दोन ओळीचा हातावर मेसेज… अन् तिने आयुष्य संपवलं, त्या घटनेने अख्खं सोलापूर हादरलं; आरोपी कोण?

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने हातावर संदेश लिहून जीवन संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन ओळीचा हातावर मेसेज... अन् तिने आयुष्य संपवलं, त्या घटनेने अख्खं सोलापूर हादरलं; आरोपी कोण?
Crime
Image Credit source: Google
| Updated on: Feb 23, 2026 | 7:30 PM

जग आधुनिकतेकडे जात असताना आजही विवाहित महिलांचा छळ होत असल्याच्या घटना घडत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने हातावर संदेश लिहून जीवन संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या सासरच्या लोकांना अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विवाहितेची आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे विवाहितेने हातावर संदेश लिहून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासू, सासरे आणि पतीला अटक केली आहे. विवाहितेवर मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप या सर्वांवर आहे. या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील अंकुश लोंढे आणि आई कविता लोंढे यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा देऊन आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

खुळेवाडी गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेने आत्महत्येपूर्वी हातावर संदेश लिहून आपला छळ होत असल्याचा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या आधारे सासू, सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली आहे.

आरोपींना फाशीची मागणी

मयत विवाहितेने पार्लरचा कोर्स सुरू केला होता. मात्र हा कोर्स करू नये म्हणून, तसेच विवाहाला पाच वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आता हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी मयत मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.

दरम्यान, आता विवाहितेच्या पालकांसह गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. आता आगामी काळात न्यायालय या प्रकरणी काय निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.