सर्वात मोठी बातमी! आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईतील आंदोलनाला आलेल्या यशानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

सर्वात मोठी बातमी! आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2025 | 4:48 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं आहे, त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे. हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे, राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे.

याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे.  धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, लाखो मराठा बांधव हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनाला यश आलं, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, तर काही मागन्या माण्य करण्यासाठी वेळ मागितला आहे, मराठा समाजाची जी मुख्य मागणी होती, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करा त्याचा जीआर सरकारने काढला आहे, त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

मराठा, ओबीसी आमने-सामने  

दरम्यान राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारने जीआर काढल्यानंतर आता ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाकडून या जीआरला विरोध होत आहे. मराठा समाजाला आमच्यामधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे, तर दुसरीकडे याच गॅझेटवरून बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. आमचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे.