वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांनी नोंदवला जवळच्या त्या व्यक्तीचा जबाब, काय समोर आलं?
वैष्णवी हगवणे प्रकरणात ACP सुनील कुराडे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी वैष्णवीच्या जवळच्या व्यक्तीचा जबाब नोंदवला आहे. तसेच निलेश चव्हाण याच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे देखील सांगितले आहे.

पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पाहायला मिळाली. त्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले. आता एसीपी सुनील कुराडे यांनी प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.
काय म्हणाले एसीपी सुनील कुराडे?
ACP सुनील कुराडे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात 19 साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये वैष्णवीच्या जवळच्या मैत्रिणीचा देखील समावेश आहे. ते नेमकं काय म्हणाले वाचा…
– पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपी म्हणजेच राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना उद्या न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे.
वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून धक्कादायक खुलासा, पती शशांकने…
-या गुन्ह्या संदर्भात जवळजवळ 19 साक्षीदारांची साक्ष बावधन पोलिसांनी नोंदवली आहे.
-या गुन्ह्यातील तांत्रिक पुरवा जो आहे त्याबाबतचा मार्गदर्शन आणि पुराव्या बाबत वेगवेगळ्या ठिकाणी सीए व तांत्रिक पुरावे पाठवले आहेत
-परिस्थितीजन्य पुरावे पाहून आम्ही 19 जबाब नोंदवले त्यामधील एक जवाब हा वैष्णवीच्या मैत्रिणीचा नोंदवला आहे, त्याचप्रमाणे आणखी पुढे महत्त्वाचे साक्षीदार देखील आम्ही घेणार आहोत
-आमच्या पाच टीमला निलेश चव्हानला पकडण्यासाठी नक्कीच यश येईल. मात्र, त्याला पर्याय म्हणून आम्ही कालच कोर्टाकडून त्याचं स्टॅंडिंग वॉरंट काढून आणला आहे.
-स्टँडिंग वॉरंट हे पुढील तपासासाठी उपयुक्त पडेल.
निलेश चव्हाणचा अडचणीत वाढ
निलेश चव्हाणला अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी पुणे पोलिसांचा न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. निलेश चव्हाणची मालमत्ता जप्तीसाठी बावधन पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत. तसेच परवानगी मिळावी म्हणून पोलिसांनी न्यायलयात अर्ज दाखल केला आहे.
