
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला अखेर यश आलं. राज्य सरकारची उपसमिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सकारात्मक बैठक झाली. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यानंतर काही तासातच हैदराबाद गॅझेटबद्दलचा जीआर काढण्यात आला. आता यावरुन राजकारण तापलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येऊ शकते. जर गरज पडली तर आम्ही या जीआरविरोधात येत्या चार दिवसांत न्यायालयात जाणार आहोत,” अशी ठाम भूमिका भुजबळांनी घेतली आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांना कोर्टात जाऊ द्या, तो त्यांचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना भुजबळ कोर्टात जाणार असल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. मंत्री छगन भुजबळ यांना कोर्टात जाऊ द्या, तो त्यांचा प्रश्न आहे. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही महाराष्ट्राचे नागरिक असून आम्ही सर्वांना मराठी बांधव म्हणूनच पाहतो. प्रत्येकाने आपापल्या प्रश्नासाठी संघर्ष केला पाहिजे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही कोणत्याही जाती-धर्मात भेद न करता मराठी माणसाची एकजूट निर्माण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
मराठा किंवा ओबीसी यांना आम्ही समस्त मराठी माणूस म्हणून पाहतो. प्रत्येकाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्याने आपापल्या पद्धतीने लढाई लढली पाहिजे. पण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे माणसं आहोत. त्यामुळे कोणत्याही जाती जातीचा उपभेद न करता मराठी माणसाची भक्कम एक्झिट उभारण्याचा भूमिकेवर आम्ही ठाम असतो. पण गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी महाराष्ट्रात आणि देशांमध्ये जातीचे राजकारण, धर्माचं राजकारण सुरू केलं आणि देशांमध्ये जातीय आणि धार्मिक फाळणीचं स्वरूप निर्माण केलं, असे संजय राऊतांनी म्हटले.
त्याच्यामुळे हे प्रत्यक्ष प्यादे म्हणून वापरले गेले. भुजबळ हे एक प्यादे म्हणून वापरले गेले. भुजबळांना मंत्री कोणी केलं, अजित पवारांनी केलं नाही. भुजबळांना मंत्री नरेंद्र मोदी यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी मंत्री का केलं. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी ते स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून आजही समजतात. मै ओबीसी हू असं कधी कुठल्या प्रधानमंत्री ने सांगितला आहे. का माझी जात त्याच्यामुळे केवळ ओबीसी म्हणून विशेष जीआर काढून भुजबळांना मंत्रिमंडळात घ्यावा लागला. अजित पवारांना याची कल्पना नव्हती, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.