AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट, ‘मंत्री म्हणायचे कोपऱ्यात बोलू पण…’,

सरकारला वाटले असेल उगाच याला फिरायला जा म्हणालो. आता आग्यामोहळ उठले आहे. अन्यायाचे पान पलटवायची वेळ आली आहे. मी फुटणारा नाही फुटवणारा आहे. स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी यांनी रात्रीतून सरकार बदलले.

मनोज जरांगे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट, 'मंत्री म्हणायचे कोपऱ्यात बोलू पण...',
MARATHA RESERVATION Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Sep 30, 2023 | 8:52 PM
Share

जालना : 30 सप्टेंबर 2023 | आमचे आंदोलन शांततेत सुरू होते. आमच्या महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला. आम्ही असे काय पाप केले? काय गुन्हा केला होता? त्या जखमी महिला म्हणाल्या, काही झाले तरी आरक्षण घ्यायचे. आता संधी आलीय. आमच्या 10 पिढ्या बरबाद झाल्या. पण, आता मराठा समाजाची एकी आणि ताकत वाया जाऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिला. जळणं येथील सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. तसेच शिंदे सरकावर टीकाही केलीय. कुठलीही जात आरक्षणमध्ये घालायची असेल तर तो मागास पाहिजे. मराठा समाजाला तुम्ही बधीर समजता का? विदर्भातील शेतकऱ्यांकडे शेती म्हणून त्यांना आरक्षण मग आम्ही काय होडगे चालवतो का? असा सवाल त्यांनी केला.

आंदोलन करताना कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. केसेस झाल्याने मुलांना नोकरी मिळवताना अडचण येते. 14 ऑक्टोबर रोजी आरक्षणाची मागणी करणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी येणाऱ्यांनी महिला आणि मुलींची काळजी घावी, असे ते म्हणाले. आपला नोकरीतला टक्का कमी झाला नाही पाहिजे. सरकार टिकणारे आरक्षण देणार आहे. 40 व्या दिवशी मला आरक्षण पाहिजेच. मी शेतकरी कुटुंबातील आहे, माझी नियत एक इंचही ढळू दिली नाही. मला काही झाले तर मराठ्यांचे आग्यामोहळ खाऊन घेईल. धनगर आरक्षणाला आमचादेखील पाठिंबा आहे. मराठा आणि धनगरांचे दुःख सारखे आहे. पण, त्यात छगन भुजबळ आडवा येऊन राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली. श्रीमंतीवर आरक्षण ठरवले तर भुजबळ बाहेर पडतील, असा टोला त्यांनी लगावला.

एकमेकांच्या अंगावर जायचे नाही

धनगर समाजाला st मधून आरक्षण पाहिजे आणि आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवे. मंडळ कमिशनने ओबीसीला 14 टक्के आरक्षण दिले. 14 टक्के आरक्षण ओबीसीला 1990 मध्ये दिले. तुम्ही तुमचे आरक्षण घ्या. आम्हाला आमचे द्या. ओबीसी आणि मराठा एकच आहे त्यामुळे एकमेकांच्या अंगावर जायचे नाही, असे ते जरांगे पाटील म्हणाले.

फुटणारा नाही फुटवणारा

मला एकच किडनी आहे असे सांगण्यात आले. परंतु, तपासणीमध्ये दोन किडन्या आढळून आल्या. सरकारमधील काही जण यायचे. मला म्हणायचे कोपऱ्यात बोलू पण मी बोललो नाही. त्यांनी शासन आदेश आणले मी फेटाळले. मातब्बर मंत्री आमच्याकडे आले. एक मंत्री म्हणाला 4 दिवसात आरक्षण देऊ पण टिकणार नाही. माझ्या शेजारी मंत्री आला की तुम्हाला वाटायचे मी फुटतो काय. पण मी फुटणारा नाही फुटवणारा आहे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

स्वतःच्या  प्रतिष्ठेसाठी यांनी रात्रीतून सरकार बदलले

सरकारने महाराष्ट्रामधील सर्व पक्ष एकत्र आणले. मराठा समाज आरक्षणासाठी एक महिना वेळ द्यावा हा सरकारचा डाव होता. आम्ही 40 दिवस दिले आहे. आता आरक्षण द्यावेच लागेल. मला आरक्षण पाहिजेच. सरकारने माझ्यावर पाचवा डाव टाकला तुम्ही समितीमध्ये रहा. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाने एकजुटीने रहावे. मी माझ्या शब्दाबाहेर जात नाही. मला खुर्चीचा मोह नाही. स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी यांनी रात्रीतून सरकार बदलले अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली. आजाण सुरू होताच जरांगे पाटील यांनी भाषण थांबवले. हे संस्कार आमच्या मराठ्यांवर आहेत असेहीते यावेळी म्हणाले.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?