AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, अजून चार आरोपींना दिलासा, मग मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवला कोणी?

या आधी या प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर वरील लोकांवरती आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात पाठवले. आता तर तेही निर्दोष सुटल्याचं समोर येत आहे.

मोठी बातमी, अजून चार आरोपींना दिलासा, मग मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवला कोणी?
Mumbai High Court
| Updated on: Apr 22, 2026 | 1:45 PM
Share

मालेगाव येथे 2006 साली बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणातील सर्व चार आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी 2006 च्या मालेगाव स्फोट प्रकरणातील चारही आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द केला. या निकालामुळे आरोपींची या प्रकरणातून प्रभावीपणे मुक्तता झाली असून त्यांच्यावरील खटल्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. त्यांच्यावरील आरोप तांत्रिक दृष्ट्या बसत नसल्याने कोर्टाने हा निर्णय दिला आहे. लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी, मनोहर नरवारिया या चारही आरोपींना दिलासा मिळाला आहे. मशिदीजवळ झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला होता.

या आधी या प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर वरील लोकांवरती आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात पाठवले. आता तर तेही निर्दोष सुटल्याचं समोर येत आहे. त्यांच्यावरील आरोप पत्र रद्द करण्यात आले आहे. यापूर्वी मालेगाव प्रकरणात ज्या अकरा लोकांची न्यायालयाने मुक्तता केली होती, त्यांच्या विरोधात NIA ने न्यायालयात जाऊन आरोप केले होते. मग आता आरोपपत्र रद्द झालेल्या चारही आरोपींच्या विरोधात न्यायालयात जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली तर ब्लास्ट घडवला कुणी? असा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

त्यांची सुटका झाली होती

स्फोटानंतर 19 वर्षांनी मागच्यावर्षी विशेष कोर्टाने चौघांविरोधात आरोप निश्चित केले होते. 2016 साली या प्रकरणात नऊ जण निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. त्यांची सुटका झाली होती. 2006 साली ATS ने त्यांना अटक केली होती. नंतर NIA ने हा तपास आपल्या हाती घेतला. मक्का मशिद बॉम्ब स्फोट प्रकरणात 2007 साली गुन्हा दाखल झाला. 2011 साली एनआयएने हा तपास आपल्या हाती घेतला. डिसेंबर 2012 ते जानेवारी 2013 दरम्यान चारही आरोपींना अटक झाली. मागच्यावर्षी 31 जुलैला 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...