Maratha Reservation | गावकरी आक्रमक शिवसेना खासदाराच्या ताफ्यातील गाड्या फोडल्या
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी एकाबाजूला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. त्याचवेळी गावागावात मराठा समाज आक्रमक होत असल्याच चित्र दिसतय. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन शिवसेना खासदाराच्या ताफ्यातील वाहन फोडण्यात आल्याची घटना घडलीय.

नांदेड : राज्यात मराठा आरक्षणावरुन बऱ्याच घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. तात्काळ आरक्षण द्याव अशी त्यांची मागणी आहे. काल मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या गुणरत्ने सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली. काल रात्री उशिरा शिवसेना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावातील रात्री उशिरा ही घटना घडली. खासदारांसह त्यांच्या सोबत असलेल्या वाहनांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आलीय. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तोडफोडीत तीन वाहनांचे मोठं नुकसान झालय.
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावात नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आरक्षण घेऊन या, नंतरच प्रवेश मिळेल अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी असतानाही प्रताप पाटील चिखलीकर तिथे गेले. त्यांच्या ताफ्यातील वाहन माघारी फिरत असताना या गाड्या फोडण्यात आल्या. गावकरी आणि चिखलीकर यांच्यात वादवादी झाल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन वाद वाढू दिला नाही. शिंदे समितीला मुदतवाढ
दरम्यान मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे समितीला आता सरकारकडून 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे. शिंदे समितीला अहवाल देण्यासाठी आधी 30 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत. मराठा आरक्षणासाठी कुणबी दाखले आवश्यक आहेत. त्यामुळे तेलंगणामधून मूळ कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळेच सरकारने समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. निजाम स्टेटचे सगळे मूळ डॉक्युमेंट्स हे तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी आहेत. या कागदपत्रांच्या आधारे शिंदे समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
