AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद पाटील यांच्या उमेदवारीत कोणी टाकला मिठाचा खडा… पाटलांचा सरळ यांच्यावर आरोप

chhatrapati sambhaji nagar lok sabha constituency vinod patil: संदीपान भुमरे हे माझ्या आजोबाच्या वयाच्या आहे. त्यांच्याबद्दल मला सन्मान आहे. मला त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही. पण मला जिल्ह्याचे युवकांचे प्रश्न पडण्यासाठी दिल्लीला जायचं आहे. माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याच्या तरुणांशी आहे. त्यासाठी मी लढतो आहे 100% मी निवडणूक लढणार आहे.

विनोद पाटील यांच्या उमेदवारीत कोणी टाकला मिठाचा खडा... पाटलांचा सरळ यांच्यावर आरोप
vinod patil
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 22, 2024 | 12:29 PM
Share

छत्रपती संभाजी नगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे नेते आणि मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या या जागेवर मराठा आंदोलनाचे नेते विनोद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. त्यांनी त्यासाठी दोन, तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यावर बोलताना कोणामुळे उमेदवारी मिळाली नाही, हे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची संभाजीनगर लोकसभेसाठी मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. परंतु महायुतीमधील दोन आमदार आणि एका राज्यसभा सदस्याने माझ्या उमेदवारीला विरोध केल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला. संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णयाचा पुनर्विचार होईल, अशी आपणास अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

विनोद पाटील निवडणूक लढण्यावर ठाम

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचं गणित आहे. ती चर्चा करण्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलो. कोणतेही आश्वासन मिळावं यासाठी भेट नव्हती तर मतदार संघाची काय स्थिती आहे, यासाठी पुन्हा एकदा ती तपासली गेली पाहिजे यासाठी ही भेट होती. मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकतीने ही निवडणूक लढणार आहे, असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.

आजची चर्चा सकारात्मक झाली

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांची इच्छा होती. विनोद पाटील यांना तिकीट मिळावे मात्र महायुतीतील दोन आमदार आणि एक सन्माननीय राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे मला उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवारी जाहीर झाली आहे जनतेचा काय मत आहे ते जाणून घेतलं पाहिजे माझा पुनर्विचार झाला पाहिजे यासाठी मी भेटायला आलो आहे. मला इलेक्ट्रिव्ह वोट मिळेल, असे विनोद पाटील यांनी सांगितले.

समाज नव्हे सर्वांना सोबत घेणार

मराठा समाज म्हणून मला निवडणूक लढवायची नाही. अठरापगड जातींना सोबत घेऊन मी निवडणूक लढणार आहे. एक युवक म्हणून माझ्याकडे विकासाचा व्हिजन आहे. त्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे. या निवडणुकीत प्रमुख तीन उमेदवार रिंगणात आहे. त्यांनी आजपर्यंत काय केले, छत्रपती संभाजी नगरच्या तरुणांमध्ये नैराश्याच वातावरण आहे. यामुळे अजूनही वेळ गेली नाही. महायुतीकडून उमेदवारीचा पुनर्विचार होरू शकतो, असे विनोद पाटील यांनी सांगितले.

संदीपान भुमरे हे माझ्या आजोबाच्या वयाच्या आहे. त्यांच्याबद्दल मला सन्मान आहे. मला त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही. पण मला जिल्ह्याचे युवकांचे प्रश्न पडण्यासाठी दिल्लीला जायचं आहे. माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याच्या तरुणांशी आहे. त्यासाठी मी लढतो आहे 100% मी निवडणूक लढणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा