AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर… , मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आज मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच त्यांना तब्ब्येतीची काळजी घ्यायला सांगितली.

बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर... , मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj jarange meets Bachchu Kadu
| Updated on: Jun 11, 2025 | 4:11 PM
Share

माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते आंदोलनाला बसले आहेत. आज मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच त्यांना तब्ब्येतीची काळजी घ्यायला सांगितली. मनोज जरांगे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

तुम्ही तब्ब्येतीची काळजी घ्या – जरांगे

आज मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्यानंतर म्हटले की, शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू हे गोरगरीबांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. तुम्ही तब्ब्येतीची काळजी घ्या. तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. एखाद्या विषयाला न्याय मिळवायचा असला तर रस्त्यावर उतरावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरायला हवं.’

शेतकऱ्यांनी जात-पात न पाहता रस्त्यावर उतरायला हवं – जरांगे

बच्चू भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू, सरकारला सळो की पळो करुन सोडू. बच्चू कडू यांच्या मागण्याची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जात-पात न पाहता रस्त्यावर उतरायला हवं. कारण जीवाची बाजी लावणं सोपं नाही’ असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

शरद पवारांनीही बच्चू कडू यांना केला होता फोन

शरद पवार यांनी काल (मंगळवार) बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसेच आंदोलनाबाबत माहिती विचारली. यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले की, “कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते, तसेच पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करुन देऊ अशी माहिती दिली आहे. मात्र मी मीटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही. आम्हाला भेट नको, निर्णय हवा आहे.” यानंतर बच्चू कडू यांनी तुमच्याकडून उद्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी आलं तर बरं होईल असं म्हटलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.