाची अट लागू करण्यात आली. आता नुकताच लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे आली. राज्यातील 9 हजार 526 सरकारी लाडक्या बहिणींनी 14 कोटी 50 लाख रुपये घेतले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी माहिती दिली. 14,298 पुरुषांनीही लाडकी बहिणी होऊन 21.44 कोटी लाटले, असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

विविध विभागांकडून रक्कम वसुलीचे आदेश दिल्याचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दावा केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आली. तपासात अडथळा आणल्यास कारवाईपासून कोणीही सुटणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारकडून याप्रकरणी गंभीरतेने कार्यवाही सुरू; अनेक जणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.