मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याच्या सूचना..
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अत्यंत मोठा इशारा दिला. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यासोबतच शिंदेंचे नाव घेत मोठा दावा केला. विखे हे फडणवीसांची भाषा बोलत असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. जरांगे यांनी मोठे आवाहन केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. उद्यापासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांचं शेवटचं निर्णायक आंदोलन सुरू होणार आहे. सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. या सगळ्या संदर्भात आज दिवसभरात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र, 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जरांगे उद्याच्या निर्णायक आंदोलनावर ठाम आहेत. सरकारच्या शिष्टमंडळ भेटीसाठी आल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांच्यासमोर मागण्या ठेवल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काही संपर्क होतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यादरम्यानच मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत मोठी घोषणा केली.
घरात बसू नका, घरातून बाहेर पडत अंतरवाली सराटीमध्ये या असे मोठे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, नोंदी सापडलेल्या असून काहींना अर्ज दिले नाहीत. ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनीही अंतरवालीत यावे. फडणवीस सांगतात तसं विखे पाटील बोलतात. आता वंशावळ सापडली, महसूल पुरावा नसेल तर काय करावे? नाही वावर तर आम्ही मराठे नाहीत का? काय करावं.
मेलेलं माणूस दाखवा म्हणतात. त्याचा कसा अंगठा घ्यायचा. काहीपण नवीनच काढतेत. इतक्या भिकार विचार नसावेत, इतके जास्त मराठ्यांचे वाटुळ करू नका रे.. पटापट इकडे या… इकडे पाऊस नाही, शेतातही काही पिकत नाही, इतके आपल्याला नोकऱ्याही नाहीत. पुन्हा ओरडतात आम्हाला आरक्षण नाही. मराठ्यांनी जागा व्हा, हे सरकार आपल्या लेकरांचे वाटोळे करत आहे. नोंदी सापडल्यानंतर काहींनी अर्ज केले नाहीत. लेकीबाळीचे कशाला वाटोळे करतो. यांच्या बापाकडून मी प्रमाणपत्र घेतो.
विखे यांच्याकडून आम्हाला खूप जास्त अपेक्षा होत्या. देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून सर्व ऐकू नये, शिंदे यांचे ऐकून सर्व ऐकू नये, असे जरांगे यांनी म्हटले. मराठ्यांनी घरात न बसता बाहेर यावे. शिंदेंनी आणली लाडकी बहीण आणि फडणवीस यांनी आली लाडकी दीदी.. लाडकी बहीण म्हटले की, शिंदेंचे श्रेय आणि लाडकी दीदी म्हटले की फडणवीस यांचे श्रेय. पण तुमच्या या श्रेयामध्ये पोरी मरत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले. मी वर्षा बंगल्यावर येऊन बसेल, असाही मोठा इशारा जरांगे पाटील यांनीदिला.