AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळांच्या डोक्यात…; शिंदे गटातील बड्या नेत्याचा घणाघात

मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीचा बहिष्कार केला आणि न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. शहाजी बापू पाटील यांनी भुजबळांवर टीका करत मतांसाठी समाजाला भडकवण्याचा आरोप केला.

छगन भुजबळांच्या डोक्यात...; शिंदे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
| Updated on: Sep 04, 2025 | 7:20 PM
Share

मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढण्यात आला. यानंतर मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असेल तरी ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर छगन भुजबळ अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. आता माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर यावरुन जोरदार टीका केली आहे.

शहाजी बापू यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. “छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी समजून घ्यायला हवं. छगन भुजबळ यांनी केवळ मतांसाठी समाजाला भडकवण्याचं काम करू नये. प्रसिद्धी व निवडणूक यापलीकडे त्यांच्या डोक्यात काहीच नाही”, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली.

छत्रपतींचे दोन्ही दफ्तरे तुम्हाला डावलता येणारच नाहीत

यावेळी शहाजी बापू पाटील यांनी हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा संदर्भ देत भाष्य केले. निजामशाही संपवून जेव्हा हैद्राबाद भारतात सामील झाले, तेव्हापासूनच त्यांनाही भारतीय संविधान लागू झाले आहे. त्यामुळे संविधानासोबतच हैदराबाद आणि सातारा येथील दोन्ही गॅझेट विचारात घेणे आवश्यक आहे. हैदराबाद आणि सातारा येथील छत्रपतींचे दोन्ही दफ्तरे तुम्हाला डावलता येणारच नाहीत, असेही शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.

संजय राऊत हे काड्या लावणारे आणि लबाड

यावेळी शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत खरं कधी बोलतात, हे सांगा. ज्या दिवशी ते खरं बोलतील, त्या दिवशी मी महात्मा गांधींच्या फोटोची पूजा करेन, असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत हे काड्या लावणारे आणि लबाड आहेत. ते दोन गटांमध्ये भांडणे लावतात. त्यांनी पेटवलेल्या राजकारणावर लवकरच एक पुस्तक लिहिणार असल्याचंही शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं. संजय राऊत यांना महायुतीमध्ये भांडण लागावं आणि महायुती फुटावी असं वाटत आहे. मात्र, ही महायुती पुढील पंचवीस वर्षे टिकणार असल्याचा विश्वासही शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी