मराठा आरक्षणासाठी थांबवलेली मेगाभरती लवकरच सुरु होणार

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत रद्द करण्यात आलेली राज्यातील प्रस्तावित मेगाभरती सुरु करण्यात येणार आहे. लवकरात लवकर या भरती प्रक्रियेची सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ही भरती रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधताना केली होती. तब्बल आठ वर्षानंतर राज्य सरकारने […]

मराठा आरक्षणासाठी थांबवलेली मेगाभरती लवकरच सुरु होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत रद्द करण्यात आलेली राज्यातील प्रस्तावित मेगाभरती सुरु करण्यात येणार आहे. लवकरात लवकर या भरती प्रक्रियेची सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ही भरती रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधताना केली होती.

तब्बल आठ वर्षानंतर राज्य सरकारने नोकरभरतीची घोषणा केली. ज्यात यंदा 36 हजार आणि पुढच्या वर्षी 36 हजार पदं भरली जातील. शिक्षण सेवकांच्या धरतीवर पहिली पाच वर्ष मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर कामगिरी आणि पात्रता बघून नोकरीत कायम केलं जाणार आहे. पण ही भरती रद्द करण्यात आली होती.

कोणत्या खात्यात किती जागा?

राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य खात्यात 10 हजार 568 पदं, गृह खात्यात 7 हजार 111, ग्रामविकास खात्यात 11 हजार, कृषी खात्यात 2500, सार्वजनिक बांधकाम खात्यात 8 हजार 337, नगरविकास खात्यात 1500, जलसंपदा खात्यात 8227, जलसंधारण खात्यात 2 हजार 423, पशुसंवर्धन खात्यात 1 हजार 47 आणि मत्स्य खात्यात 90 पदं भरली जाणार आहेत.

शिक्षक भरतीतही मराठा समाजाला राखीव जागा

शिक्षकांच्या प्रस्तावित 24 हजार जागांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के जागा मिळणार आहेत. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा कालच झाली, त्यानंतर आता तातडीने अंमलबजावणीही होणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत माहिती दिली.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.