AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांचे उपोषण २६ जानेवारीपासून नाही तर…मुंबईकडे निघण्यापूर्वी मोठा निर्णय

maratha reservation issue | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. उपोषण आता २६ जानेवारीपासून नाही तर आजपासून सुरु करण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्याचा निर्णय आजच जाहीर करणार आहे.

मनोज जरांगे यांचे उपोषण २६ जानेवारीपासून नाही तर...मुंबईकडे निघण्यापूर्वी मोठा निर्णय
| Updated on: Jan 20, 2024 | 8:41 AM
Share

संजय सरोदे, जालना, दि.20 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता २६ जानेवारीपासून नाही तर अंतरवली सराटीपासून म्हणजेच आजपासून आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आपण आहोत. त्यासंदर्भात समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे.  समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे. समाजाला विचारुन मी आजच हा निर्णय जाहीर करणार आहे. आता समाजासाठी जीव अर्पण करायचे आहे. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

छातीवर गोळ्या आल्यातरी माघार नाही

मनोज जरांगे पाटील आज सकाळी 10 वाजता मुंबईकडे निघणार आहे. यामुळे अंतरवली सराटीच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. आंदोलक जिथून बाहेर पडणार त्या ठिकाणी लावले बॅरिकेट लावण्यात आले आहे. मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता छातीवर गोळ्या लागल्या तरी माघार नाही. समाजासाठी मी बलिदान देण्यास तयार आहे. उपोषण २६ जानेवारीपासून करायचे होते. त्यापेक्षा आजच का करु नये? हा विचार मी केला आहे. याबाबत समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे.

आता आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही

मराठा समाजाने सरकारला आरक्षणासाठी  7 महिने वेळ दिला. परंतु आरक्षण मिळाले नाही. यामुळे आरक्षण घेण्यासाठी मुंबईत येणार आहे. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून ही मुले मुंबईला जात आहेत. आता मी असेल नसेल विचार जागे ठेवा, असे सांगताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. सरकार आम्हाला रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही आमचे टप्पे पाडले आहेत. मी येथून एकटा निघालो तरी मुंबईमध्ये करोडो लोक असणार आहेत. आता आम्ही चारी बाजूने लढणार आहोत. ही आरक्षणसाठी शेवटची लढाई आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.