कशेडी बोगद्यात ट्रकला भीषण आग, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; जुन्या मार्गाने सुरु वाहतूक…

मुंबई ते गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील आगीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कशेडी बोगद्यात ट्रकला भीषण आग, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; जुन्या मार्गाने सुरु वाहतूक...
Kashedi Tunnel
| Updated on: Nov 29, 2026 | 10:37 PM

कृष्णकांत साळगावकर, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : – मुंबई ते गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यामध्ये एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे आगीचा धूर बोगद्यात पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील दोन्ही लेन बंद करण्यात आल्या आहेत. अडीच किलोमीटर लांबीच्या दोन्ही लेन बंद झाल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा मार्ग गेल्या एक तासांपासून ठप्प असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आता जुन्या कशेडी घाटातून वळवण्यात आली आहे.

खेड – रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.आगीमुळे बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल अडीच किलोमीटर लांबीच्या कशेडी बोगद्याच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. ट्रकला लागलेल्या आगीमुळे बोगद्यात प्रचंड धूर पसरला असून, गेल्या एक तासापासून बोगद्यातील वाहतूक ठप्प आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आता जुन्या कशेडी घाटातून वळवण्यात आली आहे.

Loading...

बोगद्यातील धूर आणि आगीची परिस्थिती लक्षात घेऊन वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, बोगद्यातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी जुन्या कशेडी घाटाचा पर्यायी मार्ग वापरावा असे आवाहन करण्यात आला आहे.

रविवार सुटीमुळे प्रचंड ट्रॅफीक, त्यात अपघाताची भर

मुंबई-गोवा हायवेवर रविवार सुटीमुळे प्रचंड ट्रॅफीक जाम असताना हा अपघात घडल्याने यामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. वीकेंड संपताच गोव्यातून मुंबईकडे परतणाऱ्यांची गर्दी, आणि हायवेवर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना हा अपघात घडल्याने मोठी पंचाईत झाली. अनेक तास वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनातून प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us