AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राऊतांच्या छाताडात भगवा झेंडा…” गुलाबराव पाटलांचा घणाघात

गुलाबराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विजयाचे कौतुक करत संजय राऊत आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून शिवसेनेच्या भविष्यावर प्रकाश टाकला.

राऊतांच्या छाताडात भगवा झेंडा... गुलाबराव पाटलांचा घणाघात
| Updated on: Apr 27, 2025 | 3:27 PM
Share

“जे गुवाहाटीला गेले ते निवडून येणार नाही. लाडक्या बहिणीने चमत्कार केला. आम्ही परदेशात नाही गेलो. थंडी हवा खायला. ज्यावेळी वारा आला, आपत्ती आली त्यावेळी सगळ्यात अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. तुम्ही त्यांना बदनाम करता”, असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. ते बुलढाण्यात बोलत होते.

“संजय राऊतच्या छाताड्यात भगवा झेंडा गाडून निवडून आलो”

“माझ्या सी क्लास नगरपालिकेत किती पैसे द्यावेत. माझा बाप आला तरी तो बोलणर नाही. माझ्या नगरपालिकेचे मतदान २४ हजार आहे आणि ३३९ कोटी रुपये दिले. ३३९ कोटी आणि पत्र दिलं आला गल्ला. आम्हाला वाटलं आम्ही स्वप्नात आहे का? आम्ही असं तस निवडून आलो नाही, छप्पर फाड के निवडून आलो. आम्ही जळगाव जिल्ह्यातून साहेबांबरोबर पाच जण गेले होतो. पाचही जण निवडून आलो. त्या संजय राऊतच्या छाताड्यात भगवा झेंडा गाडून निवडून आलो”, अशी टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

“मी आपला आभार मानायला आलो”

“पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना क्रूरपणे मारण्यात आले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. हे व्यासपीठ शिवसेनेचे आहे. मी आपला आभार मानायला आलो आहे”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

“विधानसभेत म्हणालो होतो, आभार मानायला येईल, म्हणून आलो आहे. जनतेच्या पावसात भिजणारा भाऊ येथे आला आहे. मुख्यमंत्री होते, तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केले. आजही करणार, उद्याही करणार आणि करत आहे. राजकीय तापमान शिवसेनेने वाढविले. थंडगार हवा खायला कुठेतरी गेले. लाडके भाऊ आणि लाडकी बहीण यांनी विरोधकांना गप्प केले”, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

“शिवसेना कोणाची यावर जनतेकडून शिक्कामोर्तब”

“पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा सिंचनाचा विषय घेतला. आघाडीच्या काळात फक्त चार प्रकल्पांना मान्यता दिली, पण युतीच्या काळात दीडशे प्रकल्पांना मान्यता दिली. जो उठाव केला तो उठाव एकनाथ शिंदे यांनी दाखविला. शिवसेना दावणीला बांधणीचे काम केले. एकही आमदार निवडून येणार नाही म्हणायचे पण 60 जागा निवडून आल्या. बाळासाहेबांची विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब जनतेने केले आहे”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.