मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीतून मोठी घोषणा; कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने सांगितला पुढील प्लान

मनोज जरांगे यांनी पुन्ही मराठा आरक्षणावरून सरकारला लक्ष्य केलं. त्याचबरोबर आंदोलनाचाही इशारा दिला.

मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीतून मोठी घोषणा; कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने सांगितला पुढील प्लान
| Updated on: Aug 06, 2026 | 1:02 PM

महाराष्ट्रातील काही मराठी लोकप्रतिनिधींचं कुणबी प्रमाणपत्र बाद ठरल्याने नगरसेवकपद रद्द झालं आहे. मराठवाड्यातील थेट चार नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत. नगरसेवक पद रद्द झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मुंबईला जाऊन आंदोलन करावं लागेल, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटीत पद रद्द झालेल्या मराठा लोकप्रतिनिधींशी बैठकीत चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील म्हणाले,’एकनाथ शिंदे यांच्या नेत्याच्या कॉलेजमध्ये बैठका घेता. मराठ्यांना सांगतो आपलं सर्व सत्य आहे. बावनकुळेंनी आपलं प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. काय उपयोग आहे आपला. मंत्र्याचा आदेश आला अधिकारी थरथर कापायला लागला. हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहे. वाटोळं करायचं नसेल तर प्रत्येक आंदोलनात मोठ्या प्रमाणात उतरावं लागेल. आपल्याला मुंबईत जावं लागणार आहे. यांना दाखवावं लागेल’.

‘शिंदे विरोधात जातील असं कधी वाटलं नव्हतं. पण त्यांच्या कॉलेजवर आपल्या विरोधात बैठका होतात. ज्यांचं काही आरक्षणाचं घेणंदेणं नाही, त्यांना सभेला घेऊन येतात. गर्दी जमली म्हणून दाखवतात. काय शिरसाट साहेब. तुम्हालाही दोन मुलं आहेत. आमचीही मुलं आहे. आमचा तळतळाट घेऊ नका. यांना २९ ऑगस्टला हिसका दाखवावा लागेल. एकजुटीने राहा. सावध व्हा. सरकारला गुडघ्यावर आणायचं आहे, असा इशारा त्यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एवढं नाराज करायला नको होतं. मला शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती. मी खूप खुनशी आहे. एकदा डोक्यात गेला तर सोडत नसतो. तुम्ही थांबा शिंदे साहेब. तुमच्या कॉलेजवर बैठका होतात. फडणवीस यांना मराठे जवळचे आहेत की बावनुकळे हे बघतो आता. फडणवीस यांनी चांगल्या चांगल्याच्या झाक उतरवल्या. परंतु मी त्यांची झाक उतरवली. फडणवीस साहेब तुम्ही राजकारणातून संपेल म्हुणून खूप मेटाकुटीला आले होते. तुमचं सगळं काढीन  बावनकुळे यांनी प्रमाण पत्र रद्द करायला लावले. सत्ते पुढं शहाणपण चालत नाही. फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे आदेश काढूच शकत नाही. हे एकाचं काम नाही, असा आरोप जरांगेंनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us