मालेगावमध्ये साडेसहा लाख मतदार; प्रारूप याद्या जाहीर

मालेगावमध्ये प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात 3 लाख 1 हजार 425 मतदार आहेत.

मालेगावमध्ये साडेसहा लाख मतदार; प्रारूप याद्या जाहीर
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः मालेगावमध्ये प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात 3 लाख 1 हजार 425 मतदार आहेत. तर मालेगाव बाह्यमध्ये 3 लाख 36 हजार 446 मतदार आहेत.

मालेगाव महापालिका निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रारूप याद्याबाबत हरकती आणि दावे आल्यानंतर पुढील वर्षी म्हणजेच 5 जानेवारी 2022 मध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सध्या मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष मतदारांची संख्या ही 1 लाख 55 हजार 865 आहे. महिला मतदारांची संख्या ही 1 लाख 45 हजार 355 आहे. सहा जणांनी तृतीयपंथीय म्हणून नोंद केली आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात पुरुष मतदारांची संख्या ही 1 लाख 77 हजार 632 आहे. महिला मतदारांची संख्या 1 लाख 58 हजार 511 आहे. तिघांनी तृतीयपंथीय म्हणून नोंद केली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आणि तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होत आहेत. त्यापूर्वी या दोन्ही ठिकाणचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात आरोप-प्रत्योरोप आणि राजकीय नेत्यांच्या सभांनी दोन्ही ठिकाणचे वातावरण ढवळून निघणार आहे.

नाशिक जिल्ह्यात 45 लाख 50 हजार मतदार

नाशिक जिल्ह्यासाठीची प्रारूप मतदारयादी निवडणूक शाखेने जाहीर केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 45 लाख 50 हजार मतदार असून, अंतिम यादी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत आणि निर्दोष असण्यासाठी पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. त्यात 1 जानेवारी ते 29 ऑक्टोबर दरम्यान 1 लाख 40 हजार अर्ज आले होते. त्यानुसार 53 हजार 133 नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली. 64 हजार 172 नावे वगळली. 19 हजार 74 नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली, तर 4 हजार 315 मतदारांनी आपला पत्ता बदलला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा 1 ते 30 नोव्हेंबर या काळात मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करता येणार आहे. सोबतच 13, 14, 27, 28 नोव्हेंबर या तारखांना विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीमध्ये एकूण 45 लाख 50 हजार 613 मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ही 23 लाख 80 हजार 392 इतकी आहे. स्त्री मतदारांची संख्या ही 21 लाख 70 हजार 191 आहे. अन्य 30 आहेत. सैन्यातील मतदारांची संख्या 9278 इतकी आहे. मतदान केंद्राची संख्या 4681 आहे. (Malegaon Municipal Election: Six and a half lakh voters in Malegaon; Draft lists released)

इतर बातम्याः

केंद्र-राज्यात लसीकरणाचा वाद नाही; त्र्यंबकेश्वर येथे देवेंद्र फडणवीस यांचा दावा

‘कवच कुंडल’ विरुद्ध ‘हर घर दस्तक’; कोणती लसीकरण मोहीम राबवायची, राज्यातले आरोग्य कर्मचारी पेचात!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI