
मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस चांगलीच हजेरी लावताना दिसतोय. काही भागांमध्ये आजही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आलाय. पुण्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. मध्यरात्री पाणी पातळीत वाढ झाली आणि काही भागांमध्ये पाणी शिरले. अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आणि रस्ते जलमय झाली.सोसायट्यांमध्येही पाणी शिरले आहे.
खडकवासला धरणातील विसर्गात वाढ झालीये.नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. गेल्या वर्षीसारखी पूरपरिस्थिती उद्धभवू नये, यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. खडकवासला धारणातून मुठा नदी पात्रात 28 हजार 662 क्युसेक विसर्ग सुरु आहे. विश्रांतीनंतर गोदिंया जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
गेल्या तीन दिवसात गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याच्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती आणि आज पुन्हा सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस आला असून अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोंदिया वाशी यांना पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागू शकतो. सध्या कुठे पूर परिस्थिती निर्माण झाली नसली तरी सतत पाऊस आल्यास पुन्हा गोंदिया शहराला आणि इतर भागांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंढरपूर उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. उजनी धरणातून 71000 तर वीर धरणातून 31000 क्यूसेक इतके पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. भीमा नदी पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली.
भीमा नदीपात्रात उजनी आणि वीर धरणातून मिळून जवळपास एक लाख क्यूसेक पेक्षा जास्त विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला असल्याने ते पाणी दुपार पर्यंत पंढरपुरात येण्याची शक्यता असून पंढरपूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. चंद्रभागेचे वाळवंट आणि घाट पाण्याखाली गेले असून आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा. आज कोकण आणि घाटमाथ्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याची शक्यता असून ऑरेजं अलर्ट देण्यात आला.