AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : अर्धी लढाई जिंकली, शब्दाला मान म्हणून पाणी प्याले पण आज..मनोज जरांगेंसाठी महाराष्ट्रात कुठे-कुठे कडकडीत बंद ?

Manoj Jarange Patil : विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अर्धी लढाई जिंकली आहे. काल ते पाणी प्याले. पण आज त्यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार? हे महत्वाचं आहे.

Manoj Jarange Patil : अर्धी लढाई जिंकली, शब्दाला मान म्हणून पाणी प्याले पण आज..मनोज जरांगेंसाठी महाराष्ट्रात कुठे-कुठे कडकडीत बंद ?
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 03, 2026 | 7:24 AM
Share

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठ्यांना वंशावळीनुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळावं तसचं हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्राचं वाटपं व्हावं या मागण्यांसाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. काल भाजपं आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांच्या मागण्या केल्याचं प्रसाद लाड यांनी जाहीरपणे सांगितलं. पण असं असूनही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी उपोषण सोडलेलं नाही. फक्त पाणी प्याले. हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप मराठवाड्यातून सुरू व्हावं तसचं किमान चार प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्राचं वाटप सुरू होऊ द्या मग बघू, असं ते स्पष्टपणे म्हणाले.

दरम्यान आज धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याचे मराठा बांधवांना आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा बांधवांकडून आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी एक दिवस आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून आंदोलनाला समर्थन द्यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांच्या समन्वयकांकडून करण्यात आले आहे. या जिल्हा बंदसंदर्भात सकल मराठा बांधवांच्या वतीने काल जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. दरम्यान मनोज जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

जरांगेंच्या समर्थनार्थ आज कुठे रास्ता रोको?

मनोज जरांगे पाटलांना आज शिष्टमंडळ भेटण्याची शक्यता आहे. मराठा समाजाकडून नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आज परळी बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परळी बंदचे आवाहन करण्यात आलय. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज हिंगोलीत रास्ता रोको करण्यात येईल. जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये रास्ता रोकोची घोषणा करण्यात आली आहे. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही, यावर मनोज जरांगे पाटील काल ठाम राहिले. सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असं त्यांनी सर्वांसमोर जाहीर केलं.

Follow Us
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब