AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey : ऐकाना… जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र… चक्क जपानी पोरगी बोलतेय मराठीत, राज ठाकरेंकडून व्हिडीओ शेअर करत कुणावर निशाणा?

Japanese girl learning Marathi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी शिकणाऱ्या एका जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर केला. त्यासोबत त्यांनी एक पोस्टही लिहीत तिचं कौतुक केलं आहे. मात्र त्याद्वारे त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांवर टीकास्त्रही सोडलं.

Raj Thackrey : ऐकाना... जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र... चक्क जपानी पोरगी बोलतेय मराठीत, राज ठाकरेंकडून व्हिडीओ शेअर करत कुणावर निशाणा?
राज ठाकरे यांच्याकडून जपानी मुलीचं कौतुकImage Credit source: social media
| Updated on: Feb 24, 2026 | 2:15 PM
Share

मराठी भाषा, मराठी अस्मिता या मुद्यावरून राज्यात नेहमी चर्चा होत असते, तापलेलं असतं. मराठी भाषा दिनही  आता जवळ आला आहे. मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेवरू टिपण्णी केली होती. भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे भाषेच्या आधारावर वाद करणे म्हणजे स्थानिक आजार असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोहन भागवतांना खडे बोल सुनावले होते. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून एक पोस्ट लिहीली असून त्यात त्यांनी मराठी शिकणाऱ्या जपानी मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी तिचं कौतुक तर केलंच पण याच पोस्टमधून त्यांनी सरसंघचालक मोहन भागव यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा आहे.

गेल्या काही दिवसांपासून जपानी मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ती मराठी भाषेतील काही शब्द, काही वाक्य उच्चारताना दिसत्ये. हा व्हिडीओ तुम्हीही आत्तापर्यंत पाहिला असेल. आता खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्या मुलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी तिचं, भाषा शिकण्याच्या वृत्तीचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना चपराक लगावली असून भाषेवरून बोलाऱया मोहन भागवता यांनाही टोला लगवाल आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले राज ठाकरे ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी त्यांच्याच शब्दांत…

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा ‘मराठी’ आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात.

मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही.

मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही.

त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏

राज ठाकरे ।

सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी.
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज.
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते.
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?.
आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती
आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती.
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन.