AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ… माझ्या नादाला लागायचं नाही, जरांगे पाटलांचे मंत्री गोगावलेंना उत्तर

Jarange vs Gogawale : मंत्री भरत गोगावले यांनी तर जरांगे यांना थेट इशारा दिला होता.याला आता जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ... माझ्या नादाला लागायचं नाही, जरांगे पाटलांचे मंत्री गोगावलेंना उत्तर
jarange and GogawaleImage Credit source: Google
| Updated on: Sep 08, 2026 | 9:39 PM
Share

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. काहीही झालं तरी सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मी माझे उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. अशातच गेल्या काही काळापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. शिंदे यांना टार्गेट केल्यामुळे शिवसेनेचे नेते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी तर जरांगे यांना थेट इशारा दिला होता. आमच्या नेत्याला लक्ष्य केलं जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असं गोगावले यांनी म्हटले होते. याला आता जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ आहात…

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘मी तयार आहे कधीही सज्ज आहे, तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ आहेत. माझ्या नादाला लागायचं नाही. माझ्याकडे पुरावा आहे. मीडियात पुरावा देईन मी शिंदेंवर बोलणार आहे. तुम्ही मराठ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्यांच्या बाजूने बोलू नका. मग तुमच्यापेक्षा तटकरे बरा म्हणावं लागेल. होऊ दे काय व्हायचं ते.

शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये…

पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘तुम्हाला आरक्षण द्यायचा कंटाळा आला असेल आणि यावर त्यावर बोलू नका असं म्हणायच असेल तर तुम्ही फक्त कारण देत असाल तर शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये. आरक्षण द्यायच्या वेळेला यांच्यावर बोलू नका, त्यांच्यावर बोलू नका असं सांगणं योग्य नाही. तुम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे नसतील तर अंतरवालीत येऊ नका. तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करून संपून जाणार आहे. तुम्ही काय आहे करता तेही आम्ही बघू.

…तर मुंबई ठप्प पडेल

जरांगे पाटलांनी पुढे बोलताना म्हटले की, आपण कुणाला काय बोलायचं, आपण काय कुणाचे गुलाम आहोत काय? आपण यांना भाकर मागितली, त्यांनी नाही दिली. महाराष्ट्रातील मराठ्यांना मी सांगतो की 12 तारखेला मुंबईला जायचं की नाही जायचं? मराठ्यांनी मुंबईला प्रदक्षिणा घातली तर मुंबई ठप्प पडेल. जाळपोळ करुन काही मिळणार नाही. फक्त सगळ्यांनी सावध राहा.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?