AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत ४,४६२ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाची संगणकीय सोडत जाहीर झाली आहे.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी...जाणून घ्या सर्वकाही!
| Updated on: Aug 24, 2026 | 9:48 PM
Share

Pune Pimpri Chinchwad MHADA Lottery : पुणे या शहराचा विकास झपाट्याने होत आहे. हे शहर विस्तारण्याचा वेगही प्रचंड आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आता याच पुण्यात अनेक आयटी कंपन्या, औद्योगिक वसाहती आहेत. म्हणूनच पुण्यात घर घेण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत. परंतु सध्या पुण्यासारख्या शहरात घरांची किंमत प्रचंड वाढली आहे. असे असतानाच आता म्हाडाने जाहीर केलेल्या लॉटरीच्या रुपात तुमचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. म्हाडाने तब्बल ४,४६२ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत ४,४६२ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाची संगणकीय सोडत जाहीर झाली आहे. सोडतीमध्ये १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी पुणे येथील मांजरी खुर्द , म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कुठे घरं आहेत?

या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबडेवाडी, मुंढवा, ऊंड्री, वडगाव, बावधन, कोंढवा खुर्द येथे सदनिकांचा समावेश आहे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, वाकड, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवच्या सदनिका आहेत.

अर्जांची नोंदणी कधीपासून सुरू होणार?

ऑनलाइन अर्ज नोंदणी २४ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून, १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. घरांच्या किमती १३ लाखांपासून सुरू होणार असून; EWS साठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ६ लाख, तर LIG साठी ९ लाख रुपये निश्चित केली आहे. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २९ सप्टेंबरला, तर अंतिम यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल. संगणकीय पद्धतीने ही लॉटरी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता काढण्यात येणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी अर्जदारांनी म्हाडाच्या housing.mhada.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
'2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : '2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'
सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
Rupali Thombre Patil : 'आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही', चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया