AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावात 42 कंटेनमेंट झोन जाहीर, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव

मुंबई आणि पुणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon Corona Update) हे शहरदेखील कोरोनाचं मोठं हॉटस्पॉट ठरलं आहे. मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

मालेगावात 42 कंटेनमेंट झोन जाहीर, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव
| Updated on: May 01, 2020 | 5:59 PM
Share

नाशिक : मुंबई आणि पुणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon Corona Update) हे शहरदेखील कोरोनाचं मोठं हॉटस्पॉट ठरलं आहे. मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 274 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ करण्यात आली आहे (Malegaon Corona Update).

मालेगाव शहरातील 42 परिसर मालेगाव महापालिकेकडून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोन जाहीर झालेले सर्व परिसर पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. या भागात फक्त एकच रस्ता सुरु ठेवण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पुढच्या 14 दिवसांसाठी या भागांमध्ये कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या मालेगावातील 42 कंटेनमेंट झोनमध्ये संचार करणे, वाहतूक करणे, घराबाहेर किंवा रस्त्यावर उगाच उभे राहणे या सर्व गोष्टींना मनाई आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय या परिसरातील नागरिकांना बाहेर पडता येणार नाही.

मालेगाव शहरातील 42 कंटेनमेंट झोन :

  • मोमीनपुरा
  • कमालपुरा
  • नयापुरा
  • इस्लामपुरा
  • धोबी गल्ली
  • कुंभारवाडा
  • बेलबाग
  • खुशामदपुरा
  • मुस्लिम नगर
  • मोतीपुरा
  • इस्लामाबाद
  • सिद्धार्थवाडी
  • भायखळा झोपडपट्टी
  • महेवीर नगर
  • दातारनगर
  • हकीमनगर
  • गुलाब पार्क
  • मदिनाबाद
  • अपना सुपर मार्केट
  • हजार खोली
  • नूर बाग
  • नवीन इस्लामपुरा
  • अक्सा कॉलनी
  • जुना आझादनगर
  • जाधवनगर
  • संजय गांधी नगर
  • ज्योती नगर
  • सरदार नगर
  • कलेक्टर पट्टा
  • एकता नगर
  • गुलशेर नगर
  • उस्मानाबाद
  • मोहम्मदाबाद
  • हिम्मतनगर पोलीस वसाहत
  • जाफरनगर
  • गिरणी वाडा(मंगळवार वार्ड)
  • नया आझाद नगर
  • प्रकाश हाऊसिंग सोसायटी(कॅम्प)
  • वीर सावरकर नगर(कलेक्टर पट्टा)
  • सलीम मुन्शी नगर
  • मित्र नगर-आनंद नगर(सोयगाव)
  • जयराम नगर (सोयगाव)
  • महेफुज कॉलनी(कुसुम्बा रोड)
  • डॉ. आंबेडकर नगर (स.न.65)

आरोग्य मंत्र्यांचा मालेगाव दौरा

दरम्यान, मालेगावात कोरोनाची वाढती रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी मालेगाव दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मालेगाव शहराचा संपूर्ण आढावा घेतला. त्यानंतर मालेगावची परिस्थिती नक्की नियंत्रणात येईल, असा विश्वास आरोग्य मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.

‘आपल्याला मालेगाव मिशन यशस्वी करायचं आहे. मालेगावात जास्त संसर्ग झालेला नाही. काही परिवारांमध्येच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. क्वारंटाईन केलेल्या रुग्णांचेच रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. जास्त बारकाईने लक्ष दिलं तर 100 टक्के परिस्थिती आटोक्यात येईल. नाशिकमध्येही मुंबईच्या धर्तीवर टास्कफोर्स तयार करण्याची सूचना देण्यात आली’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

मालेगाव मनपा आयुक्तांचा दणका, पदभार स्वीकारताच 33 कामचुकार कर्मचाऱ्यांवर गुन्हा

देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवार भडकले
देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवार भडकले.
मुंबई एअरपोर्टवर अपघात! विमानांचे पंख एकमेकांना धडकले अन्...
मुंबई एअरपोर्टवर अपघात! विमानांचे पंख एकमेकांना धडकले अन्....
128 दिवसांची झुंज संपली! कफ सिरपमुळे 4 वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू
128 दिवसांची झुंज संपली! कफ सिरपमुळे 4 वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू.
विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस? संजय राऊतांचा गंभीर आरोप
विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस? संजय राऊतांचा गंभीर आरोप.
तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार
तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार.
पदासाठी घेतला लेकीचा जीव, कुठं चाललंय महाराष्ट्राचं राजकारण?
पदासाठी घेतला लेकीचा जीव, कुठं चाललंय महाराष्ट्राचं राजकारण?.
मीरा भाईंदरच्या महापौरपदी मेहता, मराठीप्रेमींचं आंदोलन
मीरा भाईंदरच्या महापौरपदी मेहता, मराठीप्रेमींचं आंदोलन.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! हेलिकॉप्टर प्रवासाचं नेत्यांना टेन्शन?
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! हेलिकॉप्टर प्रवासाचं नेत्यांना टेन्शन?.
राष्ट्रवादीचं विलीनीकरण तूर्त शक्य नाही? पटेलांकडून विषयच निकाली!
राष्ट्रवादीचं विलीनीकरण तूर्त शक्य नाही? पटेलांकडून विषयच निकाली!.
तुम घाटी...बिल्डर रहेजाची मराठी लोकांना शिवी?
तुम घाटी...बिल्डर रहेजाची मराठी लोकांना शिवी?.