AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मराठा बांधवांसाठी गुडन्यूज; जरांगे पाटलांना मिळालं मोठं यश, एक ते दीड तासांमध्ये आदेश निघणार

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा तापला आहे, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! मराठा बांधवांसाठी गुडन्यूज;  जरांगे पाटलांना मिळालं मोठं यश, एक ते दीड तासांमध्ये आदेश निघणार
| Updated on: Aug 27, 2025 | 3:26 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे, आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत, मात्र मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास हाय कोर्टानं मनाई केली आहे. परंतु जरांगे पाटील हे आझाद मैदान येथेच आंदोलन करण्यावर ठाम आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.

हाय कोर्टानं आझाद मैदानाची परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं तब्बल अर्धा तास प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पुढील दीड तासांमध्ये आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचा दावा आता  मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

नवीन अर्ज जो केला आहे,  त्या संदर्भात प्रशासन विचार करत आहे. काही वेळात परवानगी मिळेल, अर्धा ते एक तासात ही परवानगी मिळणार आहे. नवीन नियमावली काल आली आणि त्याप्रमाणे ती न्यायालयात मांडली सुद्धा. त्या पद्धतीने आम्ही अर्ज केलेला आहे . जी कृती कायदेशीर करायची ती आम्ही केलेली आहे.

काल साडेबारा एकच्या दरम्यान आम्ही अर्ज दिलेला आहे,  काल रात्री आम्ही त्या ठिकाणी होतो. सकाळी देखील आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि चांगली बातमी अर्ध्या तासात मिळेल याची अपेक्षा करतो, असं शिष्टमंडळाच्या वकिलांनी म्हटलं आहे.

त्या ज्या अटी शर्ती सांगितलेल्या होत्या त्या संदर्भात चर्चा झाली,  कालच्या सुनावणीत जरांगे पाटील कुठेही नव्हते . त्यांचं म्हणणं सादर करण्याची संधी देखील मिळाली नाही. ती संधी न मिळाल्यामुळे या गोष्टी झाल्यात. मैदानाचा वेळ पाळणे व इतर गोष्टी ज्या आहेत, आमरण उपोषणसह आंदोलनासंदर्भातील सर्वबांबीसाठी आम्ही अर्ज केला आहे, असंही ते यावेळी म्हणाले, त्यामुळे आता जरांगे यांचं आंदोलन आझाद मैदानावर होण्याची शक्यता वाढली आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा