मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ, थेट आंदोलनातील महिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, गुन्हा दाखल करत..
मनोज जरांगे पाटील यांच्या समस्येत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. दोन महिला जरांगेंची तक्रार करण्यासाठी थेट मुंबईत पोहोचल्या. जरांगेंच्या विरोधात बोलल्याने आपल्याला कशाप्रकारचा त्रास दिला जात आहे, हे महिलांनी सांगितले.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप केली जात आहेत. ललिता तारक यांनी आरोप केले. हेच नाही तर त्यांनी पोलिसात तक्रारही दिली. आता जरांगेंच्या अडचणीत चांगलीच मोठी वाढ होताना दिसतंय. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रेखा कोंडे यांनी नुकताच म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांनी समाजाचा प्रश्न 2023 पासून मांडत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता पण आझाद मैदानाच्या आंदोलनंतर माझा त्यांच्यावरचा विश्वास उडाला होता आणि आता तर त्यांनी पाटोद्यात आंदोलन गुंडाळलं होत आणि त्यांना विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या मागणीच्या पत्राची मागणी मी केली होती. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी मला माझा चरित्र हनन केले आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून बलात्काराच्या धमक्या देऊन आमची बदनामी केली आहे.
यासंदर्भात आम्ही वेळोवेळी अनेक तक्रारी दाखल केल्या पण गुन्हा काही त्यांच्यावर नोंद होत नव्हता. त्यामुळे आम्ही मंत्रालयात आलो आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना आमची व्यथा सांगितली आणि आमच्या मागणीच पत्र दिला आहे. यासंदर्भात त्यांनी गृहविभागाला यासंदर्भात कारवाई करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी समाजाची फसवणूक केली आहे आणि त्यांना आता एकही प्रश्नाच उत्तर देता येत नाही. ललिता तारक अंतरवाली सराटी या मागील काही दिवसांपासून जरांगेंवर आरोप करत आहेत. त्यांनी म्हटले की, मी आंतरवाली सराटी येथे राहते जिथे मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असतात. पण त्यांनी आता जे पाटोद्यात आंदोलन मागे घेतल यासंदर्भात मी काही प्रश्न उपस्थित केले आणि या पाटोद्याच्या आंदोलनंतर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमधील आंदोलनाचा स्टेज काढण्याचा निर्णय घेतला.
यावर आम्ही प्रश्न उपस्थित केले तर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी खालच्या भाषेत माझ्यावर कमेंट केल्या आणि चारित्र्य हनन केल आहे. यासंदर्भात आम्ही मंत्रालयात आलो. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मी तुमची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मला तुम्ही न्याय द्या अशी मागणी केली.