AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर म्हणतात, मनोज जरांगे हट्टी, सल्ला ऐकत नाही…हेल्थ बुलेटीनमध्ये काय?

manoj jarange patil| माकणी आणि मुरुड तसेच बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सोमवारी पार पडल्या. या सभेत बोलताना त्यांची प्रकृती खालवली. त्यानंतर मंगळवारी त्यांचे मेडिकल बुलेटीन जारी झाले. डॉक्टरांनी मनोज जरांगे हट्टी माणूस असल्याचे म्हटले आहे.

डॉक्टर म्हणतात, मनोज जरांगे हट्टी, सल्ला ऐकत नाही...हेल्थ बुलेटीनमध्ये काय?
मनोज जरांगे
| Updated on: Dec 12, 2023 | 10:39 AM
Share

संजय सरोदे, जालना | 12 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभरात चौथा टप्प्याचा दौरा सुरु आहे. या दौऱ्यात माकणी आणि मुरुड तसेच बीड जिल्ह्यात त्यांची सभा सुरु होती. यावेळी त्यांची प्रकृती खालावली. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरानी त्यांना नितांत आराम करण्याचा सल्ला दिला. त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु मनोज जरांगे पाटील ऐकवण्यास तयार नाहीत. डॉक्टर म्हणातात, मनोज जरांगे यांच्याबद्दल सामान्य माणूस म्हणून असे वाटत की, हा माणूस हट्टी आहे. डॉक्टरांचा सल्ला ऐकत नाही. त्यामुळे अशी सेवा करण्याची संधी कोणत्याच डॉक्टरांवर यायला नको.

काय आहे मेडिकल बुलेटीन

डॉक्टरांनी मनोज जरांगे यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यांची तब्बेत ठीक नाही. त्यांना आराम गरजेचा आहे. परंतु ते ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांच्या महत्त्वाच्या सभा करून लागलीच छत्रपती संभाजीनगरात जाऊन रुग्णालयात दाखल व्हावे. प्रकृती बरी नसली तर मनोज जरांगे पाटील आज त्यांची बीड जिल्ह्यातील बोरी सावरगाव, धारूर, हरकी निमगाव येथील माऊली फाटा येथे पार पडणार आहे.

काय म्हणतात मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी आपण नियोजित दौरा पार पाडणार असल्याचे मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. रात्रंदिवस कार्यक्रम सुरू आहेत. त्याची दगदग होत आहे. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. डॉक्टर सुट्टी देत नाहीत. पण मी सुट्टी घेणार आहे. समाज अडचणीत असताना आपण आराम करायचा नाही. समाजापेक्षा मी मोठा नाही. मी माझ्या जीवाची पर्वा केली तर समाजातील मुले अडचणीत येतील. सर्व कार्यक्रम वेळेवर होणार आहेत. दौरा संपल्यानंतर संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आपण दाखल होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाने आरक्षणासाठी आतापर्यंत खूप वेदना सहन केल्या आहेत. एक जीव जाईल पण 6 कोटी जीव वाचतील. मराठा समाजातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. समाजाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. यामुळे आराम महत्वाचा नाही.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.