Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच मनोज जरांगे यांची मोठी मागणी; राज्य सरकार, सीआयडी कडक Action घेणार?

Manoj Jarange Patil : "मुंडेंनी एक नंबरच्या आरोपीच्या पापात सहभागी व्हावं. मी गुन्ह्यात आहे असं मुंडेंनी सांगावं. एक नंबरच्या आरोपीनेही मुंडेंचं नाव घ्यावं. त्याच्या कुटुंबीयांनीही सांगावं. जेवढे खून झाले ते मुंडेंसाठीच केले. मुंडेंनीच आरोपीला गायब केलं. चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. त्यांना आमदारपदीही ठेवू नये" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच मनोज जरांगे यांची मोठी मागणी; राज्य सरकार, सीआयडी कडक Action घेणार?
Manoj Jarange Patil
| Updated on: Mar 04, 2025 | 1:00 PM

“जे झालं चांगलं झालं. अजित पवार आणि फडणवीस यांची नियत महत्त्वाची आहे. एवढी मोठी घटना होऊन मग्रुरी जशीच्या तशी आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर त्यांना पश्चात्ताप होणार नाही. असं करून हे सर्वांच्या नजरेतून उतरणार आहे. एक दिवस यांची लंका डुबणार. यांची मग्रुरी आणि मस्तीखोरामुळे यांची लंका पाण्यात डुबणार. हे लयाला जाणार आणि पाताळात जाणार आहे” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. “आता सरकारवरील नामुष्की ओढवली, मी या या स्वरूपाचा असा राजीनामा देतो. तसं बोलत नाही तो. आताही तीच मग्रुरीची भाषा आहे. माझं दुखतंय मी राजीनामा देतोय, उपचारासाठी. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध? बरं झालं. मुख्यमंत्री आणि अजितदादांना कळालं माजोरडा आहे म्हणून. महाराष्ट्रातील मराठ्यांनाही कळायला हवं होतं. मराठ्यांनी सावध राहून त्यांना मोठं करू नये. मराठ्यांनी हातचं राखून काम केलं पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“सर्व चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. त्या आधी द्यायला हवा होता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं आहे. राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं. उशिरा का असेना पण अजितदादा आणि फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी लाथ घालून हाकललं. आपण मागणी केली. त्यांनी नैतिकता म्हणा आणि संस्कार म्हणा, आम्ही काल मागणी केली आज राजीनामा दिला. हे माज मस्ती करून आपलेच लोकं पाताळात घालणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘धनंजय मुंडे 302 मध्ये आहे म्हणजे आहे’

“टोळीचा लोक नायनाट करणार. लोक त्यांना राहू देणार नाही. यांचा माजोरडापणा राहणार नाही. आपण मोठं झाल्यावर मध्यस्थीच्या भूमिकेत असलं पाहिजे. हे पैसेवाले झाल्यावर मस्तीखोर झाले. यांचा उलटा खेळ आहे. यांची अर्धी टोळी आत गेली. धनंजय मुंडे 302 मध्ये आहे म्हणजे आहे. मी फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे मागणी करतो की पुरवणी तपास करा. पुरवणी तपासात सर्वांना सहआरोपी करा. धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा. दोन ते तीन महिन्यात प्रकरण संपवा. या सर्वांना फाशी द्या” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

‘त्याच्यासाठी केलं त्याचं नाव घ्या’

“आरोपी जो सरमाडे आहे. त्याने कबुल करावे की मी धनंजय मुंडेसाठी खंडणी मागितली आणि पाप केलं. त्याच्या कुटुंबानेही ते सांगावं. आतापर्यंत जेवढे खून केले ते मुंडेसाठीच केले. एक नंबरच्या आरोपीला सांगणं आहे, डोक्यावर पाप घेऊन फिरू नका. हा मजेत फिरेल. भाषणं करेल. त्याच्यासाठी केलं त्याचं नाव घ्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘यांना जशास तसे उत्तर द्या’

“हे सर्व माजले आहेत. त्यांच्या तोंडात कितीही हात घाला हात कोरडाच येईल. रस्त्यावरून जाताना लोकांना कट मारतात, कुणाचा प्लॉट बळकावतात, इतका माज आहे. पोलीसही त्यांना अभय देतात. ही टोळी संपुष्टात येणार आहे. यांची लंका पाण्यात बुडणार आहे. मग्रुरीमुळे यांचा कार्यक्रमच होणार आहे. आजही राजीनामा देताना मग्रुरी दाखवली. आजाराचं कारण दाखवलं. त्यांनाही खूनाचा पश्चात्ताप नाही. जे आरोपी हसत होते खून करताना तसंच हे हसत आहेत. मराठ्यांनी आता यांना पाणी सुद्धा द्यायचं नाही. एवढं कट्टर वागायचं आहे. गप्प राहायचं नाही. खाली मान घालून जगू नका. यांना जशास तसे उत्तर द्या” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.