काँग्रेसला डिवचून ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेणार, काय असेल नवीन राजकीय समीकरण?

| Updated on: Nov 30, 2021 | 9:35 PM

आता ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षाचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे, भाजपला केंद्रातील सत्तेतून बाहेर काढण्यासाठी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांना बाजूला सोडून, ममता बॅनर्जी देशाला तिसऱ्या आघाडीचा परयाय देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं चित्र दिसतय. नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात ममतांनी विविध पक्षांच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.

काँग्रेसला डिवचून ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेणार, काय असेल नवीन राजकीय समीकरण?
Mamata Banerjee meets Aaditya Thackeray
Follow us on

मुंबईः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आज तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत पोहोचल्या आहेत. या दौऱ्याच त्या काँग्रेसला डिवचून, शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांशी भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात, महाविकास आघाडीचे सरकार आहे, ज्यात काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीला स्पष्ट महत्त्व दिले आहे आणि काँग्रेसला डिवचले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावर काय नवीन राजकीय समीकरणं असतीस, याकडे सगल्यांचं लक्ष लागल आहे.

एकेकाळी काँग्रेस आणि ममता बनर्जी यांचे मैत्रीपुर्ण संबंध होते. भारतात भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते, ज्यात काँग्रेस आणि तृणमूल आघाडीवर होते. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तृणमूलसोबत युती केली नसली तरी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.

देशात तिसरी आघाडी तयार होणार?

आता ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षाचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे, भाजपला केंद्रातील सत्तेतून बाहेर काढण्यासाठी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांना बाजूला सोडून, ममता बॅनर्जी देशाला तिसऱ्या आघाडीचा परयाय देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं चित्र दिसतय. नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात ममतांनी विविध पक्षांच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही. त्याऐवजी अनेक काँग्रेसचे नेते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले.

दिल्लीमध्ये मीडियाने जेव्हा ममता बॅनर्जींना विचारले की त्या सोनिया गांधींना भेटणार का, तेव्हा त्या खूप संतापल्या आणि म्हणाल्या की सोनिया गांधी व्यस्त आहेत. दिल्लीतील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काल 12 राज्यसभेच्या खासदारांना निलंबित करण्यात आले. मागील संसदेच्या अधिवेशनात निर्माण झालेला गोंधळ हे त्याचे कारण होते. तीन शेती विधेयक रद्द करतानाही गोंधळ उडाला. यासाठी राहुल गांधी यांनी आज पक्षांची बैठक बोलावली होती, मात्र ममता बॅनर्जींनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला.

उद्याचा सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी भेट

आज मुंबईत पोहोचताच ममता बॅनर्जी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्या. उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायकाला आल्याचे त्या म्हणाल्या. बंगालमध्येही आम्ही गणपतीची पूजा करतो, त्या म्हणाली आणि जय मराठा जय बंगाल नारा दिला. नंतर आदित्य ठाकरेंसोबत झालेल्या भेटीनंतर आदित्य म्हणाले की, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये चांगले संबंध आहेत. आजची बैठक अनौपचारिक होती, असे ते म्हणाले.

ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यातील उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, तिच्या संपूर्ण वेळापत्रकात कुठेही काँग्रेस पक्षाचा उल्लेख नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय घडामोडी आणि समीकरणे काय असतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


इतर बातम्या

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?; राम सातपुतेंचा सवाल

देबाशिष चक्रवर्तींनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला; तर मुख्यमंत्र्यांकडून सीताराम कुंटेंची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

देशाची अर्थव्यवस्था रुळावर, दुसऱ्या तिमाहीत GDP 8.4 टक्क्यांवर पोहोचला!