AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळांची अक्कल दाढ पडली, बुद्धी…; जरांगे पाटील यांचे भुजबळांना प्रत्युत्तर

बीड येथे ओबीसींच्या महायल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा दरिंदे पाटील असा उल्लेख करीत मोठी टीका केली आहे. त्यावर नंतर जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

भुजबळांची अक्कल दाढ पडली, बुद्धी...; जरांगे पाटील यांचे भुजबळांना प्रत्युत्तर
| Updated on: Oct 17, 2025 | 10:34 PM
Share

ओबीसी नेत्यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे महाएल्गार सभा आयोजित करीत मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांना आव्हान दिले. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना आमच्या ओबीसींच्या बोकांडी बसवण्याचा प्रयत्न का केला जात आहे असा सवाल केला. छगन भुजबल यांनी मराठा आंदोलक नेते जरांगे पाटील यांचा ‘दरिंदे पाटील’ असा उल्लेख करीत त्यांच्या मोठी टीका केली आहे. यावर आता जरांगे पाटील आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

ओबीसी समाजाच्या एल्गार सभेनंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, हे बीडमध्ये येऊन दहशत निर्माण करीत आहेत, आता मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणच्याही असल्या दबावाला भितही नाही.मराठ्यांनाही आपल्या लेकरांचे भवितव्य वाचवण्यासाठी यांना तोडीस तोड उत्तर द्यावेच लागणार आहे. बीडची ही पवित्र भूमी महाराष्ट्राचा दिशा दर्शक होऊ शकतो असेही जरांगे यावेळी म्हणाले.

पण आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार

बीड जिल्ह्यातून दिशा देण्याची ताकद मराठ्यांना दाखवावी लागणार आहे. परंतू यांचे जे स्वप्न आहे मराठ्या भीती आणि दहशत दाखवण्याची आणि जातीय दंगली घडवून आणायच्या हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ द्यायचे नाही. आपण सुद्धा यांना ताकद दाखवलीच पाहिजे. भुजबळ यांनी तुमचा दरिंदे पाटील असा उल्लेख केला आहे असे विचारता जरांगे पाटील म्हणाले की ते काहीही बरळतंय अक्कल दाढ पडलीय त्याची. घुरट सगळीकडे वास दरवळत हिंडतंय तसं भुजबळ यांचे झाले आहे. आणि स्वत:च्या चक्रव्युहात ओबीसी नेत्यांना घेऊन त्याचा ते देव्हारा करु लागले आहे. तुम्ही किती दडपण आणायचा प्रयत्न करा पण आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा दावा जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

तुझा रक्ताळलेला चष्मा नको

बीडचे मराठे एवढे कच्चे नाहीत तेवढे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी यावेळी दिला. धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील हे आपला परळीचा चष्मावाला असा उल्लेख करताय. त्यावर मुंडे यांनी आपला चष्मा द्यायला तयार असे सांगितले आहे असे विचारता जरांगे यांनी तुझा चष्मा कोणी मागितला. तो तुलाच ठेव, तुझ्या चष्म्याने काय केलेय हे लोकांनी बघितले आहे. तुझा रक्ताळलेला चष्मा नको असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....