AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 डिग्रीच्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु; सरकारकडून मनधरणी सुरू..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. भर उन्हात ते उपोषणाला बसले आहेत. 40 अंश सेल्सिअस तापमानात त्यांचे उपोषण सुरू आहे. सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहे.

40 डिग्रीच्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु; सरकारकडून मनधरणी सुरू..
Manoj Jarange Patil
| Updated on: May 30, 2026 | 11:33 AM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले. यावेळी ना मंडप ना कुलर.. थेट आंतरवाली सराटीच्या शेतशिवारात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मे महिना सुरू अजून कडाक्याचे उन्ह पडले आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. उष्णघाताची समस्या अधिक आहे. सध्या आंतरवाली सराटीत 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान आहे. 40 अंश सेल्सिअसच्या पुढील तापमानात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या काही मागण्यांकरिता जरांगे पाटील उपोषणाला बसले. सरकारच्या शिष्टमंडळाने कालच जरांगे पाटील पाटील यांची भेट घेतली. मात्र, काही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. जरांगे यांनी उपोषणाला सुरूवात केली.

दुसरीकडे मराठा समाज आक्रमक होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अन्य काही लोकही शेतशिवारात उपोषणाला बसली आहेत. छत्रपती संभाजीनगरहून जरांगे पाटील यांची समजूत काढण्याकरिता सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटी दाखल झाले . काल शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यादरम्यान महत्वाची चर्चा झाली.

विखे पाटील मनोज जरांगे यांची समजूत काढण्याकरिता आंतरवाली सराटीकडे आले. कडक उन्हात जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली. हेच नाही तर जरांगे पाटील यांनी मोठा इशारा देत म्हटले की, सरकारला आता इथेच चर्चा करण्याकरिता यावे लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये जरांगे यांचे उपोषण थांबावे, याकरिता सरकारकडून प्रयत्न केली जात आहेत.  मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया हलगर्जी केल्याप्रकरणी कन्नडच्या उपविभागी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलीये.

काल मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. विभागीय आयुक्त सोबत झालेल्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेतली.  प्रमाणपत्र वाटप दिरंगाई केल्याचे पुढे, चौकशी सुरु केली. मनोज जरांगे यांनी बाजेवर बसून उपोषणाला सुरूवात केली. सरकारला जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवण्यात यश मिळते का? हे पाहण्यासारखे ठरेल.

Follow Us
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा.
जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया.
प्रकरण पेटलंच! मी चर्चेला तयार, मात्र आता चर्चादेखील रखरखत्या उन्हातच.
प्रकरण पेटलंच! मी चर्चेला तयार, मात्र आता चर्चादेखील रखरखत्या उन्हातच..
प्रदर्शनाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला नेलं अन्...! शिक्षकाचा घृणास्पद
प्रदर्शनाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला नेलं अन्...! शिक्षकाचा घृणास्पद.
समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला... जरांगे रडले
समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला... जरांगे रडले.
उन्हाच्या तडाख्यात आमरण उपोषण… जरांगे पाटील ठाम! आश्वासनांना थेट नकार
उन्हाच्या तडाख्यात आमरण उपोषण… जरांगे पाटील ठाम! आश्वासनांना थेट नकार.
मारूतीचं दर्शन घेतलं... मीडियाशी संवाद साधला अन् अंतरवलीकडे निघाले...
मारूतीचं दर्शन घेतलं... मीडियाशी संवाद साधला अन् अंतरवलीकडे निघाले....
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम.
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर.