AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंचे खासदार संजय जाधव अडचणीत, थेट जरांगे यांचा मोठा इशारा, मेळावा रद्द केला नाही तर मी…

परभणीत आज शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय जाधव यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. मात्र, हा मेळावा रद्द करण्यास जरांगे यांनी सांगितले. त्यांनी थेट मोठा इशाराही दिला.

शिंदेंचे खासदार संजय जाधव अडचणीत, थेट जरांगे यांचा मोठा इशारा, मेळावा रद्द केला नाही तर मी...
Manoj jarange pati and sanjay jadhav
| Updated on: Aug 30, 2026 | 11:19 AM
Share

परभणीत आज शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय जाधव यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. हा मेळावा रद्द करा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांना फोन केला. मनोज जरांगे पाटील यांचा संजय जाधव यांना कॉल तो कार्यक्रम रद्द करा, स्पष्ट शब्दात म्हणत मोठा इशारा दिला. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली. स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसापासून या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, आता अचानक मनोज जरांगे यांनी हा मेळावा रद्द करण्याचा इशारा दिला. एकनाथ शिंदे परभणी दाैऱ्यावर असतानाच जरांगे यांनी हा इशारा दिला. मागील काही दिवसांपासून शिंदेंवर टीका करताना मनोज जरांगे पाटील दिसले.

मनोज जरांगे पाटील यांनी संजय जाधव यांना फोन करत म्हटले की, शेतकरी मेळावा घेताय, त्याला एकनाथ शिंदे येणार आहेत, तो प्रोग्रॉम घेऊ नका, अन्यथा मी तिथं येईल असे जरांगे जाधव यांना म्हणाले. शिरसाट मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि हे मराठ्यांच्या जीवावर उड्या मारायला कार्यक्रम घेणार का असा सवाल त्यांनी केला.

कार्यक्रम रद्द करा… अन्यथा गोंधळ अटळ आहे असे म्हणत जरांगे यांनी मोठा इशारा दिला. संजय शिरसाट यांनी रद्द केलेले प्रमाणपत्र द्या मग या एकनाथ शिंदे यांना सांगा… नाही तर मी आता येतो तिकडे.. असे जरांगे यांनी फोनवर जाधव यांना सांगितले. आता हा मेळावा होणार की, नाही याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

मी स्वत: तिकडे येतो, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. आता परभणीचे खासदार संजय जाधव नक्की काय निर्णय घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मी उपोषण सोडून आंदोलस्थळी येईल, असा इशारा जरांगे यांनी दिला. त्यांनी परभणीला जाण्यासाठी गाडी लावा असेही त्यांनी यादरम्यान सांगितले.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?