बंडू जाधव तू आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली.. जरांगेंचा अत्यंत मोठा इशारा

खासदार संजय जाधव यांच्याकडून परभणीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. मात्र, हा मेळावा रद्द करावा, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. संजय जाधव मेळावा घेण्यावर ठाम आहेत.

बंडू जाधव तू आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली.. जरांगेंचा अत्यंत मोठा इशारा
Manoj Jarange Patil and Sanjay Jadhav
| Updated on: Aug 30, 2026 | 12:46 PM

ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी परभणीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्याची गेल्या कित्येक दिवसांपासून तयारी सुरू होती. या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. एकनाथ शिंदे मराठवाडा दाैऱ्यावर आहेत. परभणीतील शेतकरी मेळावा रद्द करा, असा मोठा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. हेच नाही तर हा मेळावा रद्द झाला नाही तर मी परभणीला जाईल, असेही जरांगे यांनी म्हटले. जरांगे यांनी खासदार बंडू जाधव यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. जरांगे यांच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधव मेळावा घेण्यावर ठाम आहेत. रात्री सांगितले असते तरीही रद्द केला असता पण आता लोक येऊन बसल्याचे त्यांनी म्हटले.

हेच नाही तर संजय जाधव यांनी परभणीच्या एसपीसोबत चर्चा केली. एकनाथ शिंदे परभणी दाैऱ्यावर आहेत, त्यापूर्वीच हा इशारा देण्यात आला. कार्यक्रमात गोंधळ होईल, असे स्पष्ट शब्दात जरांगे पाटील यांनी म्हटले. संजय जाधव यांनी स्पष्ट केले की, मेळावा होणार. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान करत गुंड संजय जाधवला आैदसा आठवल्याचे त्यांनी म्हटले.

पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, कार्यक्रम रद्द केला नाही तर संजय जाधवची मोठी चूक होईल. शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार असे जरांगे यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, संजय जाधव थर्ड क्लास माणूस निघाला. परभणीत हा मेळावा घेतला तर कायदा सुव्यवस्था बिघडेल.

यादरम्यान परभणी पोलिसांनी संजय जाधव यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. संजय जाधव यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. संजय जाधव आता मेळाव्याकडे रवाना झाले. परभणीतील स्टेडियममध्ये हा मेळावा घेतला जात आहे. लोक तिथे समजताना दिसत आहेत. मोठा इशारा जरांगे यांनी देऊनही हा मेळावा होणार आहे.

Follow Us