Manoj Jarange: मराठा आंदोलकांची चौकशी… मनोज जरांगे यांची तिखट प्रतिक्रिया, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Manoj Jarange on Eknath Shinde : मराठा आंदोलक मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आंदोलकांच्या चौकशीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे.

Manoj Jarange on Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या विरोधकांनी ईडीकडे तक्रार केली होती. त्याआधारे जरांगे यांच्या सहकाऱ्यांची आर्थिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी या चौकशीचा मुद्दा समोर आणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी उपोषण मागे घेताच आयकर खात्याकडून चौकशी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर जरांगे यांची तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे.
मनोज जरांगे आक्रमक
मराठा आंदोलनाला कुणीच साथ द्यायची नाही का? जे आंदोलक साथ देत आहेत. त्यांना तुरुंगात टाकणार, तुरुंगात टाकणार असंच करणार तुम्ही, तुमचं सरकारही कधी तरी बदलणारच ना. मग आम्ही सुद्धा खुनशी आहोत. एकनाथ शिंदे यांचे आमदार, खासदार, मंत्री आमच्या कामाला यायला हवे होते. तर ते आमच्या चौकशा लावण्याच्या कामाला येत आहे, ही आनंदाची गोष्ट झाली आहे. हरकत नाही. मराठा आंदोलक गुंतवायचे काम त्यांनी पूर्ण करून घ्यावं. आम्ही काही मागं सरकणार नाही, असा पलटवार जरांगे पाटील यांनी केला.
मी पण जरांगे आहे
मराठा समाजाने हे आमदार, खासदार निवडून आले आहे. त्यानंतर त्यांना हा अधिकार मिळाला आहे. ते मराठा आंदोलकांच्या कामाला येत नाही. निवडून आमच्या मतांवर आले. आता दगाफटका करत आहेत. मराठा आंदोलकांच्या चौकशा लावल्या, एकनाथ शिंदे यांच्या काळात काय मोठा बदल, काय मोठे परिवर्तन सुरू आहे. तुम्ही काही अमृत पिऊन आले नाही. तुमची कधी ना कधी सत्ता जाणार आहे. मी पण मनोज जरांगे आहे, असा इशारा त्यांनी दिला. तर चौकशासंबंधी जे मागणी करत आहे. त्यांना हे कटकारस्थान करण्यासाठी राहिलेला, उर्वरीत इसार देण्यात आल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. तर एका दैनिकाच्या कार्यालयात ही मंडळी जमली. तिथं त्यांनी इतके कमी पैसे का घेतले यावरून आक्षेप घेतला आणि मोठा हात मारायला हवा होता अशी चर्चा झाल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. मी काही मनावर घेत नाही, असे जरांगे म्हणाले.
कर नाही त्याला डर कसला?
कर नाही त्याला डर कसला? असे स्पष्ट धोरण त्यांनी मांडले. आमच्या रक्तात खरेपणाचं रक्त वाहत आहे. एक मोठा राजकीय नेता आहे. तो एका बिलापोटी अडचणीत आला होता. मोबाइलचं बिल नसले तरी तुरुंगात टाकू शकतात. पुढच्या व्यक्तीचा खुनशीपणा किती हे त्यावर अवलंबून आहे. किती मराठ्यांना तुरुंगात टाकल्यावर शिंदे यांचे पोट भरणार हे त्यांच्यावर अवलंबून आहे, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली.