500 कोटींच्या आरोपावरून महायुतीत तणाव, आता एकनाथ शिंदेंचा रामदास कदमांना तातडीचा आदेश, नेमक्या सूचना काय?

एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना ऑडिओ क्लिप प्रकरणावर यापुढे काहीही बोलू नये, अशा सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी महायुतीतील शिंदेसेना भाजपमध्ये अधिक परिस्थिती बिघडू नये यासाठी या सूचा देण्यात आल्या आहेत.

500 कोटींच्या आरोपावरून महायुतीत तणाव, आता एकनाथ शिंदेंचा रामदास कदमांना तातडीचा आदेश, नेमक्या सूचना काय?
Do not speak about Ramdas Kadam, Shinde instructs
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 6:01 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणामुळे आता शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातही दुरावा निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल सलग पत्रकार परिषदा घेत भाजप नेत्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदमांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचा आरोप करत त्यांनी शिंदेंनी त्यांना समज द्यावी असं म्हटलं होतं. त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेने हा सल्ला मनावर घेतला असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

रामदास कदमांना बोलू नये अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध शिंदे सेना संघर्ष संपण्याची चिन्हे आहेत. पण मनोज जरांगे पाटील यांनीही आज पत्रकार परिषद घेत सांगितलं की, माझ्याकडे आणखी एक अणूबॉम्ब आहे. तोही मी फोडणार आहे. त्यामुळे आता त्यामध्ये कोणाबद्दल काय असणार, कोणती नवी माहिती समोर येणार याकडेही लक्ष लागलं आहे.

Loading...

नेमकं काय घडलेलं?

शिवसेना नेते रामदास कदमांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केल होते. एकनाथ शिंदेंना भाजपने ५०० कोटी रुपये दिले, त्यातून मराठा आंदोलन मॅनेज करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली, ते पैसे मनोज जरांगे पाटलांना पोहोचले असा खळबळजनक माहिती देणारा कथित ऑ़डिओ सध्या देशामध्ये व्हायरल झाला आहे.पण हा सर्व प्रकार भाजपकडून केला जात असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला होता. त्यामुळे भाजपकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुमच्या एकनाथ शिंदे आणि त्याच्या मुलाबद्दलच्या तुमच्या क्लिपही आमच्याकडे आहेत. तुम्ही आता आवरतं घेतलं नाही तर आम्ही त्या क्लिप उघड करु मग तुम्हाला तुमची जागा कळेलं, असा इशारा प्रसाद लाड यांनी रामदास कदमांना दिला होता.

मंत्री उदय सामंत आणि यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. आरोप प्रत्यारोपांचं वातावरण तापलेलं असताना आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी रामदास कदमांनी याप्रकरणावर आणखी काहीही न बोलण्याचा स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या विषयावर बोलणं थांबवा, अशी भूमिका शिंदेंनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पुढे काही घडणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us