AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

13 ऑगस्टला राज्यावर पावसाचं मोठं संकट, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, थेट अलर्ट

Maharashtra Rain Update : मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता नुकताच मोठा इशारा हा देण्यात आलाय. यामुळे नागरिकांनी शक्यतो महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणेही टाळावे. दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झालाय.

13 ऑगस्टला राज्यावर पावसाचं मोठं संकट, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, थेट अलर्ट
Rain
| Updated on: Aug 13, 2025 | 7:13 AM
Share

मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता हवामान विभागाकडून मोठा इशारा हा देण्यात आलाय. बुधवारी जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तसेत राज्यातील काही भागात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे. या आठवड्यात बुधवारी आज 13 ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा 

14 ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज ॲलर्टही देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 ऑगस्टला अलर्ट जारी केला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

13 ऑगस्टला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा 

देशातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळतंय. दरवर्षीपेक्षा यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाले आहे. राजस्थान, दिल्ली आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस होताना दिसतोय. उत्तर बिहारमधील सीतामढी, शिवहार, पूर्णिया आणि कटिहारपर्यंत एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच सीतामढी, शिवहर, दरभंगा, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज येथेही पाऊस झालाय.

बिहार, दिल्ली आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस 

राजस्थानच्या अनेक जिल्हात जोरदार देखील  पाऊस होताना दिसतोय. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस म्हणावा तसा झाला नाही. आता परत एकदा भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस नसल्याने पिके संकटात आली असून बळीराजा चिंतेत असल्याचे बघायला मिळत आहे. काही भागांमध्ये अजूनही समाधानकारण पाऊस झाला नाहीये.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?